नाव :- रविंद्र रघुनाथ वऱ्हे.
प्रोजेक्टचे नाव :- इलेक्ट्रिक वायरिंग वाहनगाव.
उद्दिष्ट्ये :- वायरिंग
वाहनगावाच्या शाळेत आयबिटीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी व आरोग्य खादय , इलेक्ट्रिक व शेती या शिक्षणासाठी इलेक्ट्रिक वायरिंग करायची आहे.
कृती :-
- सर्वप्रथम त्या रूमचे अंतर मोजून घेणे.
- नंतर त्या रूममध्ये पॉईंट नुसार कोटेशन काढणे.
- लाईन दोरीने मार्किंग करून घेणे.
- त्यानंतर त्याप्रमाणे पट्टी ठोकून घेणे.
- मग त्याच्यावर वायरिंग ओढून घेणे.
- मेन DB ची वायरिंग ओढून घेणे.
- बोर्डला स्विच फिट करून घेणे.
- बोर्डला वायरिंग जोडून घेणे.
- मेन सप्लायला कनेक्ट करणे DP
- फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे.
साहित्य :-
- ड्रिल मशीन
- स्क्रू ड्रायव्हर
- पक्कड
- बॉलपिन हॅमर
- मीटर टेप
- लाईन दोरी
- इन्सुलेशन टेप
काम करतेवेळी आलेली अडचण :-
आम्ही तिथे गेल्यावर काम सुरु केले. त्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर लाईट गेली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ लाईटची वाट बघितली. तरी सुद्धा लाईट आली नाही. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जवळील पोगरणे 4 ते 5 होल मारल्यानंतर आमच्याकडून तो पोगर तुटला गेला. त्यानंतर आम्ही तिथल्या इलेक्ट्रिकच्या सरांपाशी गेलो. व त्या सरांकडून पोगर मागितले. मग त्या सरांनी आम्हाला पोगर दिले. मग त्या पोगरणे आम्ही संपूर्ण इलेक्ट्रिक विभागाची आम्ही पट्टी मारून घेतली. व त्या नंतर आम्ही वायरिंग केली.
काम करतेवेळी आलेला अनुभव :-
आम्ही वाहनगावाच्या शाळेत गेल्यावर तिथे आम्हाला आलेला अनुभव म्हणजे आम्हाला तिथे ड्रिल मशीन चालवायचा व पट्टी ठोकायचा म्हणजे पट्टी कोपऱ्यात कशी फोल्ड करायची. वायर्स कशाप्रकारे ओढायच्या त्याचा अनुभव आला. बोर्ड भरायचा अनुभव आला.
कोटेशन :-
- MCB 2 pol 64amp – 1 – 679 = 679 /-
- MCB 2 pol 32amp – 1 – 389 = 389 /-
- MCB 2 pol 16amp – 1 – 389 = 389 /-
- MCB BOX – 3 – 35 = 105 /-
- Patti – 14 – 50 = 700 /-
- 4mm wire red – 20m – 35 = 700 /-
- 4mm wire black – 20m – 35 = 700 /-
- 1.5 mm wire green – 25m – 15 = 375 /-
- 35/8 Screw – 3 box – 50 = 150 /-
- 35/8 Greeper – 6 packet – 10 = 60 /-
- Inshulation tep – 3 – 10 = 30 /-
- Earthing plate – 1 – 150 = 150 /-
- Earthing chemical – 1 packet – 65 = 65 /-
- 16amp board – 7 – 133 = 133 /-
- 2.5mm 3 core – 5m – 67 = 335 /-
- 2.5mm wire red – 5m – 25 = 125 /-
- 2.5mm wire black – 5m – 25 = 125 /-
Total :- = 6,008 /-