1.मापन

उद्देश :- मापन मध्ये मी दोन पद्धत शिकने . त्या मध्ये ब्रिटिश पद्धत व मॅट्रिक पद्धत शिकने . व मापन करायला शिकने

साहित्य :- पेन ,वही ,वाईट बोर्ड

सुरक्षा :- सेफ्टी शूज

आकृती :-

Illustration about Illustration of a tailor measuring tape isolated on ...

कृती :- 1) सारणी आम्हाला मीटर टेप विशाई माहिती दिली . 2)त्या नंतर आम्हाला ब्रिटिश पद्धत व मॅट्रिक पद्धत शिकलो. 3)त्यानंतर क्षेत्रफळ व घणफळ काढले . 4) आश्रमसमोरील तकीचे घणफळ काढले .

कौशल्य :- मला कोणत्याही वस्तूचे माप घेऊन ते किती इंच आहे . किंवा किती मीटर आहे ही मला जमते व घणफळ क्षेत्रफक वर्तुळाचे क्षेत्रफळ घनफळ काढता येते.

2. फॅब्रीकेशन मटेरियल ओळखणे .

उद्देश :- फॅब्रीकेशन मटेरियल ओलखण्यास शिकणे. व दुकानात गेल्यावर त्या वस्तूला कोणत्या नावाने ओळखतात . समजून घेणे.

साहित्य :- Sq tube, round tube , D tube , L angle, GI plpe, C-channel, chicken mesh, wesh, I channel, torshm bar, patti, nutbold, ETC.

आकृती :-

साधने :-मीटर टेप

सुरक्षा :- सेफ्टी शूज , हँडग्लोज, इ.

कृती :- 1. इनवेन्टरीमध्ये गेलो . 2) जाऊन सर्व लोखंडी वस्तू बघितली . 3)त्या वस्तू बघून त्याला काय म्हणतात . 4) त्याचा आकार कसा आहे . 5) हे बघून मी L angle G I metal, माईल्ड स्टील असे प्रकार पाहिले .

कौशल्य:- फाब्रिकेशन मटेरियल ओळखण्यास शिकलो.

3.प्लम्बींग करणे ..

उद्देश :-1) व्हरनियर कॅलिपर वापरण्यास शिकणे. 2) प्लम्बींगच्या साहित्याची ओळक व प्लम्बींग करण्यास शिकणे .

साहित्य :- PVC, U-PVC, C-PVC, टेपलॉन टेप ,ड्रिल मशीन .

साधने :- प्लमबिंग पना , ड्रिल मशीन ,pipe kutter, hexa blade .

कृती:- 1) पहिल्या आणि वडनेर तालुक्याची ओळख करून घेतली. त्यावरील मीटर्स के पारनेर स्केल वरील आपण समजून घेतली. 2) वर्नियर केलकर चा वापर करून वर्तुळाकार वस्तूचे ID व OD मोजले. असे अनेक गोलाकार मटेरियल चे माप मोजले. 3) प्लंबिंग चे साहित्याची ओळख करून घेतली. 4) प्लंबिंग करण्यासाठी लागणारे मटेरियल ची यादी केली ते मटेरियल खरेदी करून आणले व ॲग्री ऑफिस रूम मध्ये टॉयलेट मध्ये फ्लॅश टॅंक व बेसिन बसवले.

कौशल्य:-वर्नियर कॅलिफअर वापरण्यास शिकलो. प्लंबिंगच्या साहित्याची ओळख झाली.

4. F.R.P

उद्देश:-दरवाजा लॅमिनेशन आणि FRP

साहित्य:-रेसिंग(पारदर्शी), हार्डनर (पारदर्शी), कोबाल्ट (जांभळसर), प्लायवूड (डोव्हर), वॅक्स.

साधने:- पत्रा, रोलर, वूड कटर.

आकृती:-

कृती:-

1]प्लाईऊड ला दरवाजाच्या मापाप्रमाणे कापले 2] बप्लाईऊड ला पॉलिश पेपर ने एक घासले

3] त्यानंतर सेल्युशन बनवले रेशिंग-1 लीटर हार्डनर- 30ml कोबाल्ड-30ml घेऊन निट मिक्स केले.

4] प्लाइउडला एका साईडला व्हॅक्स लावले कारण लिकविड (सेल्यूषण) पसवरताना त्यांचे वगळ दुसऱ्या साईडला लागतात.

5]ते सेल्युशन प्लाईऊड वर टाकले व पसरवले.

6] फिल्म फ्रेम टेवली व रोलरहने पसवले. त्या मध्ये पसरवताना. त्यात बबल्स येऊन न दयावे. पायावर पडु नये याची काळजी घ्यावी

7] सगळी समान पसरवले.

8] व वाळण्यासाठी ठेवणे

सुरक्षा:-1]हार्डनर आणि कोबाडला जवळ देवू नये. (कारण की जवळ आले तर जाळ किंवा गरम होईल व हात जळेल.)2] बंद जागेवर F.R.P करू नये,3] त्या निघणारा गैस चा वास घेऊ नये. त्यामुळे चक्कर येऊ शकते.4] रेगुलर सेफ्टी:- गॉगल, रबर ग्लब्स, सेक्टी शुज.

कौशल्य:-1) दरवाजे लॅमिनेशन करण्यास शिकलो. 2) FRP म्हणजे काय आहे हे समजले

5. बिजागिरी व स्क्रू

उद्देश:-बिजागिरी व स्क्रूंचा वापर करून दरवाजा बसवणे

साहित्य:-लॅमिनेटेड डोर, ब्लॅक स्क्रू ,टकरी (4 इंची) बिजागिरी, कडी , ड्रायवॉल स्क्रू(16 इंची), टॉप कडी,दूर स्टोपर, हँडल, वेल्डिंग रॉड .

साधने :- ड्रिल मशीन ,वूड कटर ,मीटर टेप ,वेल्डींग मशीन, हातोडी,छनी ,मारकर .

कृती :- १)सर्व प्रथम सर्व लागणारे साहित्य गोळा केले. २) ज्या ठिकाणी दरवाजा बसवायचा आहे त्या फ्रेमचे माप ( 77 inch x 36 incha ) माप घेतले . व लयाणीनेतेड दरवाजा जास्त होता तो दोन्ही बाजूने 1.5 inch वूड कटरने कापला. 3) दरवाजाला टकारी बिजागिरी बसवून बिजागिरी बसवण्यासाठी ड्रायवॉल स्क्रू वापरली व वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने 0.5 inch अंतर सोडले व फ्रेम ला जोडले . 4) लोखंडी फ्रेम ला ज्या ठिकाणी बिजागीरी लावायची आहे त्या त्या ठिकाणचे सिमेंट काढले आणि मारकर च्या सहयाने मार्क केले 5) व दरवाजा बसवून नीट माप घेऊन बिजागिरीच्या एका साइड ला वेल्डींग केली . 6) वेल्डींग करून झाल्यावर देवजा व्यवस्तीत बसवला आहे की नाही चेक केला 7) आशा प्रकारे बिजागिरी आणि स्क्रू चा उपयोग करून अग्रि ऑफीस चा दरवाजा बसवला

सुरक्षा :- सेफ्टी शूज, गॉगल इ .

कौशल्य :- बिजागिरिच वापर करून दवाज बसवणे .

6.कोबा तयार करणे

उद्देश :- नवीन फूड लॅब समोर कोंब तयार करणे . व शिकणे.

साहित्य :- सिमेंट , वाळू , खडी इ .

साधने :- थापी ,रंदा, घामेले , फावडे, टिकाव, लाइन दोरी ,हँड ग्लोज , पाणी बदली . इ

सिमेंट :- OPC Ordinary Portland Cement

costing :-

NoMaterial QtyRateAmount
1.सिमेंट opc 23 घमेले 50रु / घमेले 1150/-
2. खडी अर्धा + 1 inch 44 घमेले 7 रु / घमेले 308/-
3. वाळू कच 88 घमेले 8 रु/ घमेले 705 /-
4. विज 240 वोल्ट 0.75 यूनिट 10 /1 यूनिट 7.5 /-
मजुरी =25% एकूण खर्च = 542.5 ~ 543 /-
2713/-

कृती :- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा करणे . 2) त्यानंतर 1:4:2 या प्रमाणात सीमेंट वाळू व खादी घेऊन सीमेंट मिक्सर मध्ये टाकून कॉंक्रीट तयार केले . 3) व जय ठिकाणी कोबा करायचे आहे . त्या ठिकाणी पाणी मारून घेतले. लेवळ ट्यूब वापरुन लाइन दोरी च्या सहहयाने लेवळ काढून लाइन दोरी बांधली . 4) नंतर तयार केलेले कॉंक्रीट ओतले. 5) ते कॉंक्रीट रांद्याच्या मदतीने सगळीकडे पसरवले. 6) सगळीकडे लेव्हल करून घेतली. 7) अशाप्रकारे न्यू समोरील कोबा तयार केला.

कौशल्य:-1)कोबा तयार करण्यास शिकणे. 2) बांधकामातील साहित्याची ओळख झाली.

7. बांधकाम करणे

उद्देश:- 1) बांधकाम करण्यास शिकणे. 2) प्लास्टर करणे शिकणे. 3) पायरी तयार करणे.

साहित्य:-विटा ,सिमेंट ,वाळू, पाणी.

साधने:- सिमेंट मिक्सर, घमेले, थापी, हॅन्ड ग्लोज, फावडे, मीटर टेप, लाईन दोरी.

costing:-

No.material nameDescriptionQTYRate Amount
1.सिमेंट0pc15 घमेले 50/1 घमेले750/-
2.वाळूकच86घमेले8/1 घमेले688/-
3.विटा(मातीची भाजलेली वीट)58 विटा 11/1वीट638/-
4.वीज0.75 युनिट 10/ 1युनिट7.5/
5. मजुरी

Total =
528/-

2640/-

कृती:-1) सर्वोत्तम कच साग मेली व सिमेंट एक घमेली याप्रमाणे त घेऊन मॉर्टन माल मिक्सरमध्ये तयार केला. 2) त्यानंतर विटांना भिजवून घेतले. 3) ज्या ठिकाणी बांधकाम करायचे आहे त्या ठिकाणची माती काढली दोन इंच खड्डे केलं व पाणी टाकले कारण की मालाने पाणी धरून ठेवू नये. 4) सर्वप्रथम खाली माल टाकला नीट पसरवून घेतला. 5) त्यानंतर त्यावर वीट ठेवली. विटीच्या ठेवलेल्या बागेमध्ये गच्चमाल भरला. 7) असं करत त्यावर माल टाकला विटा लावून आम्ही 1फूट X15 फूट काम केले.

कौशल्य:-बांधकाम करण्यास शिकणे.

8. आर्क वेल्डिंग.

उद्देश:- 1) वेल्डिंग करण्यास शिकणे. 2) नवीन फूडलॅबसमोरील शेड बांधणे.

साहित्य:-वेल्डिंग मशीन, वेल्डिंग रॉड, वर्कपीस.

साधने:- चिम्पिंग हॅमर, आर्क वेल्डिंग मशीन, वायर ब्रश.

सुरक्षा:-हॅन्ड ग्लोज, गॉगल, सेफ्टी शूज, ई.

कृती:- 1) सर्वप्रथम वेल्डिंग मशीन विषयी माहिती करून घेतली. 2) नंतर मग वर्क पीस ला कटिंग केले. 3)L-अँगल एकत्र घेतले नंतर वेल्डिंग मशीन चालू करून करंट व लोड सेट केला. 4) मशीन चालू केल्यावर अर्थिंग लावली होल्डर मध्ये रोड घेऊन रोडवर पीस मध्ये आर्क तयार केले. 5) आर्ट तयार केल्यावर दोन एल अँगल जोडून त्यावर जॉईंट वर वेल्डिंग स्पॉट मारले. 6) त्यानंतर फुल वेल्डिंग मारून घेतली.

कौशल्य:- वेल्डिंग करण्यास शिकणे.

9. New Food Lab समोर शेड बनवणे ..

costing :-

कृती :-

10. रंगकाम करणे .

उद्देश :- नवीन फूड लॅब भिंतींना रंगकाम करणे . 1) New Food Lab 2) Old Food Lab

साहित्य :- (costing )

कृती :-

  1. सर्वप्रथम फूड लॅबच्या भिंती सॅंड पेपरच्या साहाय्याने घासून घेतले .
  2. तसेच काही भिंतीन pop लावले .
  3. त्यानंतर wall primer घेतले . 1 लिटर कलर ला 300 ते 400 ml पाणी घेऊन डोंगणचे मिश्रण करून कलर बनवले .
  4. मग रोलर च्या साहाय्याने सर्व भिंतीना कलर दिले . व भिंतीच्या कोपऱ्याना ब्रश ने रंग दिले .

कौशल्ये :-

रंगकाम करण्यास शिकलो .

11. लेथ मशीन

उद्देश :-लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .

साहित्य :-लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .

कृती:-

  1. सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .
  2. तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .
  3. नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
  4. मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .

कौशल्य :- लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

12. वीट तयार करणे ..

उद्देश :- mortar चा वापर करून वीट तयार करणे .

साहित्य :- सिमेंट ,वाळू , घमेळे , पाणी .

कृती :-

  1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .
  2. सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन mortar तयार केले .
  3. breaks मशीनमध्ये वितेच्या साच्याना ऑइल लाऊन घेतले .
  4. मग त्या साच्या मध्ये सुरुवातीला mortar नंतर दगड पुन्हा mortar असे थर टाकले .
  5. वरुण प्रेस केले . त्यानंतर त्या साच्या मधून वीट बाहेर काढली . अशा आम्ही दोन विटा तयार केल्या .
  6. आणि 21 दिवस curing करणे .

13. फेरोसिमेंट

उद्देश:- फेरोसिमेंटचा झाकण बनवणे .

साहित्य :- l angle , torshn bar , weld mesh , welding rod , binding tar , cement , sand , water etc .

साधने:- वेल्डिंग मशीन , थापी , रंदा , फावडे , घमेळे , ट्रे

कृती:-

  1. सर्वप्रथम 48 इंचचे 2angle व 43 इंचचे 2 angle कट करून घेतले . व 4 angle यांची फ्रेम तयार करून वेल्ड केल .
  2. त्या फ्रेम ला सपोर्ट साठी मध्ये बार लावले आणि त्यावर वेल्ड मेष जाळी लावली .
  3. त्यानंतर सिमेंट + वाळू यांचे 1:3 प्रमाणात घेऊन mortar तयार केले . ते mortar सुरुवातीला फ्रेम खाली ओतले .
  4. त्यावर फ्रेम ठेवली . पुन्हा फ्रेम वरुण mortar ओतले व थापी ,रंदाच्या साहाय्याने सगळीकडे पसरवले .
  5. व ते झाकण curing करण्यास ठेवले .

14.नवीन फूड लॅब च्या येथे प्लंबिंग करणे.

प्लंबिंग करण्यास शिकलो .तसेच विविध प्लंबिंग च्या साहित्य ओळख झाली .प्रत्यक्ष काम करत शिकलो . या कामामुळे प्लंबिंग चा नवीन अनुभव मिळाला .या अनुभवामुळे मी प्लंबिंग ची विविध कामे करू शकतो .

15.प्लाझमा कटर चलवण्यास शिकणे …

उद्देश :-प्लाझमा कटर चा उपयोग करून पत्र्यावर विविध डिझाईन काढणे .

साहित्य :- पत्रा ,हँड ग्लोज ,सेफ्टी शूज ,गॉगल

साधने :- .प्लाझमा कटर

कृती:- 1) सर्वप्रथम घनश्याम दादाने आम्हाला मशीनच्या विविध भागां विषयी माहिती संगितली . 2) त्यानंतर टी मशीन oprate काशी करायची ते संगितले . 3) त्यात वापर होणारा Centroller Com . presscr laser cutter point याची माहिती घेतली . 4) त्यानंतर मशीन मध्ये आधी पासून असलेले काही drawings काढले Centroller चे commands समजून ठेऊन त्याचा टेस्टिंग घेण्याचा प्रयत्न केला . 5) test घेतल्यानंतर पत्रा त्या डिझाईन चा कट केला . 6) आशा पद्धतीने computer वर डिझाईन तयार करून टो pemdrive मध्ये copy करून आपण CNC plazama cutter मध्ये वेगवेगळ्या व आपल्या ला आवश्यक असणाऱ्या डिझाईन तयार करून घेऊ शकतो .

कौशल्य :- .प्लाझमा कटर वर पत्र्यावर विविध डिझाईन काढण्यास शिकलो .

16.पत्रेकाम करणे.

उद्देश :-

  1. Gi पत्र्याचा डब्बा तयार करणे.
  2. Gi पत्र्याचा नरसाळे तयार करणे.

साहित्य :-

GI पत्रा, कटर, पेन्सिल, पट्टी, पक्कड, हातोडी, कंपस,

साधने :-

पत्रा बेंड मशीन

कृती :-

1)पत्र्याचा डब्बा तयार करणे.

सर्वप्रथम gi पत्रा घेतला. पत्र्यावरती पेन्सिल व पट्टीने व32 x 8mm चा आयत काढला. त्या आयताच्या 4 ही बाजूने 6 बाहेर लाईन मारली.तसेच 8×8 चा squire आखल व 6m बाहेर लाइन मारली. (चारहीबाजू). त्यानंतर ते दोन्ही पत्रे कटर ने कट करून घेतले. 6 mm लाइन वरून काही पत्र्याची बाजू आत बेन्ड केली आणि काही बाजू बाहेर बेन्ड केली. 32*8cm च्या आयताचे चार भाग करून ते बेन्ड केले. व एकात एक अडकवले.(समोरासमोरील बाजू) तयार झालेला डब्बा 8x8mm च्या squareवरील bend केलेल्या भागात बसवला.व पक्कडीने सर्व बाजू press केल्या.

सर्वप्रथम gi पत्रा घेतला. पत्र्यावरती पेन्सिल व पट्टीने व32 x 8mm चा आयत काढला. त्या आयताच्या 4 ही बाजूने 6 बाहेर लाईन मारली.तसेच 8×8 चा squire आखल व 6m बाहेर लाइन मारली. (चारहीबाजू). त्यानंतर ते दोन्ही पत्रे कटर ने कट करून घेतले. 6 mm लाइन वरून काही पत्र्याची बाजू आत बेन्ड केली आणि काही बाजू बाहेर बेन्ड केली. 32*8cm च्या आयताचे चार भाग करून ते बेन्ड केले. व एकात एक अडकवले.(समोरासमोरील बाजू) तयार झालेला डब्बा 8x8mm च्या squareवरील bend केलेल्या भागात बसवला.व पक्कडीने सर्व बाजू press केल्या.

2)पत्र्याचे नरसाळे बनवणे

कृती :-

  1. प्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढून घेतले.
  2. 10mm व्यास घेतला
  3. 10 cm उंची घेतली. तसेच 8 cm ची नळी तयार केली
  4. परीघ 31.4 ठेवला.
  5. ड्रॉईंगनुसार पत्रा कापून योग्य मापाचे फनेल तयार केले.

कौशल्य :-

  1. Gi पत्र्यापासून डब्बा बनवण्यास शिकलो.
  2. Gi पत्र्यापासून नरसाळे बनवण्यास

 17. प्लायवुडला सन्मायका चिटकवणे.

उद्देश :-प्लायवुडला सनमायका चिकटवने.प्लायवुडपासून Key storage box तयार करणे.

साहित्य :-प्लायवुड, सनमायका, सनमायकाकटर, पेन्सिल, पट्टी, मीटर टेप,फेविकॉल

साधने :- wood cutter

कृती :-

1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 5X4 इंचाचे 2 तुकडे ply- ७०० चे कट केले. तसेच 3 तुकडे कट केले. 3) 15×2 इंचाचे3व 15X5 इंचाचा एक तुकडा कट केला. 4) 15X5 इंचाच्या तुकड्यावर 5X4 इंचाचे ‘दोन्ही टुकडे विळ्यानी समोरासमोर बसवले. 5)05X4 इंचाच्या तुकड्यांना जोडून 15×2 इंचाच्या दोन पट्ट्या ठोकल्या. व एक पट्टी समोरच्या बाजूने ठोकली. (6) तयार केलेल्या key Storage box समोरील पट्टीला फेविकॉल लावले व सन्मायका चिटकवली . आणि त्या बॉक्स ला touchwod मारले.

कौशल्य :-

  1. प्लायवुडला सन्मायका चिटकवण्यास शिकणे.
  2. प्लायवुड पासून key storage बॉक्स तयार करणे.