CNC Machine :
- CNC (Computer Numerical Control) Machine हे संगणकाच्या नियंत्रणाखाली चालणारे आधुनिक मशीन आहे. या मशीनचा उपयोग धातू किंवा इतर Workpiece ला अचूक आकार, माप आणि finishing देण्यासाठी केला जातो. CNC मशीनमध्ये काम करण्यासाठी संगणकात दिलेला Program वापरला जातो.
CNC मशीनचे कार्य :
- प्रथम Workpiece मशीनमध्ये योग्य प्रकारे घट्ट बसवला जातो. त्यानंतर आवश्यक कामासाठी Cutting Tool निवडले जाते. मशीनमध्ये तयार केलेला CNC Program टाकला जातो. Program नुसार मशीनचे Tool योग्य दिशेने आणि योग्य वेगाने हालते आणि Workpiece वर कटिंग करते. त्यामुळे आवश्यक आकार व मापाचा Part तयार होतो.
CNC मशीनचे प्रमुख भाग :
- Control Panel – मशीन नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.
- Computer/Controller – Program नुसार मशीनचे नियंत्रण करते.Spindle – Cutting Tool किंवा Workpiece फिरवते
- .Chuck – Workpiece पकडून ठेवतो.
- Cutting Tool – धातू कापून आवश्यक आकार देतो.
- Machine Bed – मशीनच्या भागांना आधार देतो.
- Tool Turret – विविध Cutting Tools ठेवण्यासाठी वापरले जाते.
- Drive Motor – मशीनच्या हालचालीसाठी शक्ती पुरवते.
CNC मशीनचे उपयोग :
- धातूचे अचूक Parts तयार करणे.
- Drilling, Turning आणि Milling करणे.
- Slot आणि Thread तयार करणे.
- Automobile Parts तयार करणे.
- Machine Components तयार करणे.
- मोठ्या प्रमाणावर एकसारखे Parts तयार करणे.
CNC मशीनचे फायदे : अधिक अचूकता मिळते.कामाची पुनरावृत्ती अचूकपणे करता येते.उत्पादनाचा वेग वाढतो.मानवी चुका कमी होतात.जटिल आकाराचे Parts तयार करता येतात.एकाच Program द्वारे समान प्रकारचे अनेक Parts तयार करता येतात.
CNC मशीन वापरताना काळजी :
- मशीन सुरू करण्यापूर्वी Workpiece आणि Tool व्यवस्थित तपासावे.Workpiece योग्य प्रकारे घट्ट बसवावा.Program चालू करण्यापूर्वी तो योग्य आहे की नाही तपासावा.
- Safety goggles आणि आवश्यक सुरक्षा साधने वापरावीत.मशीन चालू असताना फिरणाऱ्या भागांना हात लावू नये.
- Tool बदलताना मशीन योग्य प्रकारे बंद करावे.मशीनमध्ये काही बिघाड किंवा असामान्य आवाज आल्यास मशीन थांबवून प्रशिक्षित व्यक्तीला सांगावे.
