Soil Testing म्हणजे मातीची तपासणी.

यामध्ये मातीमध्ये असलेले पोषक घटक, pH, ओलावा आणि सुपीकता तपासली जाते.

यामुळे:

  • कोणते पीक घ्यावे हे समजते.
  • किती खत द्यावे हे ठरवता येते.
  • मातीची सुपीकता कळते.
  • पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.

Soil Testing का करावी?

मातीमध्ये पिकासाठी आवश्यक पोषक घटक किती आहेत हे जाणून घेण्यासाठी Soil Testing करावी.

याचे फायदे:

  1. मातीचा pH कळतो.
  2. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचे प्रमाण कळते.
  3. कोणते खत आणि किती प्रमाणात वापरावे हे समजते.
  4. योग्य पीक निवडता येते.
  5. पिकाचे उत्पादन आणि मातीची सुपीकता वाढवता येते.

Soil Testing

आज आम्ही लॅबमध्ये Prerana Kit च्या मदतीने मातीची तपासणी केली. मातीमध्ये असलेले N, P, K, OC, pH आणि EC हे 6 घटक तपासले. या तपासणीमुळे मातीमध्ये कोणते पोषक घटक आहेत आणि मातीची स्थिती कशी आहे हे समजले. माती परीक्षणामुळे पिकासाठी योग्य खत निवडण्यास मदत होते.


N – 14 0
P- 14
K-300
oc- 0.4
PH – 7.5
EC – 141


तपासणी केल्यानंतर आम्हाला मातीचा Result मिळाला. या Result मध्ये N, P, K, OC, pH आणि EC या 6 घटकांचे प्रमाण दिसून आले. या Result वरून मातीची स्थिती आणि मातीमध्ये असलेल्या पोषक घटकांची माहिती मिळाली.