१) प्रस्तावनारागी (नाचणी) हे कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध धान्य आहे. रागीपासून तयार केलेले चॉकलेट हे चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यदायी उत्पादन आहे. हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असून पोषणमूल्य वाढविण्यास मदत करते. कमी खर्चात तयार होणारे हे उत्पादन घरगुती उद्योगासाठीही फायदेशीर आहे.
कॉस्टिंग
क्र.मटेरियल वजन. दर /kg किंमत (₹)
1नाचणी पीठ15 gm. 70 1.05
2तूप. 2gm. 850. 1.70
3Dark Compound. 40 gm. 342. 13.68
4White Compound. 40 gm. 396. 15.84
5काजू 5 gm. 1000. 5.00
6बदाम. 5 gm. 1000. 5.00
7ग्लॉस पेपर. 90 gm. 141. .26 8फॉइल पेपर. 1 नग–. 10 9.इंधन खर्च. 1 युनिट–. 10 तपशीलरक्कम (₹)
एकूण साहित्य खर्च63.53
मजुरी (25%)15.88
एकूण खर्च79.414
बॅचचा एकूण खर्च317.64
उत्पादनएकूण चॉकलेट = 52
नगएका चॉकलेटची किंमत = ₹6.10
—२) साहित्य व प्रमाण
अनुक्रमांक साहित्य प्रमाण
1 नाचणी पीठ 15 ग्रॅम
2 तूप 2 ग्रॅम
3 डार्क कंपाऊंड 40 ग्रॅम
4 व्हाईट कंपाऊंड 40 ग्रॅम
5 काजू 5 ग्रॅम
6 बदाम 5 ग्रॅम
7 ग्लॉस पेपर. 90 ग्रॅम
8 फॉइल पेपर आवश्यकतेनुसार
9 इंधन/वीज 1 युनिट–
-३) कृती
1. नाचणी पीठ मंद आचेवर हलके भाजून घ्यावे.
2. डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड वेगवेगळे वितळवावे.
3. वितळलेल्या कंपाऊंडमध्ये तूप व भाजलेले नाचणी पीठ मिसळावे.
4. त्यामध्ये काजू व बदामाचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावे.
5. तयार मिश्रण चॉकलेट मोल्डमध्ये भरावे.
6. मोल्ड 20–30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून चॉकलेट सेट होऊ द्यावे.
7. सेट झाल्यावर चॉकलेट मोल्डमधून अलगद काढावे.
8. फॉइल पेपर व ग्लॉस पेपरमध्ये आकर्षक पॅकिंग करावे.-
-५) पॅकेजिंग
प्रत्येक चॉकलेट प्रथम फॉइल पेपरमध्ये गुंडाळावे.त्यानंतर ग्लॉस पेपरमध्ये आकर्षक पॅकिंग करावे.उत्पादनावर नाव, वजन, तयार करण्याची तारीख व वापरण्याची अंतिम तारीख (Expiry Date) नमूद करावी.स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावे.–
-६) वापरण्याची पद्धत
चॉकलेट थेट खाण्यासाठी तयार आहे.थंड व कोरड्या ठिकाणी साठवावे.मुलांच्या डब्यात, नाश्त्यात किंवा अल्पोपहार म्हणून वापरता येते.-
–७) याच्यातून काय शिकलो?
रागीपासून पौष्टिक चॉकलेट तयार करण्याची प्रक्रिया समजली.अन्नपदार्थाचे योग्य प्रमाण व मिश्रण कसे करावे हे शिकता आले.उत्पादनाची कॉस्टिंग कशी करावी हे समजले.पॅकेजिंगचे महत्त्व आणि उत्पादनाचे सादरीकरण कसे करावे हे शिकता आले.स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसायासाठी उत्पादन तयार करण्याचे ज्ञान मिळाले.-
–८) टिप्स
नाचणी पीठ जास्त भाजू नये, अन्यथा चव बदलते.कंपाऊंड वितळवताना पाणी जाऊ देऊ नये.मोल्ड पूर्णपणे स्वच्छ व कोरडा असावा.चॉकलेट पूर्ण सेट झाल्यावरच मोल्डमधून काढावे.पॅकेजिंग करताना हात स्वच्छ ठेवावेत.-
–९) निष्कर्ष
रागी चॉकलेट हा पौष्टिक, चविष्ट आणि आकर्षक खाद्यपदार्थ आहे. कमी खर्चात उच्च दर्जाचे उत्पादन तयार करून त्याची विक्री करता येते. त्यामुळे हा घरगुती उद्योगासाठी तसेच लघुउद्योगासाठी एक चांगला व्यवसायिक पर्याय ठरू शकतो.