पाव*
उद्देश :मऊ पाव बनवता येणे .
साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …
कृती :कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .
मैद्याचे पीठ चाळून घ्यावे .
त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .
उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा.
पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे .
त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे.
कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे .
(आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)
त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .
त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत.
ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे .
मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.
निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते .
*शेंगदाण्याची चिक्की तयार करणे*
उद्देश :वेगवेगळ्या पदार्थापासून चिक्की पासून चिक्की बनवणे .
साहित्य :शेंगदाणा ,गुळ ,तेल ,इत्यादी ,,,,
साधन :कढई ,उलथनं ,वजन काटा ,प्याकिंग बॉक्स ,पक्कड ,ट्रे ,रोलर ,,,इत्यादी
कृती :
१}प्रथम शेंगदाणा ,गुळ वजन करून घेणे .
२}शेंगदाणे साफ करून घेणे व ग्यास मिडीयम ठेऊन शेंगदाणा भाजून घ्यावे .
३}भाजलेले शेंगदाण्याचे साल काडून मिक्सरला बारीक करून घ्यावे .
४}ग्यास वर कढई ठेऊन गुळाचा पाक करून घ्यावा .
५}पाक होईपर्यंत ट्रेला तेल लावून घेणे .
६}तसेच रोलर आणि कटर ला तेल लावून घेणे . (तेल लावण्याने मिश्रण चिटकत नाही.)
७}पाक बनवताना लक्ष्यात ठेवा कि पाक गोळीबंद झाला पाहिजे .
८}पाक व्यवस्तीत तयार झाल्यावर शेंगदाणे बारीक झालेले त्यात टाकावे .
९}एकत्र मिश्रण करून घेणे .
१०}मिश्रण ट्रे मध्ये टाकून घेणे ,आणि ते लाटून घ्यावे व कटर ने कट करणे .
११}चिक्की थंड झाल्यावर प्याकिंग करून सिलर लावणे .