Date: 12/07/ 2026.

1. प्रस्तावना

नाचणी (रागी) आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या कुकीज या पौष्टिक, चविष्ट आणि आरोग्यदायी असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर असल्यामुळे लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या कुकीज उत्तम पर्याय आहेत.

2. साहित्य (1 किलो मिश्रण)

अ.क्र. साहित्य प्रमाण

1 नाचणी पीठ 400 ग्रॅम

2 गव्हाचे पीठ 300 ग्रॅम

3 पिठीसाखर 150 ग्रॅम

4 बटर 100 ग्रॅम

5 बेकिंग पावडर 5 ग्रॅम

6 बेकिंग सोडा 2 ग्रॅम

7 व्हॅनिला इसेन्स 2 मि.ली.

8 दूध आवश्यकतेनुसार (40-60 मि.ली.)

3. कृती

1. नाचणी पीठ व गव्हाचे पीठ चाळून घ्या.

2. त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिसळा.

3. वेगळ्या भांड्यात बटर आणि पिठीसाखर एकजीव होईपर्यंत फेटा.

4. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.

5. आता पीठाचे मिश्रण थोडे-थोडे करून मिसळा.

6. आवश्यकतेनुसार दूध घालून मऊ गोळा तयार करा.

7. 15-20 मिनिटे झाकून ठेवा.

8. गोळा लाटून कुकी कटरने आकार द्या.

9. बेकिंग ट्रेवर ठेवा.10. 170-180°C तापमानावर 15-18 मिनिटे बेक करा.

11. थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात पॅक करा.

4. कॉस्टिंग (अंदाजे)

साहित्य किंमत (₹)

नाचणी पीठ 28.00

गव्हाचे पीठ 12.00

पिठीसाखर 7.50

बटर 50.00

बेकिंग पावडर 2.00

बेकिंग सोडा 0.70

व्हॅनिला इसेन्स 4.00

दूध 2.50

एकूण कच्चा माल = ₹106.70

इतर खर्च

वीज/गॅस = ₹10.00

पॅकिंग = ₹20.00

मजुरी = ₹25.00:

एकूण उत्पादन खर्च = ₹161.70

(अंदाजे ₹162)

35% नफा

नफा = ₹56.70

विक्री किंमत

एकूण विक्री किंमत = ₹220 प्रति किलो

5. आवश्यक उपकरणे

वजन काटा

चाळणी

मिक्सिंग बाऊल

बेकिंग oven

कटरस्पॅटुला

पॅकिंग बॉक्स/पाउच6.

साठवण

पूर्ण थंड झाल्यानंतर एअरटाइट डब्यात भराव्यात.थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.शेल्फ लाइफ: 45-60 दिवस.