1)मोरिंगा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .
कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .
2)त्यांचे मिश्रण करून घेतले .
3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .
4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेतला .
5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .
6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केले .
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 6 |
2) | गूळ | 300 ग्रॅम | 45 | 13.5 |
3) | तूप | 25 ग्रॅम | 620 | 15.5 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 4 बॉक्स | 5 | 20 |
6) | स्टिकर | 4 | 1 | 4 |
7) | जवस | 80 ग्रॅम | 80 | 6.4 |
8) | तीळ | 120 ग्रॅम | 120 | 14.4 |
9) | मोरिंगा पाऊडर | 20 ग्रॅम | 600 | 12 |
10) | मजुरी 25% | 23.52 | ||
एकूण | 117.62 |
2)शेंगदाणा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ ,साखर ,तेल ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,सूरी ,गॅस ,पॅकिंग बॉक्स इ .
कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .
2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला
3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .
5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले .
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 36 |
2) | गूळ | 280 ग्रॅम | 45 | 12.6 |
3) | तूप | 5 ग्रॅम | 620 | 3.1 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 2 बॉक्स | 10 | 10 |
6) | स्टीकर | 2 | 2 | 2 |
7) | मजुरी 25% | 15.19 | ||
एकूण | 81.19 |
3)तिळाची चिक्की तयार करणे .
साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .
कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .
2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .
5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केल्या .
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | साखर | 250 ग्रॅम | 37 | 9.25 |
2) | तीळ | 250 ग्रॅम | 120 | 30 |
3) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
4) | तूप | 5 ग्रॅम | 620 | 3.1 |
5) | पॅकिंग बॉक्स | 2 बॉक्स | 5 | 10 |
6) | लेबल | 2 | 1 | 2 |
7) | मजुरी 25% | 14.16 | ||
एकूण | 70.81 |
4)चिंचेचा सॉस तयार करणे .
साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .
कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .
2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .
4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4.8 kg )
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | चिंच | 1 kg | 80 | 80 |
2) | गूळ | 3 kg | 45 | 135 |
3) | मिरची पावडर | 30 ग्रॅम | 425 | 12.75 |
4) | काळे मीठ | 100 ग्रॅम | 50 | 5 |
5) | गरम मसाला | 20 ग्रॅम | 500 | 10 |
6) | गॅस | 90 ग्रॅम | 1100 | 99 |
7) | मजुरी 25% | 85.43 | ||
एकूण | 427.18 |
5)मिरचीचा ठेचा तयार करणे .
साहित्य :-मिरची ,मीठ ,भाजलेले शेंगदाणे ,तेल ,लसूण ,गॅस इ .
कृती :-1)पहिल्यांदा 2 kg मिरच्या घेऊन त्या चिरून घेतल्या . नंतर त्या मिरच्या तळून घेतल्या .
2)तसेच शेंगदाणे पण तळून घेतले .
3)त्यानंतर तळलेल्या मिरच्या ,लसणी आणि शेंगदाणे एकत्र करून मिक्सरला लावले व मिश्रण केले .
4)मग कढईत तेल घेऊन त्यात ते मिश्रण टाकले व ढवळून घेतले.ढवळून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकले.
5)नंतर तयार झालेला मिरचीचा ठेचा थंड होऊ दिला व बरणीत पॅक करून किचनला दिला .(2.7 kg )
कॉस्टिंग
अ क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | मिरची | 2 kg | 40 | 80 |
2) | शेंगदाणे | 500 ग्रॅम | 120 | 60 |
3) | तेल | 500 ग्रॅम | 130 | 65 |
4) | मीठ | 50 ग्रॅम | 15 | 0.75 |
5) | लसूण | 200 ग्रॅम | 40 | 8 |
6) | गॅस | 180 ग्रॅम | 1100 | 13.94 |
7) | मजुरी 25% | 56.92 | ||
एकूण | 284.61 |
6)पाव तयार करणे .
साहित्य :-मैदा ,यीस्ट ,मीठ ,तेल ,ब्रेड इम्प्रूवेअर ,गॅस,इ .
कृती :-1)सुरुवातीला 7 kg मैदा घेऊन ,यीस्ट व पाणी एकत्र करून ठेवले . मैदयात चवीनुसार मीठ घातले .
2)त्यानंतर ब्रेड इम्प्रूवेअर टाकले .यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले .
3)त्यानंतर ट्रेला तेल लाऊन घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी फुगवण्यासाठी ठेवले .
4)त्यानंतर ट्रे ऑव्हन मध्ये ठेवले . पाव बेक करण्यासाठी 250 c तापमानाच्यावरती तापमान सेट केले .
5)पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लाऊन घेतले व थंड झाल्यावर उलटे करून घेतले .
6)7 kg मैदापासून 210 पाव तयार केले .
कॉस्टिंग
अ क्र | मटेरियल | वजन | दर/किलो | किंमत |
1) | मैदा | 7.5 kg | 35 | 262.5 |
2) | यीस्ट | 200 ग्रॅम | 500 | 100 |
3) | मीठ | 100 ग्रॅम | 15 | 1.5 |
4) | ओव्हन चार्ज | 1 यूनिट | 10 | 10 |
5) | ब्रेड इम्प्रूवेअर | 20 ग्रॅम | 50 | 50 |
6) | तेल | 100 ml | 130 | 13 |
7) | मजुरी 25% | 109.25 | ||
एकूण | 546.25 |
7)टोमॅटो सॉस तयार करणे .
साहित्य:-टोमॅटो ,साखर ,काळे मीठ ,गरम मसाला ,कांदा /लसूण ,व्हीनेगार ,गॅस ,पानी इ .
कृती :-1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ् धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला .
2)नंतर टोमॅटो स्वच्छ् पाण्यात घालून शिजवून घेतले . आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या
3)टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला .
4)आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला . त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला .
5)याबरोबरच मीठ व साखरही टाकली . हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले .
6)टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला .(1.6 kg )
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | टोमॅटो | 10 kg | 20 | 200 |
2) | साखर | 100 ग्रॅम | 37 | 3.7 |
3) | काळे मीठ | 5 ग्रॅम | 40 | 0.2 |
4) | गरम मसाला | 5 ग्रॅम | 500 | 2,5 |
5) | कांदा /लसूण | – | 5 | 5 |
6) | व्हीनेगार | 5 ml | 51 | 0.98 |
7) | गॅस | 180 ग्रॅम | 1100 | 13.94 |
8) | मजुरी 25% | 56.58 | ||
282.9 |
8)नानकटाई तयार करणे .
साहित्य :-मैदा ,डाळदा ,पिठी साखर ,ट्रे ,तेल इ .
कृती :-1)सर्वप्रथम 200 ग्रॅम डाळदा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठी साखर 200 ग्रॅम चालून टाकली .
2)नंतर मग त्यात 250 ग्रॅम मैदा टाकला व फ्लेवरचा 1 थेंब टाकला .(लिंबू फ्लेवर )
3)व ते मिश्रण मळून घेतले . आणि साच्याने वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केल्या .
4)आणि ओव्हनमध्ये 150 c ते 180 c तापमानाला बेक केल्या .
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | मैदा | 250 ग्रॅम | 35 | 8.75 |
2) | डाळदा | 200 ग्रॅम | 46 | 9.2 |
3) | पिठी साखर | 200 ग्रॅम | 130 | 26 |
4) | ओव्हन चार्ज | 1 यूनिट | 10 | 10 |
5) | पॅकिंग बॉक्स | 1 | 5 | 5 |
6) | मजुरी 25% | 14.73 | ||
73.68 |
9)पिझ्झा तयार करणे .
साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.
कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.
2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.
3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.
4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.
5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.
6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.
कॉस्टिंग:-
निरीक्षण :-
1)वेगवेगळ्या आकाराचे पिझ्झे तयार केले.
2)पिझ्झा थोडा खारट होता .
. 3)शाकाहारी पिझ्झा तयार केला .
10)बटर तयार करणे .
साहित्य :मैदा ,साखर,यीस्ट ,बटर,तूप, इ.
कृती:-1)सर्वप्रथम 500ग्रॅम मैदा ,10ग्रॅम यीस्ट ,10ग्रॅम साखर आणि 30ग्रॅम बटर मोजून घेतले .
. 2)मग यीस्ट+साखर पाण्यात टाकून मिश्रण तयार केले .ते मिश्रण मैदयात टाकले व मैदयाचे पीठ मळून घेतले .
. 3)त्या पिठात बटर वितळवून टाकले .आणि ते पीठ पुन्हा मळून घेतले.
. 4)मळून झाल्यावर 30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवले .
. 5)त्यानंतर मग पीठ फुगल्यानंतर त्या पिठापासून छोटे गोळे तयार केले .आणि ते पुन्हा फरमेंटेशसाठी ठेवले .
. 6)त्यानंतर ते पिठाचे गोळे ओव्हनमधे ठेऊन 250 तापमानाला बेक केले .आणि बटर तयार केले .
कॉस्टींग :-
निरीक्षण :-1)बटर कुरकुरीत झाले होते .
. 2)मीठ थोडे कमी होते .
. 3)काहींचा बेस जास्त भाजला गेला .
11) टोस्ट तयार करणे .
साहित्य :मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर,साखर ,मीठ इ.
कृती :- 1)सर्वप्रथम 250kg मैदा घेतला .त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.
. 2)ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले .
. 3)मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले .
. 4)नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले .
. 5)आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक केले .
. 6)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले .
कॉस्टींग :-
12)आवळा कॅण्डी तयार करणे.
साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.
कृती :-1)सुरुवातीला 1kg आवळे घेतले.
2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.
3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.
4)मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली.त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.
5)आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.
कॉस्टिंग
13)Ors तयार करणे.
साहित्य :-पाणी, साखर, मीठ, गॅस, इ.
कृती :-1)1लिटर पाणी घेतले.
2)ते पाणी उकळून घेतले.
3)उकवलेले पाणी थंड करून घेतले.
4)त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमच मीठ +6 चमच साखर टाकली.
5)अशाप्रकारे ors तयार केली.
निरीक्षण :- 1)जुलाब सारख्या आजारांना दूर करते .
2)शरीरातील पाणी rehydrat होत .
3)जिम करताना वापर.
14) पाणी परीक्षण करणे .
साहित्य :वॉटर टेस्ट बॉटल्स, वही,पेन ,टेस्ट पेपर, इ.
कृती :-1)दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या .
. 2)त्या दोन्ही बॉटल मद्ये टेस्ट पेपर टाकला.
. 3)एका बॉटल मद्ये किचन चे पाणी टाकले आणि दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी टाकले .
. 4)आणि त्या दोन्ही बॉटलवर तारीख आणि वेळ लिहिली.
निरीक्षण :-
. 1)एका बॉटल मद्ये किचन च पाणी घेतले ते 24 तासानंतर काले झाले .त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही.
. 2)दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी घेतले ते 24 तासानंतर पांढर च राहिलं त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे .
15) केक तयार करणे .
साहित्य :- प्रिमिक्स पावडर ,केक टिन,जॅम,पाणी,क्रीम,,वेगवेगळ्या फुलांचे साचे इ.
कृती :-1) सर्वप्रथम 300 ग्रॅम प्रिमिक्स पावडर घेतली.त्यामधे 200 ml पाणी टाकले व ढवळून घेतले.
2)केक टिनला आतून बटर लाऊन मैदया चे पीठ लावले . आणि प्रीमिक्स पावडरचे मिश्रण टाकले. व तो केक टिन गॅसवर कूकरवर ठेवला . आतील मिश्रणाला बेक करून घेतला .
3)बेक झालेला भाग सुरीने कापून घेतला . त्यावर जॅम लावला . आणि त्यावर साखरेचा पाक लाऊन त्यावर क्रीम लावली.
4)तसेच आम्ही पुनः एक भाग कट केला आणि पाहिल्या भागाच्या वरती ठेवला . पुनः त्यावर जाम लाऊन क्रीम लावली .
5)हे झाल्यावर त्यावर वेगवेगळ्या आकाराची क्रिममध्ये रंग टाकून केक वर डिझाइन करून घेतली . आम्ही 1.5 kg केक तयार केला .
costing ;-
16)रक्तगट तपासणे .
साहित्य:-स्पिरीट ,कापूस,स्लाइड काचपट्टी ,हातमोजे ,lancet इ .
कृती :- 1)उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला स्पिरीट करून निर्जंतुक केले.
2)त्यानंतर lancet च्या मदतीने टोचले .
3)मग काचपट्टीवर रक्ताचे तीन थेंब घेतले .
4)पाहिल्या थेंबात anti -a ,दुसऱ्या थेंबात anti -b ,आणि तिसऱ्या थेंबात anti -d एक एक थेंब टाकले .
5)त्यानंतर त्या थेंबाचे निरीक्षण केले .
17)रक्तदाब तपासणे .
रक्तदाब म्हणजे काय ?
आपल हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते ,तेव्हा तिथे दाब निर्माण होतो ,त्या दाबास रक्तदाब म्हणतात .
रक्तदाबचे दोन प्रकार :-
1)उच्च रक्तदाब .
2)कमी रक्तदाब .
रक्तदाब तपासणी :-
निरीक्षण :-
1)उच्च रक्तदाब हा 140/90 mm/hg असतो .
2)कमी रक्तदाब हा 120/80 mm/hg असतो .
18)चॉकलेट तयार करणे .
साहित्य :-साखर,कोको पावडर ,दूध पावडर ,bowl ,बटर ,दूध ,गॅस इ .
कृती :- 1)सुरुवातीला बटर वितळवले .
2)त्यात साखर+कोको पावडर +दूध+फ्लेवर टाकून मिश्रण केले .
3)मिश्रण पूर्ण पातळ केले .
4)ते मिश्रण चॉकलेट कंपाऊंड मध्ये ओतले .
5)फ्रिजरला ठेवले .(कडक होण्यास )
6)पॅकिंग केले .
costing :-
अ क्र | मटेरियलचे नाव | वजन | दर | किंमत |
1) | कोको पावडर | 30 ग्रॅम | 480 रु | 14.40 |
2) | साखर | 120 ग्रॅम | 37 रु | 4.40 |
3) | बटर | 50 ग्रॅम | 480 रु | 24.00 |
4) | दूध पावडर | 30 ग्रॅम | 446रु | 13.38 |
5) | दूध | 25 ग्रॅम | 40/1 lit | 1.00 |
6) | फ्लेवर | 5 ml | 42/20 ml | 10.50 |
7) | गॅस चार्ज | 40 ग्रॅम | 1100/14200 ग्रॅम | 3.09 |
8) | फ्रीज | 1/2 यूनिट | 7रु | 3.50 |
9) | पॅकिंग | – | – | 2.00 |
10) | मजूरी 25% | – | – | 19.06 |
एकूण | 95.33 |
19)खारी बनवणे .
साहित्य :-मैदा,साखर ,मीठ ,जिरं ,तूप ,डाळदा इ .
कृती :-१)सुरुवातीला मैदा घेतला .
२)त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले व पानी टाकले आणि मळून घेतले .
३)मळून झाल्यानंतर ते पीठ 10 मिनिटे फ्रीजला ठेवले .
4)त्यानंतर टेबलवर डाळदा घेऊन त्यात जिरं टाकला आणि तो मिक्स करून घेतला .
5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पितर चपातीसारख लाटून घेतले . ते झाल्यावर डाळदा लाऊन घेतला तसेच साखर टाकली .
6)आणि पुस्तकासारखी घडी मारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले . असे आम्ही 4 वेळा केले .
7)त्यानंतर मग पुन्हा चपतीसारख लटू खारीच्या आकरसारख तुकडे कट करून घेतले .
8)आणि ओव्हन मध्ये 150 ते 180 तपमानळा बेक केले .
निरीक्षण :-
1)घरगुती खारी तयार केली .
2)वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .
costing :-
अ. क्र | मटेरियल | वजन | दर | किंमत |
1) | मैदा | 500 ग्रॅम | 35 रु | 17.5/- |
2) | डाळदा | 110 ग्रॅम | 46 रु | 5.06/- |
3) | साखर | 20 ग्रॅम | 37 रु | 0.74 /- |
4) | मीठ | 3 ग्रॅम | 15 रु | 0.045/- |
5) | जिरं | 5 ग्रॅम | 300 रु | 1.5/- |
6) | बटर | 10 ग्रॅम | 220 रु | 2.2/- |
7) | मंजूरी | 25% | 6.76/- | |
एकूण | 33.80/- |
20)हिमोग्लोबिन तपासणे .
शोध :-
हिमोग्लोबिनचा शोध मॅक्स पेरूत्झ या वैज्ञानिकानी सन इ .1959 मध्ये लावला .
कार्य :-
आपल्या शरीराला प्राणवायू पुरवणे . आणि कार्बन oxcide फुप्फुसा पर्यंत पोहचवणे काम करते .
साहित्य :-
1)हिमोमीटर
2)पिपेट
3)टेस्ट ट्यूब
4)ग्लास रॉड
5)ब्रश
निरीक्षण :-
1)पुरुषा मध्ये HB चे प्रमाण 16 ते 18 ग्रॅम असते .
2)स्त्रियांमध्ये HB चे प्रमाण 12 ते 14 ग्रॅम असते .
.
.
.