पुरणपोळीची पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य. हरभरा डाळ दोन किलो, इलायची 100 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम, जायफळ 16 ग्रॅम, गुळ एक किलो 600 ग्रॅम ,एवढक पदार्थ घेतले आणि बनवायला सुरुवात केली. पहिले डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली , आणि त्यानंतर घेतलेले सर्व पदार्थ मिक्स केले आणि ते गॅसवर ठेवली शिजण्यासाठी ते शिजल्यानंतर एक टोपशी घेतली ,आणि एक चाळणी ,एक ग्लास, आणि टोपशी वरती चाळणी ठेवली आणि शिजलेली डाळ त्याचा वरती टाकली आणि ग्लास वरतून फिरवला आणि ते चाळलेल ड्रायर मशीन मध्ये ठेवल त्याच्यानंतर ती पाऊडर काढली आणि पॅक केली.