शेती विभाग माती परीक्षणमाती परीक्षणाचे उद्दिष्टजमिनीचा pH तपासणे.नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) यांचे प्रमाण जाणून घेणे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तपासणे.सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक, लोह, बोरॉन इ.) उपलब्धता समजून घेणे.योग्य खत व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करणे.मातीचा नमुना कसा घ्यावा?शेतातील ८ ते १० ठिकाणांहून माती घ्यावी.वरचा कचरा काढून १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंत माती घ्यावी.सर्व माती एकत्र करून चांगली मिसळावी.सुमारे ५०० ग्रॅम नमुना स्वच्छ पिशवीत भरावा.त्यावर शेतकऱ्याचे नाव, गाव, गट क्रमांक, पिकाचे नाव इत्यादी माहिती लिहावी.प्रयोगशाळेमध्ये होणाऱ्या चाचण्याpH चाचणीविद्युत चालकता (EC)सेंद्रिय कर्बनत्र (N)स्फुरद (P)पालाश (K)सूक्ष्म अन्नद्रव्येआवश्यक साहित्यटेस्ट ट्यूबबीकरpH मीटरकलर टेस्ट स्ट्रिपरसायनेडिस्टिल्ड पाणीमोजमाप उपकरणेमाती परीक्षणाचे फायदेयोग्य खतांचा वापर करता येतो.उत्पादनात वाढ होते.खर्च कमी होतो.जमिनीची सुपीकता टिकते.पर्यावरणाचे संरक्षण होते.पिकांची गुणवत्ता सुधारते.
