पाव – Product
उद्देश्य (Purpose / Objective):
- घरच्या किंवा व्यावसायिक वापरासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पाव तयार करणे.
- ब्रेकफास्ट, स्नॅक किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची गरज भागवणे.
- ताजेतवाने पाव सतत उपलब्ध ठेवणे.
साहित्य (Ingredients / Materials):
- मैदा – 5 kg
- साखर – 100 gm
- मीठ – 80 gm
- यीस्ट – 110 gm
- ब्रेड इम्प्रूव्हर – 10 gm
- तेल – 50 gm
- पाणी – आवश्यकतेनुसार
उपयोग / वापर (Usage):
- रोजच्या आहारात ब्रेकफास्टसाठी
- संध्याकाळचा नाश्ता
- पार्टी / कार्यक्रमासाठी स्नॅक
बनवण्याची पद्धत / प्रक्रिया (Process / Method):
- सर्व साहित्य नीट मिक्स करा.
- पाणी घालून डोळ मळा आणि सॉफ्ट डोळ तयार करा.
- डोळ 1–2 तास उंचावण्यासाठी ठेवा (Fermentation).
- डोळाचे छोटे छोटे पाव तयार करा.
- बेक करून सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
वजन / आकार (Weight / Size):
- 1 पाव = अंदाजे 70–80 gm (तुमच्या नुसार बदलू शकतो)
टिकण्याचा कालावधी / Shelf Life:
- 1–2 दिवस (थंड, कोरड्या ठिकाणी)
सुरुवात
│
▼
मैदा घ्या
│
▼
यीस्ट + साखर + मीठ + तेल घाला
│
▼
पाणी टाकून मिसळा
│
▼
मऊ पीठ मळा
│
▼
पीठ झाकून ठेवा
(1 ते 1½ तास)
│
▼
पीठ फुगले का?
│
├── नाही ──► अजून थोडा वेळ ठेवा
│
└── होय
│
▼
गोळे तयार करा
│
▼
बेकिंग ट्रेमध्ये ठेवा
│
▼
ओव्हनमध्ये बेक करा
│
▼
पाव तयार
│
▼
समाप्त
| अ.क्र. | साहित्य | वापरलेले वजन | दर / kg (₹) | खर्च (₹) |
|---|---|---|---|---|
| 1 | मैदा | 5 kg | 45 | 225.00 |
| 2 | साखर | 100 gm | 42 | 4.20 |
| 3 | मीठ | 80 gm | 30 | 2.40 |
| 4 | यीस्ट | 110 gm | 160 | 17.60 |
| 5 | ब्रेड इम्प्रूव्हर | 10 gm | 500 | 5.00 |
| 6 | तेल | 50 gm | 150 | 7.50 |
| 7 | ऑटो चार्जेस | 1 युनिट | 14 | 14.00 |
एकूण कच्चा माल खर्च : ₹ 275.70
मजुरी (35%) : ₹ 96.49
एकूण उत्पादन खर्च (Total Cost) : ₹ 372.19
प्रति पाव खर्च (अंदाजे) : ₹ 2.88
आवळा लोंच प्रकल्प
प्रस्तावना
आम्ही आवळा हा प्रोजेक्ट तयार केला. आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो. त्यात व्हिटामिन c जास्त प्रमाणात असते व ते औषधी फळ मानले जाते. या प्रकल्पातून आवळ्याचे गुणधर्म ,उपयोग व महत्व याची माहिती घेतली आहे.
उद्देश
1 आवळ्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणे.
2 तो कोणत्या सिझन मध्ये उपलब्ध होतो हे जाणून घेणे.
3 आवळ्यापासून कोणत्या प्रकारचे product तयार होतात ह्याची माहिती मिळवणे.
सर्वे
जयवंत भिकाजी गायकवाड यांची मुलाखत घेतली. ते हिवरे कुंभार मध्ये राहणारे होते. त्यांना शेतात 50 झाडे लावलेली होती.
आवळ्याचे 2 प्रकार आहेत. 1(राय आवळा)
2 (कंठी आवळा )
आवळ्याचे झाडे लावल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी त्याला आवळा यायला लागले.
साहित्य
पातेल,चमचा , ग्लास, मग, डिश, नमक, काळी मिरी , जीरा,मसाले,आवळे , विनेगर, इत्यादी.
कृती
सर्व प्रथम आम्ही आवळे निवडून घेतले. त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यात 12 तास भिजत घातले. त्यानंतर त्यांना गरम पाण्यात शिजवून घेतले. त्यानंतर मसाले घालून आणि त्यात तेल घालून त्याला मुरायला ठेवलं. ते टिकण्यासाठी व आंबट लागण्यासाठी त्यात विनेगर टाकलं.
त्यानंतर आम्ही त्याचापासून आम्ही लोणच तयार केले .आणि आवळा सुपारी तयार केली .
त्यातून काय शिकलो :आवळा हा शरीरासाठी खूप उपयोगी असतो .
निरीक्षण
आवळा हा पांगून ठेवला पाहिजे नाहीतर तो लवकर खराब होतो .
निष्कर्ष
या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी फळ आहे हे समजले .त्याचा खूप औषधी उपयोग होतात अवल्यापासून तयार होणारे पदा10.00र्थ आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून फायदेशीर आहेत . म्हणून आवळ्याचे महत्व सर्वांनी जाणून ग्यावे व त्याचा वापर करावा .
| क्र. | मटेरिअल | वजन | दर /kg | किंमत |
| 1. | आवळा | 2kg | 40rs | 80.00 |
| 2. | लोंच मसाला | 150gm | 80rs/100gm | 120.00 |
| 3. | साध मीठ | 150gm | 30rs/kg | 4.50 |
| 4. | तेल | 400gm | 150rs/kg | 60.00 |
| 5. | गॅस चार्जेस | 30gm | 14kg | 1.86 |
| 6. | पॅकिंग चर्जेस | 10 जा | 10rs | 100.00 |
| 7. | फॉइल | 10फा | 1 rs | 10.00 |
मजुरी 35%
मजुरी (35%) : ₹ 131.72
एकूण उत्पादन खर्च (Total Cost) : ₹ 376.36
प्रती आवळा खर्च (अंदाजे) : ₹ 508.68
आवळा सुपारी
१) प्रस्तावना
आवळा सुपारी हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे तो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. आवळा, मीठ व विविध मसाल्यांचा वापर करून तयार केलेली सुपारी खाण्यास स्वादिष्ट आणि पचनास उपयुक्त असते.
२) उद्देश
- आवळ्याचे पौष्टिक महत्त्व समजून घेणे.
- घरच्या घरी आरोग्यदायी सुपारी तयार करणे.
- कमी खर्चात चांगला व टिकाऊ पदार्थ बनवणे.
- मसाल्यांचे प्रमाण आणि चव यांचा अभ्यास करणे.
३) साहित्य
- आवळा
- काळं मीठ
- साधं मीठ
- ओवा
- काळी मिरी
- हिंग
- जिरे
४) कृती
- प्रथम आवळे स्वच्छ धुऊन वाफवून/उकळून घेतले.
- थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी केल्या व बी काढून टाकले.
- एका भांड्यात आवळ्याच्या फोडींमध्ये काळं मीठ व साधं मीठ मिसळले.
- त्यात ओवा, काळी मिरी, हिंग व जिरे घालून सर्व मिश्रण चांगले हलवले.
- हे मिश्रण काही वेळ उन्हात वाळवून घेतले.
- पूर्ण वाळल्यावर तयार झालेली आवळा सुपारी हवाबंद डब्यात भरून ठेवली.
५) निरीक्षण
- सुपारीचा रंग नैसर्गिक हिरवट-तपकिरी झाला.
- मसाल्यांमुळे चव आंबट, खारट व थोडी तिखट लागली.
- वाळवताना आवळ्याचा आकार थोडा कमी झाला.
- तयार सुपारी सुगंधी व खाण्यास कुरकुरीत झाली.
६) निष्कर्ष
आवळा सुपारी बनवण्याची प्रक्रिया सोपी व कमी खर्चिक आहे. या प्रकल्पातून आवळ्याचे आरोग्यदायी गुणधर्म समजले. मसाल्यांचा योग्य वापर केल्यास चव वाढते. घरच्या घरी स्वच्छ व पौष्टिक सुपारी तयार करता येते.
आवळा सुपारी – कॉस्टिंग चार्ट
| अ.क्र | साहित्य | वजन | दर (₹/kg किंवा युनिट) | किंमत (₹) |
|---|---|---|---|---|
| 1 | आवळा | 2.5 kg | 40 | 100 |
| 2 | मीठ | 130 gm | 30 | 3.90 |
| 3 | काळं मीठ | 65 gm | 40 | 2.60 |
| 4 | ओवा | 35 gm | 150 | 5.26 |
| 5 | काळी मिरी | 65 gm | 800 | 52 |
| 6 | हिंग | 30 gm | 350 | 12.25 |
| 7 | जिरे | 65 gm | 400 | 26 |
| 8 | गॅस चार्जेस | 30 gm (अंदाजे) | 810/kg | 1.86 |
| 9 | मिक्सर चार्जेस | ½ युनिट | 10 | 5 |
| 10 | ड्रायर चार्जेस | 2 तास | 18.33 | 36.66 |
| 11 | पॅकिंग चार्जेस | 7 नग | 1 | 7 |
एकूण खर्च = ₹ 252.52
मजुरी (35%) = ₹ 88.38
एकूण किंमत = ₹ 340.90
पपईची तुटी फ्रुटी
१) प्रस्तावना
तुटी फ्रुटी हा केक, आईस्क्रीम, बिस्कीट व डेझर्टमध्ये वापरला जाणारा रंगीत व गोड पदार्थ आहे. बाजारात मिळणारी तुटी फ्रुटी प्रामुख्याने कच्च्या पपईपासून तयार केली जाते. पपईमध्ये तंतुमय घटक, जीवनसत्त्वे व पोषक द्रव्ये असतात. कच्च्या पपईपासून साखरेच्या पाकात शिजवून व रंग–फ्लेवर देऊन आकर्षक तुटी फ्रुटी तयार केली जाते.
२) उद्देश
- कच्च्या पपईपासून तुटी फ्रुटी तयार करणे.
- फळ प्रक्रिया (Fruit Processing) पद्धती समजून घेणे.
- साखरेचा पाक तयार करण्याची योग्य पद्धत शिकणे.
- वजन, वेस्टेज व उत्पादन नोंद ठेवणे.
३) साहित्य व वजन
| पदार्थ | वजन |
|---|---|
| कच्ची पपई | 1.791 किलो |
| वेस्टेज | 53 ग्रॅम |
| पपईच्या फोडी | 1171 ग्रॅम |
| प्रोडक्शन लॉस | 117 ग्रॅम |
| साखर | 1171 ग्रॅम |
| पाणी | 550 ग्रॅम |
| कलर | 0.5 ग्रॅम |
| फ्लेवर | 3 ml |
४) कृती
- कच्ची पपई स्वच्छ धुऊन साल काढली.
- आतील बिया काढून पपईचे छोटे चौकोनी तुकडे (फोडी) केले.
- फोडी उकळत्या पाण्यात थोडा वेळ ब्लांच केल्या.
- वेगळ्या भांड्यात साखर व पाणी घालून पाक तयार केला.
- तयार पाकात पपईच्या फोडी घालून शिजवले.
- त्यात कलर (0.5 ग्रॅम) व फ्लेवर (3 ml) घातला.
- फोडी पारदर्शक व गोड झाल्यावर गॅस बंद केला.
- तयार तुटी फ्रुटी थंड करून सुकवली.
५) निरीक्षण
- पपईच्या फोडी पाकात शिजल्यानंतर पारदर्शक व चमकदार दिसू लागल्या.
- रंग घातल्यानंतर तुटी फ्रुटी आकर्षक दिसली.
- गोडपणा योग्य प्रमाणात होता.
- वेस्टेज 53 ग्रॅम आणि प्रोडक्शन लॉस 117 ग्रॅम झाला.
- अंतिम उत्पादन मऊ पण आकार टिकवून होते.
६) निष्कर्ष
कच्च्या पपईपासून यशस्वीरित्या तुटी फ्रुटी तयार करण्यात आली. योग्य प्रमाणात साखरेचा पाक, रंग व फ्लेवर वापरल्यामुळे उत्पादन चविष्ट व आकर्षक झाले. या प्रक्रियेमुळे फळ प्रक्रिया तंत्र, वजन मोजमाप व उत्पादन व्यवस्थापन याची माहिती मिळाली.
पपई तुटी फ्रुटी – कॉस्टिंग
१) साहित्य व खर्च तपशील
| अ.क्र | साहित्य | वजन | दर (₹/kg किंवा युनिट) | किंमत (₹) |
|---|---|---|---|---|
| 1 | पपई | 500 gm | 20 ₹/kg | 10.00 |
| 2 | साखर | 292 gm | 42 ₹/kg | 12.264 |
| 3 | कलर | 5 gm | 300 ₹/kg | 0.15 |
| 4 | फ्लेवर (स्ट्रॉबेरी) | 3 ml | 10 ₹/20 ml | 10.50 |
| 5 | गॅस चार्जेस | 30 gm | 870 ₹/kg | 1.86 |
| 6 | फिक्स चार्जेस | 1 unit | 10 ₹/unit | 10.00 |
| 7 | पॅकिंग चार्जेस | 4 बॅग | 3 ₹/bag | 12.00 |
२) एकूण खर्च
Total Cost = ₹ 56.77
- मजुरी = 35%
- नफा = ₹ 19.87
- एकूण विक्री किंमत = ₹ 76.64
Final Total = ₹ 76.64

वैयक्तिक स्वच्छता
माहिती
स्वतःच्या शरीराची, कपड्यांची व आजूबाजूच्या सवयींची स्वच्छता राखणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.
उद्दिष्टे
शरीर निरोगी व स्वच्छ ठेवणे
आजार व संसर्ग टाळणे
चांगल्या सवयी लावणे
आत्मविश्वास वाढवणे
समाजात स्वच्छतेचे महत्त्व समजावणे
निरीक्षण
हात नियमितपणे साबणाने धुतले जातात का?
जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुण्याची सवय आहे का?
दात दिवसातून दोन वेळा घासले जातात का?
नखे कापलेली व स्वच्छ आहेत का?
केस स्वच्छ व नीटनेटके आहेत का?
स्वच्छ कपडे परिधान केले जातात का?
रुमालाचा योग्य वापर केला जातो का?
चहा
प्रस्तावना
भारतामध्ये चहा हा प्रत्येक घराचा अविभाज्य घटक आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही प्यायला तयार असणारा हा पेय अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण साधा, सुगंधी आणि चविष्ट चहा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत.
साहित्य ;
पाणी – 100ml
दूध – 3 लिटर
साखर – ५ चमचे (चवीनुसार)
चहा पत्ती – २ चमचा
आलं (किसलेले) – १० gm
वेलची – ४ ते ५ (ठेचून)
कृती
पाणी आणि चहा पत्ती ,अद्रक ,विलायची उकळून घेणे आणि दुध टाकून उकळून घ्यावे .त्यानंतर गाळून घ्यावे .
काळजी घेणे
चहा पत्ती जास्त घालू नये; चहा कडवट होऊ शकतो.
दूध आणि पाण्याचे प्रमाण चवीप्रमाणे ठेवा.
उकळताना भांडे लक्षात ठेवावे, अन्यथा चहा उतू जाऊ शकतो.
मोरिंगा चिक्की ऑर्डर
माहिती
मोरिंगा म्हणजेच शेवगा ही अत्यंत पोषक औषधी वनस्पती आहे. शेवग्याची पाने, शेंगा, फुले व बिया यांचा उपयोग आहारात व औषधनिर्मितीत होतो. शेवग्याच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी मोरिंगा चक्की वापरली जाते. ही चक्की लघुउद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
उद्देश
शेवग्याच्या पानांपासून स्वच्छ व दर्जेदार पावडर तयार करणे
शेवगा प्रक्रिया उद्योगाला चालना देणे
ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे
शेवग्याच्या पोषणमूल्यांचे जतन करणे
आयुर्वेदिक व न्यूट्रास्युटिकल उत्पादनासाठी कच्चा माल तयार करणे
शेतीपूरक व्यवसाय वाढवणे
कृती
शेवग्याची काही ताजी पाने आणणे.
पाने स्वच्छ धुवून वाळवणे.
त्या पानांचा वापर भाजी किंवा काढा तयार करण्यासाठी कसा केला जातो हे पाहणे.
मोठ्या व्यक्तीकडून त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणे.
परिसरातील शेवग्याचे झाड निरीक्षण करणे.
त्याची पाने, फुले व शेंगा पाहणे.
शेवग्याबाबत माहिती पुस्तकातून किंवा शिक्षकांकडून गोळा करणे.
कॉस्टिंग
| मटेरियल | वजन | दर /kg | किमत |
| शेंगदाणा | 200 gm | 130 rs | 26 |
| तीळ | 120gm | 200rs | 24 |
| जवस | 80gm | 120rs | 9.6 |
| तूप | 40gm | 600rs | 12 |
| गूळ | 400 gm | 45 | 18 |
| पॅकिंग चार्जेस | 2 box | 5 | 10 |
| स्टीकर | 2 | 1.5 | 3 |
| मिक्सर् चार्जेस | 1/2 unit | 10rs/ 1 unit | 5 |
| मोरिंगा पावडर | 20 gm | 600rs | 12 |
| gass चार्जेस | 120gm | 870rs/1 unit | 7.45 |
| मजुरी = 35 | 139.05 487.71 ———- 187.71 |
गुलाब जामून
प्रस्तावना
गुलाब जमून आणि रसगुल्ले हे गोड असतात .गुलाबजाम हा मावा किंवा खव्यापासून तयार करून तळला जातो आणि साखरेच्या पाकात भिजवला जातो. त्याचा मऊ, रसाळ आणि सुगंधी स्वाद सर्वांना आवडतो. दुसरीकडे
उद्देश
खाव्या पासून गुलाब जमून बनवण्याची प्रक्रिया समजून घेण्य करिता .
साहित्य
खवा
मैदा
बेकिंग सोडा
दूध
साखर
पाणी
कृती
गोळे साखरेच्या पाकात मुरण्या साठी ठेऊन दिले
दुध पासून ख्गावा तयार कारून घेतला
खव्याच वाजून करून त्यच्या निम्या वजन एवढ्या मैद्या मध्ये माळून घेतलं
मळलेल्या पीटाचे गोळे करून घेतले
गोळे तेलात टाळून घेतले
रस गुल्ले
प्रस्तावना
रसगुल्ला हा पदार्थ गोड आसतो दुध पासून तयार केला जातो रसगुल्ल्याचा मऊ, स्पंजी आणि रसाने भरलेला पोत हा त्याचा मुख्य वैशिष्ट्य आहे.
उद्देश
जर दुध खरब झालेलं असेल तर त्याचा उपयोग कसा करायचा
रसगुल्ले कशे बनवायचे त्याची प्रक्रिया कशी करायची हे शिकण्यासाठी
साहित्य
पूर्ण फॅट दूध
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर –
साखर
पाणी
वेलची पूड
कृती
धुधात व्हिनेगर टाकून उकळून घेतलं
दुधातल फट आणि पाणी वेगळ करून घेतलं
फट मळून घेतलं
माळून झाल्यावर त्याचे गोळे केले
मग साखरेच्या पाकात मुरण्या साठी ठेऊन दिले
निरीक्षण
पीट मळताना थोडा थोडा दुध टाकून मालयाच
गोळे करताना अलगद हाताने वळायचे
निष्कर्ष यातून काय शिकालो
खाव्या पासून गुलाब जमून कसे तयार करायचे ते शीकलो
योग्य परमान वासू वापरणे कमी जास्त झाल्यास पदार्थ खरब होतो