दि.८/१/२०२० बुधवार
आज विज्ञान आश्रमात माझा पहिला दिवस विशाल सरांनी मला सनी सरांच्या ब्याच मध्ये पाठवले त्यांनी मला सेफ्टी विषयी माहिती दिली नंतर इलेक्टिकल चे लेक्चर झाले त्यात विज्ञान आश्रमातल्या सिंगल फेस आणि 3 फेस कनेक्शन बदल माहिती दिली त्या नंतर ब्याच मधल्या मुलान बरोबर किचन मधले टेबल दुरुस्त केले हँड ग्रॅण्डर वापरला.

दि. ९/१/२०२० गुरुवार
आज सनी सरांचे लेक्चर झाल त्यात फ्लोचाट बदल माहिती दिली नंतर प्रियांका मॅडमचा कॅमुप्टर चा लेक्चर होता त्यात विष्टाप्रिंट आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड बदल शिकवले हँड ग्रॅण्डरने मांडणीला गर्यांडिंग केली.

दि. १०/१/२०२० शुक्रवार
आज सोलरप्यानल चा स्टँड बनवायला मदत केली.

दि. १२/१/२०२० रविवार
आज सकाळी विशाल सरांचे इलेक्टिकल चे लेक्चर झाले त्यात गाडीचे इंजन कशे काम करते त्याची माहिती दिली नंतर मांडणी ला रेडोक्ससाईड लावले आणि डेली डायरी पूर्ण केली.

दि. १३/१/२०२० सोमवार
आज सकाळी माती वर स्टोरी झाली त्यात मातीतल्या घटकांन बदल माहिती दिली नंतर वेल्डिंग मशीन वापरली ४ वाजता सेमिनार झाला.

दि. १४/१/२०२० मंगळवार
आज सकाळी ड्रॉईंगचा लेक्चर झाले नंतर चपल स्टँडच्या कट केलेल्या पट्या ग्राइंड केल्या लंच नंतर कम्प्युटर क्लास झाला त्यात मी स्वतःचा रिजुम बनवला.

दि.१५/१/२०२० बुधवार
आज सकाळी विज्ञान आश्रमाचा सोलर ऊर्जाचे कनेक्शन बदल लेक्चर झाले त्यात त्याचे फायदे आणि वापर ह्याची माहिती दिली नंतर चपल स्टँड ला वेल्डिंग केली ४:३०pm वाजता वर्क शॉप च्या मुलांना त्याच्या आवड, अनुभव, अडचणी, इच्छा सरव्याची विचारपूस केली.

दि.१६/१/२०२० गुरुवार
आज सनी सरांचे लेक्चर झाले त्यात लोह(आयरन) कशे बनवले जाते त्याची प्रक्रिया कशी असते शिकवले पूर्ण प्रक्रिया व्हिडीओ मध्ये दाखवली नंतर चपल स्टँड साठी L यांगल आणि पटी कटिंग केली वेल्डिंग आणि गर्यँडिंग केली 5pm वाजता वर्कशॉप साफ केले.

दि.१७/१/२०२० शुक्रवार
आज सकाळी स्क्रॅबची साफसफाई केली नंतर ड्रॉईंगचे लेक्चर झाले 2pm फ्याबल्याब चे लेक्चर झाले त्यात विणायल कटर, लेसर कटर, 3D प्रिंटर या मशनीची माहिती दिली लेसर कटर मशीन कशी वापरायची शिकवले.

दि. १९/१/२०२० रविवार
आज पूर्ण दिवसभर स्क्रॅब नीट कसा लावायचा जेणे करून कधी कशाची गरज पडली की शोधणे सोपे जाते खूप काही शिकायला भेटले खूप मजा आली.

दि. २०/१/२०२० सोमवार
आज सकाळी स्टोरी झाली नंतर स्क्रॅब साफ केेला.

दि. २१/१/२०२० मंगळवार
आज चपल स्टँडला वेल्डिंग केली 2pm ला कम्प्युटर चा लेक्चर होता त्यात 2D आणि 3D डिजाईन बनवायला शिकलो 4pm 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या पफोमांस ची तयारी चालू केली गाणे निवडले.

दि.२२/१/२०२० बुधवार
आज सकाळी इलेक्ट्रिकल चे लेक्चर होते त्यात घरा साठी इंवटर लावायचा असेल तर त्याचे किती प्रकार असतात,  कसा निवडायचा ब्याट्री कशी निवडायची याची माहिती दिली नंतर फूड ल्याब साठी पाईप लाईन टाकली सनी सरांनी सॉईल ल्याब साठी चपल स्टँड बनवायला सांगितला त्याचे मट्रेल स्क्रॅबयााड मध्ये शोधले 5:30pm डान्स प्रॅक्टिस केली .

दि.२३/१/२०२० गुरुवार
आज सकाळी सनी सरांचे वर्कशॉप चे लेक्चर झाले त्यात आयरनचे किती प्रकार असतात ते कशे बनतात शिकवले सॉईल ल्याबच्या चपल स्टँड चे मट्रेल कटिंग केले आणि वेल्डिंग केलीं 5:30pm डान्स प्रॅक्टिस केली.

दि.२४/१/२०२० शुक्रवार
आज चपल स्टँडचे मट्रेल ग्राइंड केले. 2pm फ्याबल्याब चे लेक्चर होते त्यात कीचेन्न आणि सॉफ्ट टॉय कसे बनवायचे शिकवले.

दि. २६/१/२०२० रविवार
आज प्रजासत्ताक दिना निमित्त विज्ञान आश्रमात कार्यक्रम होता.

दि. २७/१/२०२० सोमवार
आज सर्व शिक्षकांनी मिळून NRC या विषया वर नाटक केले नंतर सॉईल ल्याबच्या चपल स्टँड जमा केलेले जुने मेट्रेल ग्राइंड केले 4pm सेमिनार झाला.

दि. २८/१/२०२० मंगळवार
आज सकाळी सनी सरांचे लेक्चर होते त्यात ग्राफ म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती शिकवले नंतर चपल स्टँड वेल्डिंग आणि ग्रेन्दिंग केली 2pm कम्प्युटर क्लास होता त्यात movavi video editor सोफ्टवेर कशे वापरायचे शिकवले डेली डायरी update केली.

दि. २९/१/२०२० बुधवार
आज सकाळी इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले त्यात घरच्या वीज कनेक्शन साठी कशी पल्यानिंग करायची वायर आणि सिविच चे प्रकार किती शिकवले पूर्ण दिवस चपल स्टँड ला ग्राइंडिग आणि वेल्डिंग केली वर्कशॉप साफ केले.

दि. ३०/१/२०२० गुरुवार
आज सनी सरांचे वर्कशॉप चे लेक्चर होते त्यात त्यांनी गियर म्हणजे काय त्याचे कार्य काय त्याचे प्रकार किती असतात शिकवले वर्कशॉप मधील लेक मशीन चालून दाखवली नंतर विज्ञान आश्रमा साठी लायटीचे खांब आणले होते त्या साठी L यांगल कापले वेल्ड केले.

दि. ३१/१/२०२० शुक्रवार
आज गोठयात बसवलेल्या सोलर प्यानलच्या ब्याट्री साठी बॉक्स बनवायला सांगितले त्याची मापे घेतली 11am ड्रॉईंग चे लेक्चर झाले लाईट च्या खांबा साठी खोदलेलेल्या खड्या मुळे फुटलेली  पाईप लाईन दुरुस्त केली.

दि. २/२/२०२० रविवार
आज सकाळी विशाल सरांचे इलेक्टिकलचे लेक्चर झाले त्यात सोलर ऊर्जेचे फायदे, तोटे भविष्यात त्याचा आपल्याला कसा फायदा होईल सांगितले नंतर सनी सरांनी गोठ्यातल्या सोलर प्यानलच्या ब्याटरी साठी कव्हर आणि स्टॅन्ड बनवायला सांगितले स्टॅन्ड बनून घेतला कव्हरची मापे घेतली DIC हॉस्टेलच्या मागे पाण्याच्या कॉक साठी पत्र्याचे बॉक्स बनवले.

दि. ३/२/२०२० सोमवार
आज सकाळी स्टोरी झाली त्यात कोरोना वायर्स विषयी माहिती दिली कॉकच्या बॉक्स ला कडी आणि बिजागरी बसवली ब्याटरीच्या कव्हरची डिजाईन सनी सरांन बरोबर बनून घेतली बॉक्सला रेड ओक्ससाईड लावले.

दि.४/२/२०२० मंगळवार
आज सकाळी सनी सरांचे लेक्चर होते त्यात त्यांनी वस्तुमान आणि आकारमान ह्याचा अर्थ संमजवला नंतर कॉकच्या बॉक्स ला कलर मारला 2pm कम्प्युटर चे लेक्चर झाले त्यात PPT कशी बनवायची शिकवले. गणेश सरांनी गाईच्या गोठ्याला सलायडिंग गेट बनवायला सांगितले त्या साठी जुने मट्रेल शोधले ते कटिंग करून ग्राइंड केले.

दि.५/२/२०२० बुधवार
आज सकाळी विशाल सरांचे इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले त्यात त्यांनी हॉबी सर्किट कशे बनवतात आणि त्याचे प्रकार ह्याची माहिती दिली नंतर गोठ्यातल्या सोलरच्या बॅटरी साठी च्या कव्हरचा पत्रा प्लाजमा मशीन वर सनी सरांन कडून कट करून घेतला तो बेंड केला वेल्ड केला.

दि.६/२/२०२० गुरुवार
आज सकाळी सनी सरांचे लेक्चर होते त्यात त्यांनी फ्लोचार्ट चे रिविजन घेतले नंतर गोठयातल्या बॅटरीच्या कव्हर आणि स्टँड ला रेड ऑक्साईड लावले गोठयातल्या शेड ला पाईप वेल्ड केला आणि शेड कट केला एक्सट्रा झाळी कापून घेतली.

दि.७/२/२०२० शुक्रवार
आज सकाळी फ्याबल्याब चे लेक्चर झाले मॅडम ने स्मार्ट दासबिन चे प्रोजेक्ट दिले कव्हर आणि स्टँड ला कलर मारला 2pm डोईनग चे लेक्चर झाले नंतर गोठयात कडी आणि जाळी बसवली नवीन शेड ला गाय जाऊ नये म्हणून बॉर्डर बसवली

दि.९/२/२०२० रविवार
डेली डायरी पूर्ण केली.

दि.१०/२/२०२० सोमवार
आज सकाळी स्टोरी झाली त्या नंतर गोठयात स्लायडिंग गेट बनवण्या साठी जुने मटरेल जमा केले ते कट करून ग्राइंड केले वोर्कशॉपची साफसफाई केली सेमिनार झाला.

दि.११/२/२०२० मंगळवार
आज सकाळी सनी सरांचे प्लम्बिंग या विषया वर लेक्चर झाले नंतर प्लम्बिंग चे प्रक्टिकल झाले 2pm कम्प्युटर चे लेक्चर होते त्यात गुगल फॉर्म कसा बवायचा शिकवले फॅबलॅब च्या स्मार्ट डस्टबिन प्रोजेकट ची महिती जमा केली डेली डायरी अपडेट केली.

दि.१२/२/२०२० बुधवार
फ्याबल्याब साठी ट्रॉली बनवायला सांगितली त्याची मापे घेतली व कटिंग केली.

दि.१३/२/२०२० गुरुवार
ट्रॉली च्या मट्रेला वेल्डिंग केली.

दि.१७/२/२०२० सोमवार
आज सकाळी स्टोरी झाली नंतर फ्याबल्याब च्या ट्रॉली साठी जाळी कट केली व वेल्डिंग केली 4pm सेमिनार झाला.

दि.१८/२/२०२० मंगळवार
आज बाहेर काम करायला गेलो होतो.

दि. १९/२/२०२० बुधवार
आज सकाळी बाहेर कामाला गेलो.3pm परत आलो सेक्शन चेंज झाले फॅबलॅब च्या ट्रॉली ला जाळी वेल्ड केली.