प्रस्तावना

मोरिंगा हा एक असा औषधी गुणधर्म असलेला व पोशान्मुल्यानी भरलेला पाधार्थ आहे . मोरीगमध्ये क्याल्शियाम , आयर्न , प्रोटीन विटामिन A , C यांचे प्रमाण खूप जास्त आहे . त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हाडे मजबूत होतात .

उद्देश

1 : पौष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे .

2 : ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे .

3 : मुलांच्या पोषणात सुधारणा करणे .

साहित्य

1 : १५०० किलो शेंदाने

2 : 1 किलो जवस

3 : 1 किलो तीळ

4 : 100 ग्राम मोरिंगा पावडर

५ : २५ ग्राम तूप

६ : ७५० ग्राम गुळ

आवश्यक साधने

काढई / पातेल

गॅस शेगडी

चमचे , कलथा

पाट – लाटणे /रोलिंग पिन

चाकू व सुरी

वजनकाटा

हायजेनिक पॅकिंग

कृती

शेंगदाणे , जवस , तीळ , भाजून घ्यावेत .

कढईत गूळ टाकून वितळून घ्यावे त्यानंतर तूप टाकून ते मिक्ष करून घ्यावे .

पाक योग्य होईपर्यंत तो गरम करावा .

त्यात मोरिंगाची पावडर आणि शेंगदाणे , जवस , तीळ मिश्र करावे .

थोड तूप लाऊन मिश्रण पाटावर ओतून लाटण्याने पसरावे .

गरम असतानाच चौकोनी / गोल आकारात कापून घ्यावे .

थंड झाल्यावर हायजेनिक पॅकिंगमध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे .

त्यातून काय शिकलो

मोरिंगाचे महत्त्व –
मोरिंगा म्हणजे शेवगा हा पोषणमूल्यांनी समृद्ध असा वनस्पती आहे. त्याच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया सर्वच उपयोगी आहेत.

पौष्टिक मूल्य –
मोरिंगाच्या पानांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (A, C) व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

औषधी उपयोग –

  • रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त.

अन्न व स्वयंपाकातील उपयोग –

  • मोरिंगाची पाने भाजी, सूप, पोहे, पराठा यामध्ये वापरतात.
  • शेंगा सांबर व इतर भाज्यांमध्ये वापरतात.

पर्यावरणपूरकता –
मोरिंगा झाड जलद वाढते आणि जमिनीची सुपीकता .

निरीक्षण

  • मोरिंगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागली.
  • चिक्की खुसखुशीत व पौष्टिक होती.
  • बनवण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे.

निष्कर्ष

या प्रकल्पातून आम्हाला कळले की मोरिंगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुरतेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असते. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्थानिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो.

शिकलो ते

  • पोषक अन्न तयार करण्याचे कौशल्य
  • गटाने काम करण्याचे महत्त्व
  • स्थानिक शेती व झाडांचा उपयोग
  • आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नव्या कल्पना