उद्देश :-आपण पपई कॅन्डी केक वर टाकण्यासाठी उपयोग करू शकतो. पपई कॅन्डी बनवणे.

साहित्य:- पपई ,फ्लेवर, साखरेचा पाक.

साधने:- चाकू ,वाटी, कडाई ,ताट ,पाणी.

कृती:- पहिल्यांदा मी दोन कच्ची पपई घेतली आणि त्यांचा वजन बघितलं. मग त्याला स्वच्छ पाण्यात धुतले.

मग त्या पपईचे तुकडे केले आणि परत वजन पाहिले.

मग एका पातेल्यात पाणी घेऊन ते पाणी तापवले. मग त्यामध्ये पपई चे तुकडे टाकले मग पंधरा वीस मिनिटानंतर त्या पपईच्या तुकड्यांना बाहेर काढले .मग त्या तुकड्या चे वजन किती आहे तेवढीच साखर घ्यावे. मग त्या साखरेचा पाक तयार करायचा या साखरेच्या पाकात पपई चे तुकडे टाकायचे आणि गरम करायचे.मग त्याच्यावर फ्लेवर टाकायचे .

मग एका वाटीमध्ये पपई कॅन्डी काढायची व फ्रिजमध्ये ठेवायची झाली पपई कॅन्डी.

(कॉस्टिंग)

अ.नु. मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. पपई 2नग(1500gm) 5rs/1नग 10/-
  2. साखर 1kg 35/- 35/-
  3. फ्लेवर 15ml 30rs/20ml 24/-
  4. कलर 5gm 300rs/kg 1.50/-
  5. गॅस 30gm 680rs/15kg 1.36/-
  6. मजुरी 25% 89.82/-