छत्री
प्रस्तावना :
. या प्रकल्पात आम्ही . छत्री तयार करण्याबाबतचा उद्देश म्हणजे . पाहुण्यांसाठी बसायची आणि सावलीची सोय करणे . कॅमस मध्ये योग्य जागा पाहून छत्री बसवायची जागा ठरली .
या कामात आम्ही वेल्डिंग , कटिंग , पॉलिशिंग आणि पावडर कोटिंग या सारखी तांत्रिक कौशल्य शिकलो . छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला . भविष्याची ही छत्री पाहुण्यांसाठी विश्रामाची जागा म्हणून वापरली जाईल .
सर्वे:
आम्ही कॅम्पस मध्ये निरीक्षण केले आणि छत्री कुठे लावायची त्याची जागा नेमली. सॉलिड वर्क वर छत्रीचे डिझाईन तयार करणे. छत्रीसाठी योग्य सामान्य निवडणे.
उद्देश :
छत्री तयार करण्याचे कारण हे होते जे पाहुणे येथील त्यांच्यासाठी बसायची जागा व विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी शिकणे .
साहित्य :
25×25[] = 60′ ,40×40[] = 12′ , 100×100 [] = 13′
. 25×5 = 6′ , 40×5 = 5′ ,
. 6×6 = प्लेट (2) , फ्लॅन्स = 2. , रोल = 4
. 30/10 नट बोल्ट = 2kg. ,वायसर = 500 g
. ब्रश =2. , रोलर पॉलिश पेपर = 2 , रेड ऑक्साईड = 1L
. पावडर कोटिंग =
ब्लॅक ऑइल पेंट = 1L , थिनर = 0.5L
. सि सिमेंट = 1 गोणी , क्रश = 70 घमेली , खडी = 15 घमेली



कृती :
. सर्वात अगोदर आम्ही छत्री चे 3d डिझाईन बनवलेत्यासाठी आम्ही सॉलिड वर्क हे ॲप्लीकेशन युज केले . सॉलिड वर्क वर आम्ही छत्री असेंबल होते आहे का नाही हे आम्ही बघितलेत्यानंतरन आम्ही छत्री बनवायला सुरुवात केली . सर्वात अगोदर 25 x 25 [] चे 1800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली एका बाजुला नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतला कानापासून 880 mm या अंतरावर कॉलम ट्यूबच्या अलीकडे व पलीकडे अशा दोन बाजूस कान लावले. आंतर चुकू नये म्हणून जॉब तयार केला.असे आम्ही सात पार्ट तयार केले . त्यानंतर आम्ही 25 x 25 [] चे 800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली दोन्ही बाजूला ब नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतले . त्यानंतर आम्ही प्लाजमा कटर वर फ्लान्स तयार केला . व त्याला कान लावून घेतले.छत्रीचे सगळे पार्ट एकामेकाला नटबॉलच्या साह्याने जॉईन करून घेतले . त्यानंतरून छत्रीच्या सर्व पार्टला पावडर कोटिंग केली .100 x 100 [] चा 5000 mm तुकडा कापून घेतला. व त्याला काळा ऑइल पेंट लावला .ज्या ठिकाणी छत्री लावायची होती त्या ठिकाणे 3 फुट खोल खट्टा घेतला . त्या खड्ड्यात खांब उभा केला . त्या खंड्यात सिमेंटचे मिश्रण टाकून खांब फिट केला , व खांबाच्या शेजारील जमिनीला लागून कोबा केला. छत्री उघडण्यासाठी व बंद करण्यासाठीरोलरच्या सह्याने जॉब तयार केला , व त्याला पावडर कोटिंग करून घेतले. छत्रीचे सगळे पाठ एकामेकांना कनेक्ट करून छत्री उभा केले . ही छत्री तयार करताना आम्हाला 9275 एवढा खर्च आल
कॉस्टिंग
| क्र. | मालाचेनाव | एकूण माला | दर | एकूण किंमत |
| 1 | 1*1 ट्यूब | 60 F | 35 | 2100 |
| 2 | 40*5 पट्टी | 5 F | 30 | 150 |
| 3 | 40*40 ट्यूब | 12 F | 45 | 540 |
| 4 | 100*100 ट्यूब | 13 F | 45 | 540 |
| 5 | 25*5 पटी | 6 F | 25 | 150 |
| 6 | 4*4 प्लेट | 2 | 150 | 300 |
| 7 | 6*6 प्लेट | 2 | 250 | 250 |
| 8 | 30/10 नटबोल्ट | 2 Kg | 100 | 200 |
| 9 | वाईअर | 500 G | 50 | 50 |
| 10 | ब्रश | 2 | 50 | 100 |
| 11 | फ्लॅन्स | 2 | 150 | 300 |
| 12 | रोलर | 2 | 50 | 100 |
| 13 | गॉलीज पेपर | 5 | 15 | 75 |
| 14 | रेडऑक्साईड | 1 L | 230 | 230 |
| 15 | ऑइल पेंट ब्लॅक | 1 L | 300 | 300 |
| 16 | सिमेंट | 1 गोणी | 350 | 350 |
| 18 | ब्रश | 70 चमेली | 8 | 480 |
| 19 | खडी | 4 | 100 | 400 |
| 20 | थिनर | 0.5 L | 100 | 50 |
| 21 | पावडर कोटिंग | — | — | 800 |
| 22 | मजुरी | 2318 | ||
| Tota | 11593 | |||
निरीक्षण
छत्री तयार करताना छत्रीचे कार्य कसे चालते , व त्याची आतील रचना कशी असतेहे कळाले . छत्री सगळे पार्ट एकसारखे कड झाले पाहिजे , नाही तर छत्री नीट काम करणार नाही . छत्रीचे मटेरियल कसे असले पाहिजे . हेवी पाहिजे की लाईट
निष्कर्ष :
छत्री लावल्यापासून लोकांचे उन्हा व पावसापासूनसंरक्षण होते . आश्रमातील लोक एकत्रित जमा होतात येतात , गप्पा मारतात . छत्री लावल्यापासून छत्रीच्या बाजून स्वच्छता अपवाप होऊ लागली . छत्री लावल्यापासूनती मोकळी जागा वापरत आली .
l: भविष्यातील उपयोग :
या फोल्डेबल छत्री मुळेभविष्यात उन्हाचाव पावसाचा त्रास होणार नाही . लोकांना निवांत बसण्यासाठी एक जागा तयार झाली .
टेनी हाऊस
प्रस्तावना :
आजच्या युगात जागेची कमतरता आणि वाढते घरांचे खर्च लक्षात घेता, Tiny House ही एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक संकल्पना आहे.
या प्रकल्पाचा उद्देश कमी जागेत, कमी खर्चात आणि टिकाऊ साहित्य वापरून एक आकर्षक, सुरक्षित आणि कार्यक्षम घर तयार करणे हा होता.
या प्रकल्पातून मी बांधकाम, रंगकाम, वायरिंग, आणि फिनिशिंग याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला
सर्वे :
सुरुवातीला आम्ही टेनी हाऊसचे विविध थ्रीडी डिझाईन आणि मॉडेल्सचा अभ्यास केला.Tiny House संकल्पना जगभरात कशी वापरली जाते, कोणते साहित्य टिकाऊ आणि स्वस्त ठरते हे पाहिले.विविध बांधकाम पद्धती, फ्रेम प्रकार, छताची रचना आणि वायरिंगची सुरक्षित पद्धत यांचा अभ्यास केला.जागेचे मोजमाप घेऊन पाया, भिंती आणि छताच्या प्रमाणात योग्य आखणी तयार केली.
उद्देश :
कमी खर्चात हलके वजनाचे एक आकर्षक असे टेनी हाऊस तयार करणे.
लहान जागेत सर्व मूलभूत सुविधा असलेले घर बांधण्याचा अनुभव मिळवणे.
बांधकाम, वायरींग, रंगकाम आणि फिनिशिंगची प्रत्यक्ष समज करून घेणे.
व्यावहारिक ज्ञान वाढवून प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष कामकाज शिकणे.
साहित्य :
बांधकाम साहित्य (BUILDING MATERIALS)
फ्रेमिंग – रुंदी 10 फूट × लांबी 10 फूट × उंची 8 फूट — 8 नग
फ्रेम पिलर – 8 फूट, 4 नग
खिडक्या (Windows) – 4’ × 3’ — 2 नग
मुख्य दरवाजा (Front Door) – 3’ × 7’ — 2 नग
छप्पर (Roofing) – मेटल शीट 3’ × 10’ — 4 नग
इन्सुलेशन (Insulation) – रॅपिकॉन सिमेंट 50mm × 8’ शीट — 20 नग
स्क्रू (Screws with Star Drive Head) – 70mm स्क्रू 500 नग (1 बॉक्स)
सिमेंट शीट (Cement Sheet) – 18mm, 4 नग
पाइप (Pipes) – 1½ इंच, 4 नग
बाथरूम (BATHROOM)
बाथटब: Lyons 3’; × 6’
कमो…
कृती :
सर्वात आधी मी टेनी हाऊसचे थ्रीडी डिझाईन तयार केले.
यानंतर ज्या ठिकाणी घर बांधायचे होते त्या ठिकाणी आखणी करून घेतली आणि त्या आखणीप्रमाणे पाया बांधला.
त्यानंतर मी टेनी हाऊसची फ्रेम असेंबल करून पाहिली.
फ्रेम तयार झाल्यावर तिला रेड ऑक्साईड (प्रायमर) लावला आणि त्यावर पांढरा ऑइल पेंट लावला.
रंगकाम झाल्यानंतर फ्रेम नट-बोल्टच्या सहाय्याने फिट केली.
फ्रेमच्या आत चारही बाजूंना पीव्हीसी पाईप बसवले.
फ्रेमच्या खालच्या बाजूस स्क्वेअर ट्यूब लावल्या आणि त्यावर सिमेंट शीट बसवली.
भिंतींसाठी मी रॅपिकॉन सिमेंट शीट (50mm x 8) वापरल्या.
ज्या ठिकाणी खिडकी आणि दरवाजा ठेवायचा होता, त्या ठिकाणी शीट मापानुसार कट केल्या.
यानंतर मी 3’x4’ आकाराच्या दोन खिडक्या आणि 3’x7’ आकाराच्या दरवाजाची फ्रेम तयार करून बसवली.
छतासाठी 3’x10’ चे पत्रे बसवले आणि सेल्फ-स्क्रूच्या मदतीने फिट केले.…

निरीक्षण :
टेनी हाऊस बांधकाम करताना अचूक मोजमाप आणि आखणी महत्त्वाची असते.
फ्रेम आणि भिंतींची जोडणी करताना मजबूत फिटिंगसाठी नट-बोल्ट योग्य रीतीने बसवावे लागतात.
वायरिंग करताना आधी आखणी करून पाईप बसवणे सोयीचे ठरते.
प्रायमर आणि पेंट यामुळे लोखंडी भाग गंजत नाहीत आणि घर टिकाऊ बनते.
बाह्य रंग आणि सिमेंट फिनिशमुळे घराचे सौंदर्य वाढते आणि गॅप्स बंद होतात.
निष्कर्ष :
या प्रकल्पाद्वारे मी टेनी हाऊस कसे बांधायचे, त्यासाठी कोणती साधने आणि सामग्री लागते, तसेच रंगकाम, वायरिंग आणि फिनिशिंगची प्रक्रिया कशी करायची हे सर्व शिकलो.
हा अनुभव खूप उपयुक्त आणि शैक्षणिक होता
भविष्यातील उपयोय
या प्रकल्पातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात लघुउद्योग, फॅब लॅब किंवा बांधकाम क्षेत्रात करता येईल.
भविष्यातील उपयोय
या प्रकल्पातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात लघुउद्योग, फॅब लॅब किंवा बांधकाम क्षेत्रात करता येईल.
कमी जागेत स्वयंपूर्ण घराची कल्पना पुढे नेऊन प्रत्यक्ष वापरासाठी मॉडेल तयार करता येईल.
ग्रामीण किंवा आपत्तीग्रस्त भागात अशा प्रकारची तात्पुरती पण टिकाऊ घरे तयार करता येतील.
पर्यावरणपूरक आणि किफायतशीर घर बांधणीसाठी हा एक उपयुक्त अनुभव ठरू शकतो
मी हे शिकलो :
डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.
अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.
प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.
छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.
गेस्ट हाउसचे बांधकाम
गेस्ट हाउसचे बांधकाम
प्रस्तावना :
गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.
सर्वे :
बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.
जागेचे मोजमाप घेण्यात आले.
गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.
या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.
या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.
उद्देश :
गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे
मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे
विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे
बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे
सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे
CPM
साहित्य :
ACC
केमिकल
थापी , घमेल
कळंबा स्पिरिट
लाईन दोरी
फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी
कृती :
सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.
कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या
कॉस्टिंग :

| अ क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | ACC | 1600 | 80 | 1,28,000 |
| 2 | केमिकल | 1600 | 500 | 1.1500 |
| 3 | मजुरी [25% | 34,875 | ||
| 5 | total | 174,375 |
निरीक्षण :
मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.
भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.
कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.
ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.
प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.
निष्कर्ष :
गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.
भविष्यातील उपयोग :
गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त
भविष्यातील उपयोग :
गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त
मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते
ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो
बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले
कॉट तयार करणेकॉट
प्रस्तावना :
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.
सर्वे :
बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता
1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती
वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता
रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत
उद्देश:
या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू
साहित्य:
1” x 2” स्क्वेअर ट्यूब
1” x 1” स्क्वेअर ट्यूब
0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
पॉलिश व्हील
रेडऑक्साईड प्रायमर
काळा ऑइल पेंट
पॉलिश पेपर
लंबी
कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन




कॉस्टिंग :
| अ . क्र | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 0.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब | 20′ | 25 | 500 |
| 2 | 1 x 2 स्क्वेअर ट्यूब | 360 | 30 | 10,800 |
| 3 | 1 x 1स्क्वेअर ट्यूब | 100 | 35 | 3,500 |
| 4 | 1/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब | 100 | 40 | 4,000 |
| 5 | रॉड पुडा | 2 | 400 | 800 |
| 6 | कटींग व्हिल | 5 | 25 | 125 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 5 | 30 | 150 |
| 8 | पॉलिश व्हिल | 3 | 30 | 150 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 1 | 200 | 200 |
| 10 | लंबी | 2kg | 500 | 1000 |
| 11 | प्रायमर | 2L | 240 | 480 |
| 12 | थीनर | 2L | 120 | 240 |
| 13 | काळा ऑईल पेंट | 2L | 340 | 680 |
| 14 | रोलर | 1 | 50 | 50 |
| 15 | Electricity [10%] | 2,270 | ||
| 16 | मजुरी [15%] | 3,400 | ||
| 17 | total | 28,350 |