कोट प्रोजेक्ट
उद्देश
गेस्ट हॉस्टेलमध्ये वापरासाठी कोट आणि बेडची आवश्यकता होती. त्या गरजेनुसार कोट तयार करणे, त्यासाठी लागणारा टेनि हाऊस तयार करणे आणि संबंधित बांधकाम करणे हा आमचा मुख्य उद्देश होता.
२. सर्वेक्षण (Survey)
आम्ही गेस्ट हॉस्टेलमध्ये जाऊन प्रत्येक रूममध्ये किती कोट बसू शकतील याचे मोजमाप आणि सर्वेक्षण केले. रूमचे आकार, जागा व कोटची बसवणी यांचा अभ्यास करून आवश्यक मापे काढली.
3. कृती
(A) टेनि हाऊस बांधकाम
- सर्वात प्रथम आम्ही टेनि हाऊस बांधण्याची तयारी केली.
- त्या जागी चार मजबूत स्तंभ (Pillars) उभे करून फ्रेम तयार केली.
- त्यावर आम्ही टीन क्लॅडिंग वॉल बसवले.
- भिंतींना योग्य मापाची फुटती (Cutting) करून खिडक्या व व्हेंटिलेशनची व्यवस्था केली.
- सर्व कोपरे भरून भिंती मजबूत केल्या.
- आतील बाजूने पॅनेल लावून फिनिश दिला.
- नंतर वायरिंग व लाईट फिटिंगचे काम पूर्ण केले.
- टेनि हाऊसच्या समोरील जागेला बॉर्डर मारून त्याला प्लास्टर केले.
- संपूर्ण टेनि हाऊस रंगवून पूर्ण फिनिशिंग दिली.
- मुख्य भिंतीसमोर पायऱ्या बांधून त्यांना प्लास्टर केले.
(B) गेस्ट हॉस्टेलमधील बांधकाम
- आम्हाला गेस्ट हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर भिंत बांधणे आणि खिडक्या बसवायचे काम दिले होते.
- आम्ही तिथे जाऊन अचूक माप (Measurement) घेतले.
- त्या मापानुसार भिंत बांधण्याचे काम सुरू केले.
- संपूर्ण भिंत बांधण्यासाठी आम्हाला 15 दिवस लागले.
(C) कोट तयार करण्याचे काम
- दिवाळी सुट्टीत आम्ही कोट आणि बेडची तयारी सुरू केली.
- सर्वात पहिले कोटचे आवश्यक मटेरियल मागवले.
- लोखंडी पाईपचे किती इंच / मीटर माप लागेल हे मोजले.
- त्यानंतर आम्ही कोटची फ्रेम (Frame) तयार करायला सुरुवात केली.
- एकूण 15 कोट बनवण्यासाठी आम्हाला 12 दिवस लागले.
- सर्व फ्रेम घासून (Grinding) स्वच्छ केल्या आणि त्यांना ब्लॅक कलरने रंगवले.
(D) बेड फ्रेम तयार करणे
- बेड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मागवले.
- त्यानंतर बेड फ्रेम तयार करण्यास सुरुवात केली.
- सर्व काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागले.
(E) ग्रिल तयार करणे
- ग्रिल बनवण्यासाठी प्रथम त्याची फ्रेम तयार केली.
- त्यानंतर गंज निघून जाईल असे घासून घेतले.
- नंतर त्यावर प्रायमर आणि रंग देऊन अंतिम फिनिश दिली.
निष्कर्ष
संपूर्ण प्रोजेक्टमध्ये टेनि हाऊस बांधकाम, गेस्ट हॉस्टेलमधील भिंती व खिडक्या, कोट व बेड तयार करणे, तसेच ग्रिल बनवणे ही सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण केली. सर्व कामे अचूक मोजमाप, योग्य साहित्य आणि गुणवत्तापूर्ण काम यांचा वापर करून पूर्ण केली.