ETC म्हणजे काय ?
- ETC = Evacuated Tube Collector मराठीत याला साधारण निर्वात नलिका सौर संग्राहक असे म्हणता येईल.
- ETC हा Solar Water Heater चा एक प्रकार आहे. यामध्ये सूर्याची उष्णता वापरून पाणी गरम केले जाते. यासाठी मुख्यतः काचेच्या Vacuum Tubes वापरल्या जातात.
ETC system मध्ये कोणते भाग असतात ?
- Evacuated Glass Tubes – सूर्याची उष्णता शोषतात.
- Storage Tank – गरम पाणी साठवते.
- PUF Insulation – टाकीची उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते.
- Inner Tank – पाणी साठवणारा आतला भाग.
- Outer Sheet – टाकीचे संरक्षण.
- Stand – संपूर्ण system ला आधार देतो.
- Hot Water Outlet – गरम पाणी वापरासाठी बाहेर येते.
- Cold Water Inlet – थंड पाणी system मध्ये येते.
Process :
- ETC Solar Water Heater मध्ये सूर्याची किरणे Evacuated Vacuum Tubes वर पडतात आणि त्यातील absorber coating सूर्याची उष्णता शोषून घेते.
- ही उष्णता tube मधील पाण्याला मिळाल्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. पाणी गरम झाल्यावर त्याची घनता (Density) कमी होते, त्यामुळे ते तुलनेने हलके होऊन वरच्या Storage Tank मध्ये जाते.
- त्याच वेळी टाकीतील थंड पाण्याची घनता जास्त असल्यामुळे ते खाली येऊन पुन्हा vacuum tubes मध्ये जाते.
- अशा प्रकारे गरम पाणी वर आणि थंड पाणी खाली अशी नैसर्गिक हालचाल सतत चालू राहते.
- या प्रक्रियेला Thermosiphon effect किंवा Natural Circulation म्हणतात.
- त्यामुळे कोणत्याही पंपाशिवाय सूर्याच्या उष्णतेचा वापर करून टाकीत गरम पाणी तयार होते.
