08.01.2025

पहिला दिवस प्लंबिंग चालू होती त्यांना तिथे मदत केली तिथून वर्कशॉप मध्ये गेलो फळ्यांची कटिंग केली कॉम्प्युटर क्लास मध्ये जाऊन एडिटिंग करायला शिकलो

09.01.2025

विशाल सरांनी आज संपली कशी बनवायची त्याची माहिती दिली त्यानंतर आम्ही स्क्रॅप मध्ये जाऊन पत्र आणून त्याचे माप घेतले तो पत्रा मापाप्रमाणे कट केला त्यानंतर बेंडिंग मशीन वरती बेंड करून घेतला साईटने व्यवस्थित बेंड केला हातोडीने ठोकून घेतलं त्यानंतर पॉलिश केली आणि सेक्शन ची क्लिनिंग केली

10.01.2025

होस्टेलच्या रूमसाठी टेबल बनवायचे होते म्हणून आम्ही दोघेजण तिथे जाऊन माफ घेतले मग स्क्रॅप मध्ये गेलो तिथून स्क्रॅपचा मटरेल आणलं त्यानंतर ते कट केलं नंतर ते व्यवस्थित घासून घेतले

12.01.2025

खुर्चीचा पाय तुटला होता तर त्यासाठी रोड आणून त्याला वेडिंग केली नंतर वाल आर्टचं काम राहिलं होतं पूर्ण करायला घेतलं त्यानंतर खुर्चीला ग्राइंडर ने पोलीस केली

13.01.2025

ऑल अर्थ बनवण्यासाठी दिपाली मॅडम सोबत स्क्रॅप मध्ये जाऊन मटेरियल शोधून आणले नंतर ते पाण्याने धुऊन घेतलं नंतर कट करून घेतलं वेल्डिंग आणि ग्राइंडिंग केली नंतर फ्रेमला वेल्डिंग करायला घेतली प्लेटला होल मारले

14.01.2025

चपातीचे मशीन खराब झाली होती त्यामध्ये ग्रीस भरले त्यानंतर बेरिंग काढले ती जाम झाली होती मोकळी केली त्यानंतर स्क्रॅपमध्ये जाऊन कॉम्प्युटर लॅबला टीव्ही येणार आहे म्हणून तिथून मटेरियल आणलं देवीचं स्टॅन्ड बनवण्यासाठी त्याला कट करून घेतले ग्राइंडिंग केले

15.01.2025

वेल्डिंगचे स्पॉट होते ते ग्राइंडर ने प्लेन करून घेतलं त्यानंतर त्याला कलर द्यायचा होता म्हणून माग घेऊन गेलो मटेरियल सगळ्यात आधी रेडॉक्साईड मारून घेतलं त्यानंतर स्क्वेअर ट्यूबला होल मारले आणि फ्रेमला ब्लॅक ऑइल पेंट दिला

16.01.2025

टीव्हीच्या फ्रेंच काम करीत होतो ते पूर्ण करायला घेतलं क्लाऊड कट केलं होतं त्याला ब्रशने घासून घेतले त्यानंतर त्याला भिंतीला बसवायला चार पट्ट्या कापल्या होत्या त्या बेंड करून घेतल्या नंतर त्या वेल्डिंग करून त्यांना घेतली

17.01.2025

मापन यावर प्रॅक्टिकल झाले त्यात tape,scale कसे मोजतात त्यांची पद्धत ते शिकलो शिकवलं त्यानंतर मशीन ची ओळख करून घेतली दुपारनंतर पत्रा कटिंग मशीन वर करून घेतल्यानंतर माप घेऊन बिल्डिंग केलं

18.01.2025

आज तीन टेबल आणि खुर्ची पोलीस केली नंतर पावडर कोटिंग करायची होती तर त्याला तीन इंच आणि एक इंच लावून घेतले दुपारनंतर दुसरी खुर्ची पॉलिश पेपरने घासली