छत्री
प्रस्तावना:-
या प्रकल्पात आम्ही फोल्डिंग छत्री तयार केली. ही छत्री तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे पाहुण्यांसाठी बसण्याची आणि सावलीची सोय करणे. कॅम्पसमध्ये योग्य जागा पाहून, छत्री बसवण्याची जागा ठरवली.
या कामात आम्ही वेल्डिंग, कटिंग, पॉलिशिंग, ग्राइंडिंग आणि पॉवडर कोटिंग यासारखी तांत्रिक कौशल्ये शिकलो. छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला. भविष्यात ही छत्री पाहुण्यांसाठी विश्रांतीची जागा म्हणून वापरली जाईल.
सर्वे :–
विविध जागेच निरीक्षण केल कॅम्पस मध्ये आणि छत्री कुठं लावायची त्याची जागा नेमली.
उद्देश :-
छत्री तयार करण्या मागचे कारण हे होत कि, जे पाहुणे येतील त्यांसाठी एक बसायची जागा व एखाद ठिकाण दाखवणे होय.
साहित्य :-
(Tube)
- 25 × 5 mm
- 35 × 5 mm
- 100 × 100 mm
पट्टी (Flat/Strip)
- 30 × 5 mm
- 2
कृती :-
- Cutting (कटिंग) – आवश्यक मोजमापांनुसार कच्चा माल अचूक यंत्राद्वारे कट करणे.
- Welding (वेल्डिंग) – कापलेल्या पार्टस योग्य कोन व मापात वेल्डिंगद्वारे जोडणे.
- Grinding (ग्रॅण्डिंग) – वेल्डिंग जॉइंट्स व पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी ग्रॅण्डिंग करणे.
- Polishing (पॉलिशिंग) – पृष्ठभागाला आकर्षक व चमकदार फिनिश देण्यासाठी पॉलिशिंग.
- Powder Coating (पावडर कोटिंग) – धातूचे संरक्षण व सुंदर लूक देण्यासाठी पावडर कोटिंग प्रक्रिया.
- Assembly (असेंबलिंग) – सर्व तयार पार्टस एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करणे.
- Inspection (तपासणी) – तयार उत्पादनाची मोजमापे, फिनिश व गुणवत्ता तपासणे.
निरीक्षण :-
छत्री कुठं लावायची कुठं छान दिसेल व किती हाईट वर असली पाहिजे याचे निरीक्षण केले,व तिकडे किती साफ-सफाई करायची आणि काय केल्यामुळे आकर्षण होईल त्याचे निरीक्षण केले.
निष्कर्ष :-
आणि मग शेवट निर्णय घेतला कि, डोम समोरील जागा निवडायची व त्या पुढे आकर्षित करायची.
भविष्यातील उपयोय :-
भविष्यात त्या छत्रीच्या सावलीमध्ये पाहुणे किंवा मुलं-मुली बसायची व्यवस्था होईल हा त्याचा भाविष्यातील उपयोग आहॆ
मी हे शिकलो:-
आर्क वेल्डिंग मारायला शिकलो, co2 वेल्डिंग मारायला शिकलो, पावडर कोटिंग करायला शिकलो,ग्रॅण्डिंग व कटटींग शिकलो.



डोम रीनोवेषन :
प्रस्तावना :-
आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.
सर्वे :–
डोममध्ये काय व कसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून गावात जाऊन आणले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.
उद्देश :-
डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.
साहित्य :-
स्क्रॅपर
पुट्टी
ट्रॅक्टर इमल्शन
प्रायमर
डिस्टेंपर
सिमेंट कलर
काळा ऑइल पेंट
सिमेंट कच
पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)
कृती :-
बाहेरून रंग केला, आत वारली चित्रकला केली, खांबाला काळा ऑइल पेंट लावला. बाहेर भिंत बांधली, झाडांच्या फांद्या कापल्या, पाणी जाण्यास भोक पाडले आणि पन्हाळीसाठी हिरवा प्लास्टिक पाईप लावला.
निरीक्षण :-
बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का, आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का, घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे—हे सर्व विचार करून निरीक्षण केले.
निष्कर्ष :-
बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.
आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.
घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.
पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे
भविष्यातील उपयोय :-
डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजसाठी करता येईल.
मी हे शिकलो:-
कलर मारायला शिकलो.
वारली चित्र कसे काढायचे हे शिकलो.
भिंत भांधायला शिकलो.
सिमेंटचे प्रमाण कसे असते ते शिकलो:
- 1 प्लास्टरसाठी → 1 : 3
- भांडकामासाठी → 1 : 6



टाईनी हाऊस
प्रस्तावना :-
आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.
या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.
सर्वे :–
कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.
यात –
- स्वयंपाकघर
- हॉल
- स्नानगृह व शौचालय
उद्देश :-
कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे
- कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.
- स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.
- किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.
- पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.
- ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.
साहित्य :-
- १.५ × १.५ इंच ट्यूब
- सिलिंग शीट (PUC) – छतासाठी
- भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी
- नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी
- सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी
- बाथरूम साहित्य –
- नळ (Tap)
- कमोड (कमोड/शौचालय सीट)
- बेसिन (हात धुण्याचे बेसिन)
- काळी वायर 1.5 mm/2.5
- हिरवी वायर 1.5mm/2.5
- लाल वायर 1.5 mm/2.5
कृती :-
फ्रेम तयार करणे
- १.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे
- नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे
भिंती व छत बसवणे
- भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे
- छतासाठी PUC शीट बसवणे
वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.
- नळ (Tap) बसवणे
- कमोड (Toilet Seat) बसवणे
- बेसिन (Wash Basin) बसवणे
निरीक्षण :-
टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.
निष्कर्ष :-
१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.
भविष्यातील उपयोय :-
टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे
मी हे शिकलो:-
वायरिंग कसे करायचे ते शिकलो.
PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.
स्टाईल्स बसवायला शिकलो.
प्लंबिंग शिकलो.
दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.
पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.


.
.
शेड
.
प्रस्तावना :-
घरासमोरील मोकळ्या जागेचा योग्य वापर करून बसण्यासाठी, वाहन ठेवण्यासाठी व पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून शेड तयार करण्याचा विचार करण्यात आला.
सर्वे :–
उद्देश :-
घरासमोरील मोकळी जागा छायेअंतर्गत बसण्याची व विश्रांती घेण्याची सोयीची बनवणे.घरासमोरील साफसफाई आणि जमिनीचा हानीकारक परिणाम कमी करणे; परिसराचे उपयोगिता वाढविणे.