दिशा दर्शक फलक

साहित्य :- १) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग

साधने :- १) कलर स्प्रे
२) ब्रश
३) पत्रा कापण्याचे कटर
४) वेलडींग मशीन
सेफ्टी :- १) सेफ्टी गॉगल
२) सेफ्टी हेलमेट
३) सेफ्टी शूज
४) सेफ्टी हॅन्डग्लब

कृती :- १) सर्व प्रथम साहित्य , साधने गोळा केली

२) ८* ४ इंच कापून घेतला
३) १ फूट २ इंचचा रॉड घेतला
४) पत्रा व रॉड ला योग्य प्रकारे फिनिशिंग केली
५) पत्रा योग्य प्रकारे रोडला वेलडींग करून घेतला
६) हॅन्ड ग्रॅन्डर फिनिशिंग करून घेतली
७) त्यावर कलर स्प्रेने फ़वारला
८) थोड्या वेळाने योग्यते नाव टाकले
९) दिशा दर्शक बाण दाखवून ते सुखायला ठेवले
१०) अशा प्रकारे दिशा दर्शक तयार केले

फ्लायावूडला सनमायका चिटकवने

1) फ्लायवूड व सनमायका सर्वप्रथम योग्य मापात सनमायका कापून घेणे .

२) त्यांना फेविकॉल लावून एकत्रित चिटकवने .

३) त्यावर दाब देवून चिकट पट्टीने सगळ्या बाजूने घट्ट चिटकवून घेतात .

सनमायका म्हणजे काय ?

सनमायका ही चांगल्या प्रतीचे . व टिकाव परवडणारी हे एक कवच आहे .

उपयोग :- सगळे प्रकारचे टेबल , फर्निचर , घरातील सर्किट बोर्ड ,

वैशिष्ट्ये :- 1) डाग प्रतिरोधक

२) तापमान रोधक

३) बुरशी रोधक .

सनमायका चे प्रकार :-1) डेकोरेटिव्ह सनमायका

२) हाय प्रेशर सनमायका ( HPL )

३) लो प्रेशर सनमायका ( LPL )

४) Industrial सनमायका

५) compact सनमायका

GI पत्र्यापासून डबा बनवणे

1) प्रथम सगळे साहित्य गोळा करणे

२) ९* ९ * ७ सेंटीमीटर चा पत्र कापून घेतला .

३) योग्य मापात फोल्ड करून घेणे .

४) तळा साठी ८ * ८* चा पत्रा कापून घेतला .

५) योग्य पद्धतीने त्याचा डबा तयार केला .

GI म्हणजे काय ?

GLVANIZED IRON

वेल्डिंग करणे ( टेबल बनवणे )

वेल्डिंग म्हणजे काय ?

दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया .

कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य साधने गोळा करणे .

२) टेबल बनवण्यासाठी योग्य मापाचे यल कापून घेतले .

३) आर्क वेल्डिंग मारून आकृती दाखवल्या प्रमाणे जोडले .

४ ) ११ * ११ चे प्लायवूड कापून टेबल ला लावले नट – बोल्डच्या साह्याने लावले .

टेबलला वेल्डिंग करताना चार जोइंट मारले

1 ) बट जोइंट

२ ) कोर्नर जोइंट

३) lap जोइंट

४ ) टी जोइंट

वेल्डिंग पोजिशन वापरले ?

1) flat पोजिशन

२ ) ओवर हेड पोजिशन

३) होरीझहोनटल पोजिशन

४) vertical पोजिशन

रंगकाम करणे

रंगकाम म्हणजे काय ?

रंगकाम केल्याने आकर्षक दिसणे त्या वस्तूची लाइफ वाढवणे

साहित्य / साधने :- रंग , थिनर , स्प्रे गन , पोलिश पेपर , ब्रश , रोलर

कृती :- 1 ) सर्वप्रथम रंग काम करायच्या अगोदर पोलिश पेपर घासून घेणे .

२ ) स्प्रे गन मध्ये रंग भरून योग्य पद्धतीने मारला .

३) टेबल सुकायल ठेवला .

रंगाचे प्रकार :- 1 ) distemper :- घरतील भिंतीसाठी वापरले जातात व टिकाऊ आणि स्वस्त

२) oil पेंट :- चमकदार दिसतो .

३ ) एक्रीलिक पेंट :- चित्रकलेत वापरला जातो .

पेंट मधील घटक :- 1) पिगमेंट :- मुख्य घटक

२) रेसीन :- पिगमेंटला पकडून ठेवते .

३) solvent :- घनपणा देण्याचे काम करतो .

४) एडटीव :- पेंटला विशेष गुणधर्म देतो .

घराच्या पायाच्या आखणी करणे .

घराच्या पायाची आखणी म्हणजे काय ?

घराच्या पायाची आखणी म्हणजे घराचा पाया ,फावडेशन व बांधकाम यांचे मापन होय .

साहित्य / साधने :- फकी , स्प्रीट लेवल , लेवल ट्यूब , गुण्या ,ओंळबा , मेजर टेप ,लाईन दोरी , ८ रॉड .

कृती :-1 ) सर्वप्रथम सेंटर लाईन लाईन दोरी व गुण्या साह्याने आखली .

२) ३ इंच सेंटर लाईन पासून आत व बाहेर बांधकाम लाईन काढली .

३) बांधकाम लाईन पासून ४ इंचावर आत व बाहेर फाउंडेशन लाईन काढली .

४) फाउंडेशन लाईन पासून ४ इंचावर आत व बाहेर पायाची लाईन काढली .

५) ९०मध्ये घराची आखणी केली .

कारपेट एरिया :- बिल्डींगच्या आतील wall टू wall एरिया .

बिल्ट अप एरिया :- बिल्डींगचा पूर्ण एरिय

बिजाग्रींची व स्क्रू चे प्रकार

बिजागरी चे प्रकार :- 1 ) t बिजागरी :- दरवाजे खिद्क्यासाठी उपयोग होतो .

२) पार्लमेंट बिजागरी :- दरवाजा भिंतीला सामंतर राहण्यासाठी उपयोग होतो . हॉल,थीएटर, शाळा ,दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात .

३) टकरी बिजागरी :- घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो .

४) पियानो बिजागरी :- फर्निचरमध्ये उपयोग होतो .

५) बुश बेअरिंग बिजागरी :- प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला

६) बट बिजागरी :- घरच्या दरवाजे खिडक्या उपयोग होतो .

स्क्रू चे प्रकार :- 1) वूड स्क्रू :- लकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर करतात .

२) flat हेड स्क्रु:- बांधकामात उपयोग होतो .

३) ड्राय वाल स्क्रू :- फ्रेम साठी उपयोग करतात .

बॉंड व त्याची माहिती

1 ) स्ट्रेचर बॉंड :- वीत भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉंड वापरला जातो .

२ ) हेडर बॉंड :- वीत भिंतीच्या तोंडावर व्हेदर सारख्या ठेवल्या जातात . वक्र ब्भाग तयार करण्यासाठी याचा वापर करतात .

३) फ्लेमिश बॉण्ड :- सुरवात क्वीन क्लोझर ने सुरवात होते .

४) इंग्लिश बॉण्ड :- हेडर व स्ट्रेचर या पद्धतीने बांधकाम केलं जातो .

५) रॅट ट्रॅप बॉण्ड :- या पोकली असते . साहित्य कमी लागत .

विटेला अर्धा , पाव , पाऊण कापणे याला सांधे मोड करणे म्हणतात .

फ्लेमिश बॉण्ड मजबूत असतो व हा बॉण्ड ज्यास्त वापरला जातो .

लेथ मशीन टर्निंग व बोरिंग करणे

उद्देश :- लेथ मशीन वर ओळख करून घेणे व टर्निंग व बोरिंग करण्यास शिकलो .

साहित्य :- लाकूड ., व वेगवेगळे प्रकारचे रॉड होय .

साधने :- लेथ मशीन .

लेथ मशीन ला सगळ्या मशिनींची जननी म्हणतात .

लेथ माशी चे प्रकार :-

१) इंजिन लेथ मशीन

२) स्पीड लेथ मशीन

३) कॅक्स्टन अँड टरेट लेथ मशीन

४) आटोमॅटिक लेथ मशीन

लेथ मशीन चार मुख्य भाग :-

१) मशीन बेड :-

अ ) वजन दार व मजबूत भाग .

ब ) इतर भागांना स्पीड देतो .

क) बेडवर इतर भाग बसवले जातात .

ड ) बेडला कास्टिंग प्रक्रियेला बनवले जात .

२) हेडस्टोक :-

अ ) या मध्ये सपिण्डल गिअर आणि गती बदलणे याची प्रक्रिया असते .

ब ) चाक वर्क पिसाला पकडायचे काम करतो .

क ) यामध्ये गिअर मेकॅनिझम असतो .

ड ) चाकेचे दोन प्रकार असतात ३ चाक , ४ चाक

३) कॅरेज :- याचे तीन मुगक्य भाग असतात टूल पोस्ट ., कंपाउंड रेस्ट , क्रॉस स्लाईड

४)टे स्टोक :-

अ ) ड्रिलिंग ऑपरेशन वर्क पिसाला छेद करण्यासाठी केला जातो .

बोरिंग ऑपरेशन वर्क पिसमधील हॉल मोठे करण्यासाठी केला जातो .

थ्रेडींग ऑपरेशन वर्क पिसला वृत्ती थ्रेडस करण्यासाठी केला जातो .

लेथ टूल :-

मशीनिंग टूल वर्क पीस पेक्षा जास्त कठीण असतो .

मशिनींग टूल प्रामुख्याने हाय स्पीड स्टील ( HSS ) सिमेंटेड कार्बाईड आणि कार्बन स्टील पासून बनवतात .

अनुमान :- लेथ मशीनचा उपयोग अनेक टूल्स साठी केला जातो .

मापन

उद्देश :- वेगवेगळ्या वस्तूंची मापे घेण्यास शिकणे व त्यांचा उपयोग करणे.

साधने :- 1) फुटपट्टी 2) मेजर टेप 3) वर्नियर कॅलिपर 4) स्क्रू गेज इत्यादी

मापनाच्या दोन पद्धती :-

 1. ब्रिटिश पद्धत :- फलांग इंच फूट शेर मन डझन
 2. मॅट्रिक पद्धत :- मिटर सेंटीमीटर किमी लिटर क्विंटल तास टन

निरीक्षण :- दैनंदिन जीवनात मापन करता येणे. मापन अचूक करणे आवश्यक आहे.

अनुमान :- आपणास प्रत्येक ठिकाणी मापनाची गरज असते

पत्रे काम करणे

उद्देश :- जीआय पत्रापासून नरसाळे बादली डब्बा तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- जीआय पत्रा

साधने :- पत्रा कटर

डबा :-

 1. प्रथम योग्य मापाचे ड्रॉइंग काढून घेतलं
 2. 8*8*6cm साईचा चौकोनी डबा बनवला.
 3. पत्रा योग्य मापात कापला
 4. अशाप्रकारे डबा बनवला.

सुपली :-

 1. प्रथम योग्य मापाची ड्रॉइंग काढून घेतले
 2. योग्य मापात पत्र कापून घेतला.
 3. व सुकली तयार केली.

निरीक्षण :- पत्रा योग्य मापात कापावा लागतो.

अनुमान :- पत्रात जॉइंट्स वर व्यवस्थित जोडावा अन्यथा ते तुटते.

सुतार कामातील हत्यारांना धार लावणे.

उद्देश :- हत्यारांना धार लावायची योग्य पद्धत समजून घेणे.

हत्यार व धार लावण्याची योग्य पद्धत :-

 1. पटासी :- 30 ते 35 डिग्री मध्ये एका बाजूने पटासीला धार लावतात.
 2. रंधापाता :- रंध्याच्या पात्याला 40 ते 45 डिग्री मध्ये धार लावतात.
 3. करवत :- करवतीला 90 डिग्री मध्ये धार लावतात यासाठी त्रिकोणी कानात वापरतात तीवर्ड करण्यासाठीच्या 60 ते 65 डिग्री चा कोण आवश्यक असतो.
 4. वाकस :- वाकसाला 20 ते 25 डिग्री मध्ये धार लावतात.

निरीक्षण :- हत्यारांना योग्य अँगल मध्ये धार लावावी अन्यथा हत्यारांना इजा पोहोचते.

अनुमान :- काम नीट करण्यासाठी हत्यारांना धार लावणे गरजेचे आहे.

पाईपाला थ्रेडिंग व टायपिंग करणे.

उद्देश :- पायपाला थ्रेडिंग व टायपिंग करण्यास शिकणे.

साहित्य :- 1) पाईप 2) सळई 3) ऑइल

साधने :- 1) डाय स्टॉक 2) बुधली 3) टॅपिंग टूल :- 1) टेपर टॅप 2) सेकंड टॅब 3) बॉटमिंग टेप

थ्रेडिंग :- थ्रेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे.

टॅपिंग :- टायपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे.

टॅप्स चे प्रकार :-

 1. टेपर टॅप :- हे अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते.
 2. सेकंड टॅप :- हे पेपर टॅप पेक्षा जास्त आक्रमक पण बॉटमिंग टॅप पेक्षा कमी आक्रमक असतात.
 3. बॉटमिंग टॅप :- हा सगळ्यात आक्रमक असतो व प्रक्रिया जलद होते.

निरीक्षण :- टॅपिंग व थ्रेडिंग करताना ऑइल चा वापर करावा.

अनुमान :- वेगवेगळ्या पायपासाठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरतात.

बांधकामासाठी मातीची व सिमेंटची वीट तयार करणे.

उद्देश :- विटांचे प्रकार समजून घेणे व त्या तयार करण्यास शिकणे.

साधने :- वीट मेकर, थापी , घमेल.

साहित्य :- सिमेंट, वाळू , पाणी , माती, इत्यादी.

कृती :-

 1. सिमेंट व वाळू यांचे 1:6 या प्रमाणात मिश्रण तयार केले.
 2. मिश्रण ब्रिक्स मेकर मध्ये टाकून विटा तयार केल्या.
 3. एका विटेची लांबी 35 सेंटीमीटर रुंदी 15 सेंटीमीटर उंची व 15 सेंटीमीटर घेतली.
 4. या विटेसाठी 1:1लिटर सिमेंट व 6:6लिटर वाळू वापरली.

निरीक्षण :- विटा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्यांचे वेगवेगळे उपयोग असतात.

अनुमान :- बांधकामात विटांचे महत्त्व मोठे आहे.

RCC कॉलम तयार करणे.

उद्देश :- आरसीसी कॉलम चे उपयोग व माहिती मिळवणे.

साहित्य :-

 1. सिमेंट
 2. वाळू
 3. खडी
 4. ऑइल
 5. टॉर्च ऑन बार
 6. बेंडिंग तार

साधने :-

 1. थापी
 2. फावडे
 3. पावर कटर
 4. साचा
 5. मेजर टेप

कृती :-

 1. सर्वप्रथम टॉर्च अँड बार कापून घेतले. ( 2.10मी उंचीचे तीन नग ) तसेच 31 cm चे राऊंड सात बार कापून घेतले.
 2. साचा पूर्णत्वच्छता करून त्याला ऑइल लावला.
 3. सिमेंट वाळू व खडी यांचे 1:2:4 हे प्रमाण घेतले 35 लिटर खडी 17.5 लिटर वाळू व 8.7 लिटर सिमेंट घेतलं.
 4. साच्यामध्ये टोरशन बार ला सात राउंड लावून ते साच्यात ठेवले व काँग्रेस भरून कॉलम तयार केला त्याला 21 दिवस क्युरिंग केला.

आरसीसी चे फायदे :-

 1. जास्त दाब सहन करते तानात सुद्धा पुरेशी ताकद असते.
 2. टिकाऊ पण असते.
 3. आग आणि हवामानात टिकते.

आरसीसी चे तोटे :-

 1. बांधकाम पूर्ण होण्यास वेळ लागतो.
 2. क्युरिंग होताना तडे किंवा भेगा पडू शकतात.
 3. काम पूर्ण झाल्याशिवाय ताकतीचा अंदाज येत नाही.

निरीक्षण :- आरसीसी कॉलम तयार करताना प्रमाण योग्य घ्यावी त्यास क्युरिंग करावे.

अनुमान :- आरसीसी चा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो.

कॉस्टिंग :-

मालाचे नाव
एकूण माल रेट किंमत
टॉर्च ऑन बार ८.४७ मीटर
1.86 किलोग्रॅम
70रु / 1kg 130.4
सिमेंट 13.125kg 7रू / 1kg91.875रू
वाळू 17.5 लि
0.5 घनफूट
27 रु रुपये घनफूट13.5रु
खडी 35 लि
1 घनफूट
25रू रुपये घनफूट 25रु
तार 50gm
0.05 kg
100 रु/ 1kg5रू
ऑइल 100 ml
0.1 लि
20 रु / 1 लि2रु
एकूण 267.775रू

फेरो सिमेंट शीट तयार करणे .

उद्देश :- फेरो सिमेंट तयार करण्यास शिकणे त्यांचं महत्त्व समजून घेणे.

साहित्य :-

 1. सिमेंट
 2. वाळू
 3. टॉर्च ऑन बार
 4. वेल्ड मेष
 5. चिकन मेष
 6. फ्रेम

साधने :-

 1. थापी
 2. घमेले
 3. पक्कड
 4. फावडा

कृती :-

 1. सर्वप्रथम साहित्य गोळा केले.
 2. एल अँगल मध्ये फ्रेम तयार केली (90*42cm)
 3. वेल्ड मेष प्रेम ला वेड केली तसेच चिकन मेष देखील वेल्डिंग. केली.
 4. मॉर्टर. थर प्रथम टाकला.
 5. त्यावर फ्रेम बसवली.
 6. पुन्हा मॉर्टरचा थर देऊन आयताकृती फिरू सिमेंटची शीट्स तयार केली.
 7. 20 ते 21 दिवस क्युरिंग केली.

निरीक्षण :- मजबुतीसाठी वेल्ड मेस व चिकन मेष चा वापर करावा.

अनुमान :- फेरो सिमेंट सीड्स चा वापर अनेक ठिकाणी केला जातो.

अनु क्र मालाचे नाव एकूण माल रेट किंमत
1 सिमेंट6 लि
9kg
7रु 63रू
2 वाळू18 ली
0.6 घनफूट
27रू घनफूट 16.2रु
3 वेल्ड मेस4.06 स्क्वेअर फिट 15रु / स्क्वेअर फिट 60.9रू
4 चिकन मेश 4.06 स्क्वेअर फिट7रू / स्क्वेअर फिट 28.42रु
5L अँगल0.0095kg70रु /1 kg0.66रू
6 वेल्डिंग रॉड 55रू / 1 नग 25रु
7 तार 50gm
0.05kg
100रु / 1kg5रू
एकूण 199.18रु

सोल्डरिंग करणे.

उद्देश:- जी आय पत्र्याच्या डब्याला सोल्डरिंग करणे.

साहित्य :-

 • सोल्डरिंग मटेरि
 • एच सी आय
 • जस्त
 • फ्लेक्स

साधने :- 1) खड्या 2) ब्लू लॅम्प

कृती :-

 1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.
 2. एच सी आय मध्ये जस्त टाकून फ्लक्स तयार केला फ्लूक्सने सोल्डरिंग करायची जागा स्वच्छ केली.
 3. खड्यावर गरम करून घेतलं
 4. त्याने सोल्डरिंग मटेरियल सोल्डरिंग करण्याचा ठिकाणी वितळवले व सोल्डरिंग केले.
 • खड्या ही तांब्याची असते कारण तांबा हा लवकर गरम होतो व लवकर गार होतो.
 • कथिल (60%) + शीस (40%) = सोल्डरिंग मटेरियल
 • Hci + जस्त = flux

निरीक्षण :- HCI चा वापर काळजीपूर्वक करावा अन्यथा आपल्याला हानी पोहोचते.

अनुमान :- सोल्डरिंग चा वापर अनेक ठिकाणी केला.

सोल्डरिंग :- दोन किंवा अधिक वस्तू वितळवून जोडणे यामध्ये शेजारच्या धातूपेक्षा कमी वितळांना असलेला धातू वापरला जातो.

प्रोजेक्ट चे नाव :- शेती ऑफिसच्या ग्रील बनवणे .

विद्यार्थ्यांचे नाव :- गौतम ढेबे .

साथीदाराचे नाव :- ऋतिक टेमकर .

मार्गदर्शक :- जाधव सर , पुरणेश सर .

दिनांक :- १८ ऑक्टोबर २०२२

उद्देश :-

     १) वेल्डिंग करण्यास शिकणे . 
     २) मोजमाप करण्यास शिकणे . 
     ३) अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे . 
     ४) प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे . 

नियोजन :-

     १) प्रथम काम समजून घेतले . 
     २) नंतर ऑफिस मध्ये जाऊन  मापे घेतली . 
     ३) त्या ग्रीलची आकृती काढून माप  दिली 
     ४) मग त्याला डिझाइन ठरवली . 
     ५) मग अंदाज पत्र  तयार केले . . 
     ६)  मग प्रत्यक्ष काम सुरु केले . 
     ७)  सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केलं
अ . क्रमटेरियलवापरलेले मालदरकिंमत
१)
२५*३ अँगल६ किलो७५ रु४५० रु
२)
१०*१० बार१७ किलो६७ रु११३९ रु
३)
डिझाइन२. ८७ किलो१०० रु२८७ रु
४)
२५*५ पट्टी०. ९९९ किलो७० रु६९. ९३ रु
५)
रेडॉक्सईड२२५ ml२०० रु४५ रु
६)इतर खर्चइतर८० रु

एकून खर्च = २०७०. ९३ रु

झीज १०% = २०७ . ०९ रु

मजुरी 20% = ४१५ रु

एकून खर्च = २६९३ . ०२ रु

साहित्य :- वेल्डिंग रॉड , १० mm चे बार , २५*३ L angle , Redoxide, डिझाईन .

साधने :- वेल्डिंग मशीन . होल्डर . मेजर टेप . चॉक ., ब्रश

कृती :-

1 ) सर्व प्रथम मापे मोजली .

२) नंतर आकृती काढली .

३) अंदाज पत्रक तयार केले

४) काम कधी करणार आहे ते ठरवले .

५) गावातून जाऊन साहित्य आणले

६) साधने गोला केली

७) मग ग्रील बनवायला सुरवात केली .

८) मग आम्ही किती फुटाची ग्रील बनवायची आहे ते बघितले .व ४*४ फुटाची बनवायची आहे.

९) नंतर २५*२५ *३ चा l अँगल ४फुटाचे ४ अँगल कापले

१० ) मग त्यांची फ्रेम बनवून घेतली . त्याचा डायगोनिया चेक केला .

११) नंतर त्या मध्ये माप घेऊन त्या मध्ये किती बार बसतील व कसे बसवायचे ते बघितले

. १२ ) व तेवढे १०*१० mm चे बार कात केले .

१३) व ज्या प्रमाणे लावायचे आहेत त्या प्रमाणे लावले .

. १४) मग फुल वेल्डिंग मारली

१5) मग आकर्षक दिसण्यासाठी व घट्ट दिसण्यासाठी दोन डिजाइन लावल्या . व एका ग्रील ८ हॉलपास मारले म्हणजे ९ ग्रील ८१ हॉलपास मारले त्यासाठी आम्ही २५२५५ ची मेटल पट्टी वापरली ..

१६ ) अशा प्रकारे ९ ग्रील तयार करून घेतल्या . व त्यांना रेडॉक्सिडे मारला

. १७) त्यासाठी आम्हाला २ दिवस लागल.

.

.

प्रत्यक्ष खर्च :-

अ . क्रमटेरियल वापरलेला माल दर किंमत
1 २५*३ L angle ५४ किलो ७५ रु ४०५० रु
१०*१० बार १५३ किलो ६७ रु १०२२५ रु
डिझाईन २५.८३ किलो १०० रु २५८३ रु
Redoxide २. २५ L200 ली ४०५ रु
२५*५ पट्टी ८. ९९ किलो ७० रु ६२९.३७ रु
इतर खर्च ८०*९ ७२० रु ७२० रु

एकून खर्च = १८६३८.३७ रु

झीज १०% = १८६३ . ८३ रु

मजुरी 20% = ३७३२० रु

एकून खर्च = २४२३२ . २ रु

एका गील चा खर्च = २६९३.०२

२६९३ . २ * ९

९ ग्रील चा खर्च = २४२३२ .२

.अनुभव :- वेल्डिंग ची प्रक्टीस झाली , कामातून वेगळा अनुभव भेटला , वेगवेगळ्या अडचणी आल्या त्यांना सामोरे कसे जायचे ते शिकलो ,व वेल्डिंग चा वे वाढला .