दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे याची खात्री करावी.
विद्युत काम करताना रबरी हातमोजे व रबरी बूट वापरावेत.
उपकरणे व विजेच्या बोर्डची व्यवस्थित देखभाल झाली आहे का ते तपासावे
.
शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्यास पाण्याचा वापर करू नये; माती किंवा वाळू वापरावी.
प्लगमध्ये योग्य वायरच वापरावी.
टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह तपासण्यासाठी करावा.
विद्युत काम करताना व्यवस्थित विद्युतरोधक आवरण असलेली उपकरणे वापरावीत.
विजेचा धक्का लागलेल्या व्यक्तीला थेट स्पर्श करू नये; लाकडी काठी किंवा विद्युतरोधक वस्तूने विजेपासून दूर करावे.
कामाची जागा वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ करावी.
योग्य अग्निशामक साधन उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा आणि त्याची तपासणी वेळोवेळी करावी.
जखम झाल्यास प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा.
