पाव

उद्देश्य (Purpose / Objective):

  • घरच्या किंवा व्यावसायिक वापरासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पाव तयार करणे.
  • ब्रेकफास्ट, स्नॅक किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची गरज भागवणे.
  • ताजेतवाने पाव सतत उपलब्ध ठेवणे.

साहित्य (Ingredients / Materials):

  • मैदा – 5 kg
  • साखर – 100 gm
  • मीठ – 80 gm
  • यीस्ट – 110 gm
  • ब्रेड इम्प्रूव्हर – 10 gm
  • तेल – 50 gm
  • पाणी – आवश्यकतेनुसार

उपयोग / वापर (Usage):

  • रोजच्या आहारात ब्रेकफास्टसाठी
  • संध्याकाळचा नाश्ता
  • पार्टी / कार्यक्रमासाठी स्नॅक

बनवण्याची पद्धत / प्रक्रिया (Process / Method):

  1. सर्व साहित्य नीट मिक्स करा.
  2. पाणी घालून डोळ मळा आणि सॉफ्ट डोळ तयार करा.
  3. डोळ 1–2 तास उंचावण्यासाठी ठेवा (Fermentation).
  4. डोळाचे छोटे छोटे पाव तयार करा.
  5. बेक करून सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.

वजन / आकार (Weight / Size):

  • 1 पाव = अंदाजे 70–80 gm (तुमच्या नुसार बदलू शकतो)

टिकण्याचा कालावधी / Shelf Life:

  • 1–2 दिवस (थंड, कोरड्या ठिकाणी)

सुरुवात


मैदा घ्या


यीस्ट + साखर + मीठ + तेल घाला


पाणी टाकून मिसळा


मऊ पीठ मळा


पीठ झाकून ठेवा
(1 ते 1½ तास)


पीठ फुगले का?

├── नाही ──► अजून थोडा वेळ ठेवा

└── होय


गोळे तयार करा


बेकिंग ट्रेमध्ये ठेवा


ओव्हनमध्ये बेक करा


पाव तयार


समाप्त

अ.क्र.साहित्यवापरलेले वजनदर / kg (₹)खर्च (₹)
1मैदा5 kg45225.00
2साखर100 gm424.20
3मीठ80 gm302.40
4यीस्ट110 gm16017.60
5ब्रेड इम्प्रूव्हर10 gm5005.00
6तेल50 gm1507.50
7ऑटो चार्जेस1 युनिट1414.00

एकूण कच्चा माल खर्च : ₹ 275.70
मजुरी (35%) : ₹ 96.49

एकूण उत्पादन खर्च (Total Cost) : ₹ 372.19

प्रति पाव खर्च (अंदाजे) : ₹ 2.88

आवळा लोंच प्रकल्प

प्रस्तावना :–

मी dbrt ची विद्यार्धीनी असून. ‘आवळा’ या विषयावर प्रोजेक्ट केला आहे. आवळा हा आरोग्यासाठी उपयुक्त फळ आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी खनिज आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. आवळा डोळ्यांच्या, केसांच्या तसेच पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.

परंतु आवळ्याचा हंगामा मर्यादित असल्याने तो जास्त का टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक ठरते.आवळ्यापासून आवळा लोणचे,आवळा कॅन्डी,आवळा सुपार,व इत्यादी आवळ्याचे पदार्थ तयार करून ते वर्षभर वापरता येतात.

या प्रकल्पाच्या माध्यमातून मी आवळ्याचे गुणधर्म,त्यावरील प्रक्रिया पद्धती व त्याचे आरोग्यदायी फायदे याचा अभ्यास केला आहे.

उद्देश :-

१) आवळ्यातील विटामिन सी आणि त्याचे आरोग्यावरील फायदे समजून घेणे.

२) आवळा जास्त काय टिकण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रिया ( मुरंबा, लोणच, कॅन्डी, पावडर ).

३) आवळ्यापासून तयार होणाऱ्या पदार्थचे आरोग्यदायी महत्व समजून घेणे.

1) आवळा सुपारी

साहित्य

आवळा

काळं मीठ

साधं मीठ

ओवा

काळी मिरी

हिंग

जिरे

कृती

प्रथम आवळे स्वच्छ धुऊन वाफवून/उकळून घेतले.

थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी केल्या व बी काढून टाकले.

एका भांड्यात आवळ्याच्या फोडींमध्ये काळं मीठ व साधं मीठ मिसळले.

त्यात ओवा, काळी मिरी, हिंग व जिरे घालून सर्व मिश्रण चांगले हलवले.

हे मिश्रण काही वेळ उन्हात वाळवून घेतले.

पूर्ण वाळल्यावर तयार झालेली आवळा सुपारी हवाबंद डब्यात भरून ठेवली.

निरीक्षण

सुपारीचा रंग नैसर्गिक हिरवट-तपकिरी झाला.

मसाल्यांमुळे चव आंबट, खारट व थोडी तिखट लागली.

वाळवताना आवळ्याचा आकार थोडा कमी झाला.

तयार सुपारी सुगंधी व खाण्यास कुरकुरीत झाली.

निष्कर्ष

आवळा सुपारी बनवण्याची प्रक्रिया सोपी व कमी खर्चिक आहे. या प्रकल्पातून आवळ्याचे आरोग्यदायी गुणधर्म समजले. मसाल्यांचा योग्य वापर केल्यास चव वाढते. घरच्या घरी स्वच्छ व पौष्टिक सुपारी तयार करता येते.

कॉस्टिंग

अ.क्रसाहित्यवजनदर (₹/kg किंवा युनिट)किंमत (₹)
1आवळा2.5 kg40100
2मीठ130 gm303.90
3काळं मीठ65 gm402.60
4ओवा35 gm1505.26
5काळी मिरी65 gm80052
6हिंग30 gm35012.25
7जिरे65 gm40026
8गॅस चार्जेस30 gm (अंदाजे)810/kg1.86
9मिक्सर चार्जेस½ युनिट105
10ड्रायर चार्जेस2 तास18.3336.66
11पॅकिंग चार्जेस7 नग17

एकूण खर्च = ₹ 252.52

मजुरी (35%) = ₹ 88.38

एकूण किंमत = ₹ 340.90

2 ) आवळा लोणच

साहित्य

पातेल,चमचा , ग्लास, मग, डिश, नमक, काळी मिरी , जीरा,मसाले,आवळे , विनेगर, इत्यादी.

कृती

सर्व प्रथम आम्ही आवळे निवडून घेतले. त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यात 12 तास भिजत घातले. त्यानंतर त्यांना गरम पाण्यात शिजवून घेतले. त्यानंतर मसाले घालून आणि त्यात तेल घालून त्याला मुरायला ठेवलं. ते टिकण्यासाठी व आंबट लागण्यासाठी त्यात विनेगर टाकलं.

त्यानंतर आम्ही त्याचापासून आम्ही लोणच तयार केले .आणि आवळा सुपारी तयार केली .

त्यातून काय शिकलो :आवळा हा शरीरासाठी खूप उपयोगी असतो .

निरीक्षण

आवळा हा पांगून ठेवला पाहिजे नाहीतर तो लवकर खराब होतो .

निष्कर्ष

या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी फळ आहे हे समजले .त्याचा खूप औषधी उपयोग होतात अवल्यापासून तयार होणारे पदा10.00र्थ आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून फायदेशीर आहेत . म्हणून आवळ्याचे महत्व सर्वांनी जाणून ग्यावे व त्याचा वापर करावा .

कॉस्टिंग

क्र.मटेरिअलवजनदर /kgकिंमत
1.आवळा2kg40rs
80.00
2.लोंच मसाला150gm80rs/100gm120.00
3.साध मीठ150gm30rs/kg
4.50
4.तेल400gm150rs/kg
60.00
5.गॅस चार्जेस30gm14kg
1.86
6.पॅकिंग चर्जेस
10 जा
10rs
100.00
7.फॉइल
10फा
1 rs10.00


मजुरी (35%) : ₹ 131.72

एकूण उत्पादन खर्च (Total Cost) : ₹ 376.36

एकूण किंमत : ₹ 508.68

3 ) आवळा कॅन्डी

प्रस्तावना (Introduction)

आवळा हा व्हिटॅमिन C ने समृद्ध असा पौष्टिक फळ आहे. आवळ्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात, त्यापैकी आवळा कॅंडी हा टिकाऊ, चविष्ट व आरोग्यदायी पदार्थ आहे. या प्रॅक्टिकलमध्ये २ किलो आवळ्यांपासून योग्य पद्धतीने आवळा कॅंडी तयार करण्यात आली आहे. घरगुती तसेच लघुउद्योगासाठी ही प्रक्रिया उपयुक्त आहे.

कृती (Procedure)

  1. प्रथम २ किलो आवळे स्वच्छ पाण्याने नीट धुतले.
  2. नंतर आवळे उकळण्यासाठी भांड्यात पाणी घेऊन त्यात आवळे टाकले.
  3. आवळे थोडे मऊ होईपर्यंत उकळले.
  4. उकडलेले आवळे थंड करून त्यांच्या फोडी केल्या व बिया काढून टाकल्या.
  5. आवळ्याच्या फोडींमध्ये साखर मिसळून त्या काही वेळ तसेच ठेवल्या.
  6. साखर विरघळल्यानंतर फोडी उन्हात/सावलीत वाळवून कॅंडी तयार केली.

निरीक्षण (Observation)

  • उकळल्यानंतर आवळे मऊ झाले.
  • फोडी करताना बिया सहज वेगळ्या झाल्या.
  • साखर मिसळल्यानंतर आवळ्याचा रस बाहेर आला.
  • वाळविल्यानंतर कॅंडीला आकर्षक रंग व गोड-आंबट चव आली.
  • कॅंडी टिकाऊ व खाण्यास योग्य झाली.

निष्कर्ष (Conclusion)

या प्रॅक्टिकलमधून २ किलो आवळ्यांपासून यशस्वीपणे आवळा कॅंडी तयार झाली. योग्य स्वच्छता, उकळण्याची प्रक्रिया व साखरेचे प्रमाण यामुळे चविष्ट व पौष्टिक कॅंडी तयार करता येते हे सिद्ध झाले. ही पद्धत घरगुती वापरासाठी तसेच उत्पन्नाचे साधन म्हणून उपयोगी आहे.

आवळा कॅंडी – कॉस्टिंग

अ.क्र.साहित्यवजन / प्रमाणदरकिंमत (₹)
1आवळा2.5 कि.ग्रॅ.₹40 / कि.ग्रॅ.120.00
2साखर2 कि.ग्रॅ.₹42 / कि.ग्रॅ.84.00
3गॅस चार्जेस90 ग्रॅम₹870 / 14 कि.ग्रॅ.5.59
4ड्रायर चार्जेस6 तास / 7.98 युनिट₹18.62 / युनिट148.58
5पॅकिंग चार्ज3 बॅग30.00
उपएकूणTotal₹ 388.17
6मजुरी / इतर खर्च135.85
एकूण खर्च₹ 524.02

पपईची तुटी फ्रुटी

१) प्रस्तावना

तुटी फ्रुटी हा केक, आईस्क्रीम, बिस्कीट व डेझर्टमध्ये वापरला जाणारा रंगीत व गोड पदार्थ आहे. बाजारात मिळणारी तुटी फ्रुटी प्रामुख्याने कच्च्या पपईपासून तयार केली जाते. पपईमध्ये तंतुमय घटक, जीवनसत्त्वे व पोषक द्रव्ये असतात. कच्च्या पपईपासून साखरेच्या पाकात शिजवून व रंग–फ्लेवर देऊन आकर्षक तुटी फ्रुटी तयार केली जाते.

२) उद्देश

  • कच्च्या पपईपासून तुटी फ्रुटी तयार करणे.
  • फळ प्रक्रिया (Fruit Processing) पद्धती समजून घेणे.
  • साखरेचा पाक तयार करण्याची योग्य पद्धत शिकणे.
  • वजन, वेस्टेज व उत्पादन नोंद ठेवणे.

३) साहित्य व वजन

पदार्थवजन
कच्ची पपई1.791 किलो
वेस्टेज53 ग्रॅम
पपईच्या फोडी1171 ग्रॅम
प्रोडक्शन लॉस117 ग्रॅम
साखर1171 ग्रॅम
पाणी550 ग्रॅम
कलर0.5 ग्रॅम
फ्लेवर3 ml

४) कृती

  1. कच्ची पपई स्वच्छ धुऊन साल काढली.
  2. आतील बिया काढून पपईचे छोटे चौकोनी तुकडे (फोडी) केले.
  3. फोडी उकळत्या पाण्यात थोडा वेळ ब्लांच केल्या.
  4. वेगळ्या भांड्यात साखर व पाणी घालून पाक तयार केला.
  5. तयार पाकात पपईच्या फोडी घालून शिजवले.
  6. त्यात कलर (0.5 ग्रॅम) व फ्लेवर (3 ml) घातला.
  7. फोडी पारदर्शक व गोड झाल्यावर गॅस बंद केला.
  8. तयार तुटी फ्रुटी थंड करून सुकवली.

५) निरीक्षण

  • पपईच्या फोडी पाकात शिजल्यानंतर पारदर्शक व चमकदार दिसू लागल्या.
  • रंग घातल्यानंतर तुटी फ्रुटी आकर्षक दिसली.
  • गोडपणा योग्य प्रमाणात होता.
  • वेस्टेज 53 ग्रॅम आणि प्रोडक्शन लॉस 117 ग्रॅम झाला.
  • अंतिम उत्पादन मऊ पण आकार टिकवून होते.

६) निष्कर्ष

कच्च्या पपईपासून यशस्वीरित्या तुटी फ्रुटी तयार करण्यात आली. योग्य प्रमाणात साखरेचा पाक, रंग व फ्लेवर वापरल्यामुळे उत्पादन चविष्ट व आकर्षक झाले. या प्रक्रियेमुळे फळ प्रक्रिया तंत्र, वजन मोजमाप व उत्पादन व्यवस्थापन याची माहिती मिळाली.

कॉस्टिंग

अ.क्रसाहित्यवजनदर (₹/kg किंवा युनिट)किंमत (₹)
1पपई500 gm20 ₹/kg10.00
2साखर292 gm42 ₹/kg12.264
3कलर5 gm300 ₹/kg0.15
4फ्लेवर (स्ट्रॉबेरी)3 ml10 ₹/20 ml10.50
5गॅस चार्जेस30 gm870 ₹/kg1.86
6फिक्स चार्जेस1 unit10 ₹/unit10.00
7पॅकिंग चार्जेस4 बॅग3 ₹/bag12.00

२) एकूण खर्च

Total Cost = ₹ 56.77

  • मजुरी = 35%
  • नफा = ₹ 19.87
  • एकूण विक्री किंमत = ₹ 76.64

Final Total = ₹ 76.64

वैयक्तिक स्वच्छता

माहिती

स्वतःच्या शरीराची, कपड्यांची व आजूबाजूच्या सवयींची स्वच्छता राखणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.

उद्दिष्टे

शरीर निरोगी व स्वच्छ ठेवणे
आजार व संसर्ग टाळणे
चांगल्या सवयी लावणे
आत्मविश्वास वाढवणे
समाजात स्वच्छतेचे महत्त्व समजावणे

निरीक्षण

हात नियमितपणे साबणाने धुतले जातात का?
जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुण्याची सवय आहे का?
दात दिवसातून दोन वेळा घासले जातात का?
नखे कापलेली व स्वच्छ आहेत का?
केस स्वच्छ व नीटनेटके आहेत का?
स्वच्छ कपडे परिधान केले जातात का?
रुमालाचा योग्य वापर केला जातो का?

चहा

प्रस्तावन

भारतामध्ये चहा चहा हा प्रत्येक घरात अविभाज घटक आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही यला तयार असणारा हा पेय अनेकाचा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे या प्रोजेक्टमध्ये आपणच साधा समृद्धी आणि चविष्ट चहा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत.

साहित्य

पाणी १००ml

दुध ३ लिटर

साखर ५ चमचा

आल (ठेचलेला ) 10gm

इलायची ४ ते ५ (ठेचून )

चहा पावडर २ चमचा

कृती

सुरुवात


पाणी घ्या


पाणी गरम करा


साखर टाका? ──► (होय/नाही)


चहा पत्ती टाका व तुम्हाला हव तस त्यत आलं, इलायची ,हे ठेचून टाका


उकळी येऊ द्या


दूध टाका


पुन्हा उकळी येऊ द्या


गॅस बंद करा


चहा गाळून घ्या


चहा तयार


समाप्त

निष्कर्ष

चहा हा भारतीय संस्कृतीतील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याची चव, सुवास आणि ताजेतवाने करणारी उब मनाला आनंद देते. सकाळची सुरुवात असो, थकवा घालवायचा असो किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा – चहाचं स्थान कायम खास असतं. योग्य प्रमाणात घेतल्यास चहा ऊर्जा वाढवतो, मन ताजेतवाने करतो आणि दिवसाची सुरुवात आनंदी करतो.