मोरिंगा चिक्की

प्रस्तावना:-

मोरिंगा हा एक असा औषधी गुणधर्म असलेला व पोश्न्मुल्यानी भरलेला पदार्ध आहेत. मोरिगामध्ये क्याल्शिय्म, आयर्न, प्रोटीन,विटामिन A,C यांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि हाडे मजबूत होतात.

उधेश:-

१) पोष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे

२) ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे.

३) मुलांच्या पोषणात सुधारणा करणे.

साहित्य:-

१) १५०० किलो शेगदाणे

२) १ किलो जवस

३) १ किलो तीळ

४) १०० gm मोरिगा पावडर

५) २५ gm तुप

६) ७५० gm गुळ

आवश्यक साधने:-

काढई/पातेल

gas/शेगडी

चमचे/कलधा

चाकू/सुरी

वजन काटा

कृती:-

शेगदाणे, जवस, तीळ, भाजून घ्यावेत

कढईत गुळ टाकून वितळून घ्यावा त्यानंतर तूप टाकून ते मिश्रण करून घ्यावे पाक योग्य होईपर्यत तो गरम करावा. त्यात मोरीगाची पावडर आणि शेगदाणे, जवस, तीळ, मिश्रन करावे. धोडे तूप लावून मिश्रण पटावर ओतून लाटण्याने पसरावे. व गरम असताना चोकोनी/ गोल आकारात कापून घ्यावे. थंड झाल्यावर हायजेनिक
पोकिगमध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे.

निरीक्षण:-

मोरिगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागली.

चिक्की खुसखुशीत व पोष्टिक आहे.

बनवण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे.

निष्कर्ष:-

या प्रकल्पातून आम्हाला कळलेकि मोरिगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुरतेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की पोष्टिक आणि चविष्ट असते. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्थानिक संसाधनाचा योग्य उपयोय होतो.

खर्च:-

मटेरियलवजनदर/kgकिमत
१) शेगदाणे२०० gm१३० rs२६
२) तीळ१२० gm२०० rs२४
३) जवस८० gm१२० rs९.६
४) तूप४० gm६०० rs१२
५) gas१२० gm८७० gm/ unit७.४५
६) गुळ४०० gm४५ rs१८
७) पेकिंग बॉक्स२ बॉक्स५ rs१०
८) स्टीकर१.५
९) मिक्सर चार्जेस१/२ unit१० rs/ unit
१०) मोरिगा पावडर२० gm६०० rs१२
मजुरी४८७१८७

फॉलो चार्ट:-

मोरिंगा बिया / पाने निवडणे ⬇️ स्वच्छ धुणे ⬇️ बिया भाजणे / पाने वाळवणे ⬇️ बारीक कुटणे / पूड करणे ⬇️ शेंगदाणे भाजणे व कुटणे ⬇️ गूळ किसून वितळवणे ⬇️ गुळात तूप घालणे ⬇️ मोरिंगा पूड व शेंगदाणे घालणे ⬇️ मिश्रण नीट ढवळणे ⬇️ मिश्रण तुपाच्या पाटावर पसरवणे ⬇️ चाकूने वड्या पाडणे ⬇️ थंड होऊ देणे ⬇️ मोरिंगा चिक्की तयार

पाव

प्रस्तावना:-

आपल्या महाराष्ट्रत पाव नाष्ट्याला खूप प्रमाणात खाल्ला जातो. मग तो मिसळ पाव,वडा पाव,भजी पाव,असे इत्यादी प्रकरचे नाष्टात पावाचा वापर केला जातो.

उद्देश:-

पाव तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे.

स्वच्छता आणि अन्नसुरक्षा यांचा अभ्यास करणे.

छोटा व्यवसाय उत्पादनाची मुलभूत माहिती मिळवले.

साहित्य:-

१) मैदा

२) इस्ट

३) साखर

५) मीठ

६) कोमट पाणी

७) तेल/बटर

८) ब्रेट एम्प्रुअर

प्रकिया:-

(१) पीठ मिसळून घेणे

एका भांड्यात पीठ,साखर,मीठ एकत्र मिसळा.

इस्ट कोमट पाण्यात सक्रीय करा.

हे मिश्रण पिठात घालून नरमल कणिक मळा.

थोडे तेल लावून कणिक झाकून ठेवा

(२) फर्मेटेशन

पीठ १-२ तास झाकून ठेवावी.

पिठाच्या दुप्पट झाल्यावर ते तयार झाल्याने समजते.

(३) पावांना आकार देणे

पीठाचे छोटे समान गोळे बनवा.

तेल लावून ठेवावे.

निरीक्षण:-

फर्मेटेशन योग्य झाले तर पाव नीट होतात.

ओव्हनचे तापमान जास्त असल्यास पाव जळू शकतात.

कमी बेकिंग झाल्यावर पाव कच्चा रातो.

योग्य प्रमाणात इस्ट वापरल्याने पाव चागले होतात.

निष्कर्ष:-

या प्रोजेक्टमधून पाव बनवायला शिकलो. फर्मेटेशन,तापमान,स्वच्छताआणि साहित्याचे प्रमाण यांचा पावाच्या गुणवत्तेवर मोठापरिणाम होतो.

खर्च:-

क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत
१)मैदा७ kg४०/kg२८०
२)इस्ट१५० kg१६०/kg२४.००
३)साखर१५० kg४१/kg६..१५
४)मीठ१२० kg१५/kg१.८
५)ब्रेड इंम्र्पूअर१४ kg१३०/kg३.६४
६)ओव्हन चार्जेस१ unit१४ rs/ unit१४ .००
७)तेल१०० kg१३०/kg१३.००
मजुरी४६५

फॉलो चार्ट:-

मैदा निवडणे ⬇️ मैदा चाळणे ⬇️ यीस्ट साखर व कोमट पाण्यात विरघळवणे ⬇️ मैद्यात मीठ, साखर, तेल घालणे ⬇️ यीस्ट मिश्रण घालून पीठ मळणे ⬇️ पीठ झाकून फुलवणे (१–२ तास) ⬇️ पीठाचे गोळे करून आकार देणे ⬇️ ट्रेवर ठेवून पुन्हा फुलवणे ⬇️ ओव्हनमध्ये भाजणे ⬇️ थंड होऊ देणे ⬇️ पाव तयार

पिझ्झ

प्रस्तावना:-

पिझ्झा हा जगभर लोकप्रिय असलेला एक स्वादिष्ट इटालियन पदार्थ आहे. मैद्याच्या पातळ किंवा जाड कणकेच्या बेसवर विविध भाज्या, चीज, सॉस आणि मसाले घालून तयार केला जाणारा पिझ्झा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. काळानुसार पिझ्झामध्ये अनेक बदल झाले असून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा जसे की वेजी पिझ्झा, चीज बर्स्ट, पेपरोनी, मार्घेरिटा इत्यादी चवीत उपलब्ध पाहतो. घरी तसेच हॉटेलमध्ये सहज बनणारा हा पदार्थ चविष्ट, पौष्टिक आणि आधुनिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक मानला जातो.

उद्देश:-

पिझ्झा तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा खाद्यपदार्थ बनवणे. पिझ्झाच्या माध्यमातून विविध भाज्या, चीज आणि सॉस यांच्या संयोजनातून चव आणि पोषण यांचा उत्तम समतोल साधता येतो. स्वयंपाक कौशल्य विकसित करणे, नवीन चवींचे प्रयोग करणे आणि कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आनंदाने खाता येईल असा आकर्षक पदार्थ तयार करणे हा देखील पिझ्झा बनवण्यामागील उद्देश आहे.

साहित्य:-

पिझ्झा सॉस / टोमॅटो सॉस

मोझरेला चीज

कांदा – चिरलेला

टोमॅटो – चिरलेला

स्वीट कॉर्न

पनीर / मशरूम

ओरेगानो, चिली फ्लेक्स

कृती:-

पिझ्झा बेस तयार करण्याची कृती

1.एका भांड्यात कोमट पाणी, साखर आणि ड्राय यीस्ट एकत्र करून 5 मिनिटे झाकून ठेवा, ज्यामुळे यीस्ट सक्रिय होईल.

2.दुसऱ्या भांड्यात मैदा, मीठ आणि तेल घालून मिसळा.

3.कणीक 5–7 मिनिटे मळून एका भांड्यात तेल लावून झाकून 1 तास उठू द्या.

4.कणीक फुगल्यानंतर तिला गोल आकारात पातळ किंवा जाड बेस लाटून तयार ठेवा.

पिझ्झा बनवण्याची कृती

1.तयार बेसवर हलका टोमॅटो/पिझ्झा सॉस पसरवून घ्या.

2.त्यावर मोझरेला चीज समान प्रमाणात भुरा.

3.इच्छेनुसार कापलेले कांदे, टोमॅटो, कॅप्सिकम, स्वीट कॉर्न, ऑलिव्ह किंवा पनीरचे तुकडे ठेवू शकता.

4.वरून ओरेगानो आणि चिली फ्लेक्स भुरभुरा

5.पिझ्झा ओव्हनमध्ये 180°C तापमानावर 12–15 मिनिटे बेक करा. (ओव्हन नसल्यास पॅनमध्ये झाकून मध्यम आचेवर 10–12 मिनिटे शिजवू शकता.)

6.चीज पूर्णपणे वितळून बेस खुसखुशीत झाल्यावर पिझ्झा तयार आहे.

निरीक्षण:-


पिझ्झा बेक करताना चीज हळूहळू वितळू लागते आणि सोनेरी रंग येऊ लागतो.भाज्या शिजून थोड्या मऊ होतात पण त्यांचा कुरकुरीतपणा कायम राहतो.बेसची कडा बेक होताना फुगतात आणि खुसखुशीत दिसू लागतातपिझ्झा पूर्ण तयार झाल्यावर सुगंध खूप आकर्षक जाणवतो.काट्याने हलके दाबल्यास बेस खालीपासून कुरकुरीत आणि वरून मऊ असा दिसतो.

निष्कर्ष:-

पिझ्झा हा सोपा, स्वादिष्ट आणि पोषक पदार्थ असून तो घरच्या घरी सहज बनवता येतो. योग्य प्रमाणात बेस, सॉस, चीज आणि भाज्यांचा वापर केल्यास पिझ्झा अधिक चवदार तयार होतो. बेकिंगच्या प्रक्रियेमुळे बेस खुसखुशीत आणि टॉपिंग स्वादिष्ट बनते. पिझ्झा तयार करताना स्वयंपाक कौशल्य वाढते आणि नवीन चवींचा अनुभव मिळतो. त्यामुळे पिझ्झा हा सर्व वयोगटांना आनंद देणारा आणि नेहमीच लोकप्रिय ठरलेला पदार्थ आहे.

खर्च:-

मटेरियलवजनदर/kgकिंमत
मैदा१ किलो३४ rs३४.००
इस्ट20 gm१४० rs२.८००
साखर20 gm४२ rs०.८४
मीठ20 gm20 rs०.४०
तेल५ gm१३० rs०.६५
बटर५० gm२२० rs11.००
चीज२०० gm४५० rs१३०.००
टोमॅटो२५० gm१० rs२.५०
शिमला मिरची२५० gm१० rs२.००
कांदा२५० gm१० rs२.००
मसाला___१०.००
ओव्हन चार्जेस1 unit१४/rs१४.००
२११.१९
७३.९१
२८५.१०

शेगदाना चिक्की

प्रस्तावना:-

शेंगदाणा चिक्की हा पारंपारिक भारतीय गोड पदार्थ असून तो मुख्यतः भाजलेल्या शेंगदाणे आणि गुळ यांच्या संयोगातून तयार केला जातो. हिवाळ्यात विशेष लोकप्रिय असलेली ही चिक्की कुरकुरीत, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते. साधी रेसिपी, कमी साहित्य आणि जास्त चव यामुळे हा पदार्थ घराघरात आवडीने बनवला जातो. गुळातील खनिजे आणि शेंगदाण्यातील प्रथिने व चांगले फॅट्स यामुळे शेंगदाणा चिक्की हा चविष्ट तसेच आरोग्यदायी स्नॅक मानला जातो.

उद्देश:-

शेंगदाणा चिक्की बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पौष्टिक, ऊर्जादायी आणि दीर्घकाळ टिकणारा असा पारंपारिक गोड पदार्थ तयार करणे. गुळातील खनिजे आणि शेंगदाण्यातील प्रथिने यांचा योग्य संगम झाल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. हिवाळ्यात उष्णता देण्यासाठी आणि मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यपूरक स्नॅक म्हणून वापरणे हेही तिच्या तयार करण्याचे प्रमुख उद्देश आहेत. बाजारापेक्षा स्वच्छ, शुद्ध आणि कमी खर्चात घरी बनवण्यासाठीही शेंगदाणा चिक्की हा उत्तम पर्याय ठरतो.

साहित्य:-

शेंगदाणे

गूळ

तूप

वेलची पावडर

पाणी

कृती:-

1.शेंगदाण्यांची तयारी:

शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या.

थंड झाल्यावर त्यांची साल काढून हलके हाताने दाबून दोन भाग करा.

2. गूळ वितळवणे:

कढईत 1–2 टीस्पून तूप गरम करा.

त्यात गूळ आणि थोडेसे पाणी घाला.

मंद आचेवर सतत ढवळत गूळ पूर्णपणे वितळू द्या.

3.गुळाची चाशनी तपासणे:

गूळ वितळून बुडबुडे येऊ लागले की चाशनी थोडी घट्ट होते.

एका वाडग्यात थंड पाणी घ्या आणि चाशनीचा थेंब सोडा.

तो थेंब पाण्यात टाकल्यावर कडक गोळी सारखा झाल्यास चाशनी योग्य झाली आहे.

4.मिश्रण तयार करणे:

चाशनी तयार झाल्यावर आच कमी करा.

त्यात भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पावडर घालून चांगले मिसळा.

सर्व शेंगदाण्यांना गुळाचा लेप समान लागला पाहिजे.

5.चिक्की सेट करणे:

तूप लावलेल्या ताटात किंवा प्लॅटफॉर्मवर मिश्रण पसरवा.

लाटण्याने समान जाडीचे पातळ करून घ्या.

अजून गरम असतानाच सुरीने आवडीनुसार तुकडे कापा.

6.थंड करून साठवणे:

चिक्की पूर्णपणे थंड झाल्यावर तुकडे वेगळे करा.

हवाबंद डब्यात साठवा.

निरीक्षण:-

शेंगदाणे योग्य प्रकारे भाजल्यास त्यांचा सुगंध आणि कुरकुरीतपणा वाढतो.
गूळ वितळताना त्याचा रंग हलका सोनेरी होतो आणि हलका सुगंध येऊ लागतो.
चाशनी योग्य “गोळी” पातळीवर आली की चिक्की अधिक कुरकुरीत तयार होते.
शेंगदाणे गुळात मिसळताना सर्व दाण्यांवर समान लेप बसणे आवश्यक असते, अन्यथा काही भाग मऊ किंवा कोरडे राहू शकतात.
मिश्रण गरम असतानाच ताटात पसरवले तर ते सपाट आणि समान जाडीचे होते.
योग्य वेळी तुकडे कापले नाहीत तर चिक्की थंड झाल्यावर तुटण्याची शक्यता वाढते.
तयार चिक्कीचा रंग सोनेरी तपकिरी आणि टेक्स्चर कुरकुरीत पण व्यवस्थित बांधलेले दिसते.

निष्कर्ष:-

शेंगदाणा चिक्की हा पारंपारिक, पौष्टिक आणि ऊर्जादायी असा भारतीय गोड पदार्थ आहे. कमी साहित्य, सोपी कृती आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता यामुळे हा पदार्थ घराघरात लोकप्रिय आहे. योग्य प्रमाणात गूळ आणि शेंगदाण्यांचा वापर, तसेच चाशनीची योग्य पातळी ठेवणे हे कुरकुरीत आणि चविष्ट चिक्की बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे. शेंगदाणा चिक्की हा आरोग्यदायी स्नॅक म्हणूनही उत्तम पर्याय ठरतो, कारण तो गुळातील खनिजे आणि शेंगदाण्यातील प्रथिने यांचा उत्तम संगम देतो.

खर्च:-

मटेरियलवजनदर/kgकिंमत
शेगदाना५०० gm१३० rs६५.००
साखर५०० gm४२ rs२१.००
तेल५ gm१३० rs०.६५
gas३० gm८७० rs/१४ kg१.८६
पोकिंग बॉक्स२ box१० rs/बॉक्स20.००
१०८.५१
३७.००
१४२

प्रस्तावन

भारतामध्ये चहा चहा हा प्रत्येक घरात अविभाज घटक आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही यला तयार असणारा हा पेय अनेकाचा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे या प्रोजेक्टमध्ये आपणच साधा समृद्धी आणि चविष्ट चहा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत.

साहित्य

पाणी १००ml

दुध ३ लिटर

साखर ५ चमचा

आल (ठेचलेला ) 10gm

इलायची ४ ते ५ (ठेचून )

चहा पावडर २ चमचा

कृती

सुरुवात


पाणी घ्या


पाणी गरम करा


साखर टाका? ──► (होय/नाही)


चहा पत्ती टाका व तुम्हाला हव तस त्यत आलं, इलायची ,हे ठेचून टाका


उकळी येऊ द्या


दूध टाका


पुन्हा उकळी येऊ द्या


गॅस बंद करा


चहा गाळून घ्या


चहा तयार


समाप्त

निष्कर्ष

चहा हा भारतीय संस्कृतीतील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याची चव, सुवास आणि ताजेतवाने करणारी उब मनाला आनंद देते. सकाळची सुरुवात असो, थकवा घालवायचा असो किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा – चहाचं स्थान कायम खास असतं. योग्य प्रमाणात घेतल्यास चहा ऊर्जा वाढवतो, मन ताजेतवाने करतो आणि दिवसाची सुरुवात आनंदी करतो.

कास्टिंग

मटेरियलवजनदरकिमंत
साखर300 GM42 RS१२.६०
चहा पावडर80 GM51 RS45 .60
पाणी1.5 RT20 RS1.50
gas चार्जेश90 GM1650 \
19KG
7.81
दुध3.5 RT50 RS775.5
मजुरी ३५ %एकून ; ३२.३