उद्देश:- ग्रे वॉटर प्लंबिंग ,सोलर कुकर क्लिनिंग, करंट पासून वाचण्यासाठी सेफ्टी ,मेन स्वीच बंद कसे करायचे त्याची माहिती.
(1) ग्रे वॉटर साहित्य:- चाकू, पाईप, ड्रिलमशीन, सोलुशन, ड्रिलमशीन फिट करण्याचा पाना .
कृती:- ग्रे वॉटर मध्ये आज आम्ही एका टब मधलं पाणी दुसऱ्या टब मध्ये जाण्यासाठी आम्ही प्लंबिंग केलं. सरांनी आम्हाला प्रोसेस सांगितली. पहिला घाण पाणी असतं ते घाण पाणी त्या टबमध्ये पडतं . ह्या झाडामुळे पाणी शुद्धीकरण होतं मग ते पाणी शेताला सोडले जाते.
सर आम्हला ग्रे वॉटर ची माहिती सांगत होते.
या झाडामुळे शुद्ध होतं.
प्लंबिंग काम:- पहिल्यांदी आम्ही पाईप मापानुसार कापले मंग ड्रिल मशीन ला राउंड कटर लावून ते जे टब होते त्या टबाच्या खालच्या बाजूला गोलाकाराने कट करा मंग त्यामध्ये पाईप लावा म्हणजे एका डब्यातून दुसऱ्या प्रभात पाणी जाईल व लवकर शुद्ध होईल. पाईप चिपकून राहावा म्हणून आम्ही सोलुशन लावलं होतं आमचे प्लंबिंग चे काम झाल्यावर आम्ही मेन स्वीच कसं करायचं ते शिकायला गेलाे. सोलुशन लावणे.
(2) मेन स्विच कसे बंद करायचे ते शिकणे:- सरांनी आम्हाला food lab च्या पाठीमागील मेन स्वीच कसं ऑफ करायचं ते शिकवलं . आम्हाला सरांनी सांगितले त्यामध्ये 440 करेंट असतं. जर आपण काहीही सेफ्टी न घालता गेलाे आणि हात लावला तर आपण मरू शकतो. पायात रबराची चप्पल घातली पाहिजे किंवा हाताला रबराचे हॅन्ड ग्लोज घालायचे. आपण सुरक्षित राहू शकतो .आपल्याला करेंट नाही बसणार. सरांनी मंग तीन फ्युज दाखवले लाल पिवळा आणि निळा पहिला फ्यूज खाेल्ल्यावर फुडल्याबची लाईट जाईल. दुसरा फ्यूज खाेल्ल्यावर वर्कशॉप ची लाईट जाईल आणि तिसरा फ्यूज खाेल्ल्यावर सगळीकडे लाईट जातील. पहिला फ्यूज दुसरा फ्यूज तिसरा फ्यूज
(3) मग सरांनी आम्हाला पोल वायरिंग कनेक्शन कसं केलं आणि त्याच्यापासून धोका काय ते सांगितलं. पोल वायरिंग जे कनेक्शन असतं त्याला जर आपण हात लावला तर आपण करंट लागून मरू शकतो. आपण त्याला हात लावायचा नाही कारण ते डेंजर असतं. आपल्याला जर त्याचं काम करायचं असेल तर आपल्याला मेन स्वीच बंद करायला लागेल आपलं काम पण होईल आणि आपण सुरक्षित पण राहू शकतो.
(4) सोलर कुकर क्लिनिंग साहित्य:- निर्मा, साबण ,घासणी, टब ,मग.
कृती :- सर्वात पहिले त्यावर पाणी टाकायचे मग साबण आणि घासणी घेऊन ते सोलर कुकर घासायचे मग त्यावर निर्मा टाकून स्वच्छ घासायचे .घासून झाल्यावर त्याच्यावर पाणी टाकायचे .