१. मल्टीमीटर

आज मी तुम्हाला मल्टीमीटर बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये मल्टीमीटर कसे दिसते व त्याचे कार्य काय याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

मल्टीमीटर चा फोटो पुढील प्रमाणे :-

मल्टीमीटर त्याच्या नावातच या यंत्राचा अर्थ आहे. म्हणजे या यंत्राने आपण अनेक एकक मोजू शकतो. उदाहरणार्थ एसी, डीसी, वोल्टेज, ओहम इ. त्याचे अनेक उपयोग तर आहेतच पण ह्याला सोबत नेणे खूप सोपेही असते त्यामुळे इलेक्ट्रिकल मधले सर्वात उपयोगी यंत्र आहे.

.

२. बोर्ड भरणे

. आज तुम्हाला इलेक्ट्रिकल बोर्ड बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आपण तो कसा भरावा, त्याचा फायदा काय आणि त्याची एकूण किंमत किती येते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

. आपण दोन स्विच व दोन क्लब वाल्या बोर्ड चे उदाहरण बघणार आहोत. इलेक्ट्रिकल बोर्ड भरत असताना एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कंपनी वाले कधी पण बोटचे किंवा लक किंवा स्विच चे स्क्रू फक्त चार किंवा दोनच देतात जास्तीचे देत नाहीत त्यामुळे त्यांना हरवू नये. सर्वात पहिल्यांदा बघून घ्यायचे आपल्याला किती प्लग व किती बसवायचे आहे. त्यानुसार बोर्ड मध्ये तशा जागा असतात. काही जागा या स्वीच साठी असता व प्लक साठी जागा करायची असेल तर स्विचसाठी जागा असते, तर त्याला फक्त थोडे मोठे करायचं असते ते आपण इलेक्ट्रिकल नाही ने करू शकतो. आता स्विच व प्लग आपापल्या जागेवर लावायचे. या गोष्टी लावून झाल्यावर एक लक्षात घ्यायचं ते म्हणजे आपल्याला तीन वायर या बाहेर काढायच्या असतात. अर्थिंन, न्यूट्रल, फेज. तुम्ही सुरुवात कुठल्याही वायरपासनं करू शकतात.

. बोर्ड भरणे सोपे जावे म्हणून पुढील फोटोची मदत घ्या.

फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्थिंन वायर ही दोन्ही प्लगला जोडून बाहेर काढावी. त्यानंतर न्यूट्रल बाहेरही दोन्ही प्लगला जोडून बाहेर काढावी. त्यानंतर दोन्ही स्विचच्या वरच्या किंवा खालच्या बाजूने फेज वायर जोडून बाहेर काढावी. लक्षात ठेवा की जर तुम्ही ती वायर वरतून जोडत असाल तर दुसऱ्या सूचला पण ती वरतूनच द्यावी. आता दोन्ही प्लग व स्विचला फेसज च्या वायरने जोडावे. आता बोर्डचा मागचा भाग त्याला लावावे ज्याने तुमचा बोर्ड पूर्णतः तयार होईल.

. या बोर्डचा फायदा म्हणजे तुम्ही या बोर्डला अजून लांब वायर लावून बनू शकता. याच्याने एखादा पॉईंट जर लांब असेल तर तो तुम्हाला जवळ करता येईल.

. आता आपण एका बोटचा खर्च किती येतो याबद्दल बघू.

. 1. 2 स्विच = 40रू.

. 2. 2 प्लग = 60रू.

. 3. बोर्ड = 40रू.

. 4. तीनही वायर ची किंमत = 30रू.

. एकूण बोर्ड ची किंमत = 170रू.

. आम्ही बनवलेल्या बोर्ड चे फोटो :-

३. एकसर जोडणी

आज मी तुम्हाला एक सर जोडणी बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये एकसर जोडणी कशी करतात, तिचा उपयोग काय व ती कुठे वापरली जाते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

. एकसर जोडणीची आकृती पुढील प्रमाणे :-

एकसर जोडणीचे कनेक्शन करताना सर्व बल्ब एकाच प्रतलात जोडले जातात. ज्यामुळे एक बल्ब जरी खराब झाला तरी सर्व कनेक्शन ब्रेक होऊ शकते. त्यामुळे याला घरांमध्ये खूप कमी वापरले जाते. उदाहरणार्थ घरातील जळणाऱ्या लाईटस् .

४. समांतर जोडणी

. आज मी तुम्हाला समांतर जोडणी बद्दलची माहिती देणार आहे. ही जोडणी कशी करतात, या जोडणीचा उपयोग काय आहे व ही जोडणी सर्वात जास्त कुठे वापरली जाते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

समांतर जोडणी ची आकृती पुढीलप्रमाणे :-

. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही जोडणी करताना प्रत्येक बल्पला एकत्र न जोडता वेगवेगळे जोडतात. यामुळे सर्व बल्पांना तेवढाच करण पोचतो जेवढा तिकडे दिलेला असतो. उदाहरणार्थ 230v असेल तर बाकीच्या सर्व बलपांना पण 230v जाणार. या जोडणीचे वैशिष्ट्य म्हणजे जरी एका बल्बचे कनेक्शन खराब झाले तरी बाकीचे बल्प चालूच राहतात सर्किट ब्रेक होत नाही. म्हणून या जोडणीचा वापर मुख्यतः घरांमध्ये केला जातो.

. आम्ही केलेल्या समांतर जोडणीच्या प्रात्यक्षिकाचे फोटो पुढील प्रमाणे.

एकाच प्रतलात जोडले जातात. ज्यामुळे एक बल्ब जरी खराब झाला तरी सर्व कनेक्शन ब्रेक होऊ शकते. त्यामुळे याला घरांमध्ये खूप कमी वापरले जाते. उदाहरणार्थ घरातील जळणाऱ्या लाईटस् .

५. बायोगॅस

आजी तुम्हाला बायोगॅस बद्दल काही माहित सांगणार आहे. ज्यामध्ये आपण बायोगॅसची आकृती पाहणार आहोत. बायोगॅसचा उपयोग सांगणार आहे.

. बायोगॅस आकृती

आकृतीत दाखविल्याप्रमाणे ओला कचरा mixing tank मध्ये टाकायचा त्याच बरोबर थोडे पाणी ही टाकायचे. कचरा टाकल्यावर तो खालच्या टाकीत जातो ज्यात सूक्ष्मजीव असतात. जे त्या कचऱ्याचे रूपांतर गॅसमध्ये करतात. ज्याला आपण बायोगॅस म्हणतो. हा गॅस आतल्या तरंगत राहतो. या वायूला बाहेर काढण्यासाठी वरती एक पाय दिला जातो ज्याला चालू केल्यावर आपल्याला गॅस उपलब्ध होतो. पण सगळ्यात कचऱ्याचे रूपांतर होत नाही. तर या राहिलेल्या कचऱ्याचा वापर आपण शेतात खत म्हणून करू शकतो.

. हा बाळासाहेब नैसर्गिक असतो. या गॅस मध्ये 60% मिथेन वायू असतो व बाकीचे 40% कार्बनडायऑक्साईड असते. ज्यामुळे या वायूचा त्रास निसर्गाला होत नाही.

. आम्ही बायोगॅस तयार करत असताना चे फोटो.

६. 3D प्रिंटर

. मी आज तुम्हाला 3D प्रिंटर बद्दल सांगणार आहे. यामध्ये आपण design कशी करावी व 3D प्रिंटर कस चालू कसा करावा ते सांगणार आहे.

. Tinkercard हा एक design करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे design बनवू शकतो. उदाहरणार्थ लोगो, key-chain, छोटी मूर्ती, वेगवेगळ्या सोभक वस्तू इ.

Tinkercard app पुढीप्रमाणे:-

नंतर त्या design ला त्या app मध्ये save करावे आणि त्या save केलेल्या design ला संगणकावर add करावे. मग slicer नावाच्या app मध्ये थोडे edit करावे. आता ही design pendrive मध्ये copy paste करावी. त्या pendrive la 3D प्रिंटर machian ला जोडला की मग machian ला सुरू करण्याची command द्यायची. आणि मग तेथे तुम्हाला किती वेळ लागेल व किती material वापरले जाईल ते दिसेल. मग तुमचे design तुम्हाला मिळेल.

मी केलेली design पुढीप्रमाणे :-

७. कृत्रिम श्वसोच्छ्वास

माझा electrical section चा पहिला दिवस (१/८/२०२४) होता. तेव्हा आम्ही दुपारी एखाद्या व्यक्तीला जर shock लागला तर आपण काय करायचे याबद्दलचे प्रात्यक्षिक केले होते. त्यामध्ये आम्ही कृत्रिम श्वसोच्छ्वास कसा हे शिकलो.

. मला जे काही समजले ते मी आज तुम्हाला सांगतो.

. जर एखाद्या व्यक्तीला shock लागला तर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वसन द्यावे. या प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत पण जेव्हा shock लागतो, तेव्हा फक्त दोन प्रकार Schafer’s method व Sylvester method यांचा उपयोग करावा. पण कोणत्याही वेळी कोणताही प्रकार वापरू नये. कोणत्या वेळी कोणता प्रकार वापरायचा हे तुम्हाला सांगतो.

Sylvester method:-

This image has an empty alt attribute; its file name is silvestermethod-1.png

. जेव्हा व्यक्तीला shock लागला आणि त्याच्या पोटावर जखम झाली तर ही पद्धत वापरावी. यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला झोपवावे आणि त्या व्यक्तीचे हात पकडायचे आणि छातीवर एका क्षणासाठी दाब द्यायचा आणि ही प्रक्रिया तीन, चार मिंनीट करत रहायचे ज्यामुळे ती व्यक्ती शुद्धीवर येईल.

Schafer’s method

This image has an empty alt attribute; its file name is download.jpg

जेव्हा व्यक्तीला विद्युत अपघातामुळे पाठी वर जखम होते तेव्हा ही पद्धत वापरावी. यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला पोटावर झोपवावे. त्यानंतर कमरेच्या थोड्या खाली आपला तळहात ठेवावा ( चित्रात दाखवल्याप्रमाणे ) आणि दाब द्यावा. ज्याने त्या व्यक्तीला श्वास घेता येईल आणि ती व्यक्ती शुद्धीवर येईल.

तर अश्या प्रकारे तुम्ही एका shock लागलेल्या व्यक्तीला वाचवू न शकतात.

८. इलेक्ट्रिकल सुरक्षा

आम्हाला पहिल्या दिवशी (दि.१/८/२०२४) विद्युत सुरक्षे बद्दल सांगितले.

ज्यामध्ये CPR, electrical चे काम करताना कोणते कपडे घालावे व विद्युत उपकरणांचा कसा उपयोग करायचा याबद्दल माहिती दिली. त्यातील मला जे समजले ते मी सांगतो.

. सर्वात पहिल्यांदा आपण सुरक्षित असे कपडे घालावेत. कारण काम करताना जर अपघात झाला तर आपल्याला काही होणार नाही.

त्यानंतर आपल्या उपकरणांवर रबर किंवा प्लास्टिकचे आवरण असावे. कारण आपली उपकरणे ही लोह या धातूपासून बनवले जातात, ज्याच्या ने ते विद्युत सुवाहक बनते. ज्यामुळे आपल्याला shock लागू शकतो. असे होऊ नये म्हणून उपकरणांवर रबर किंवा प्लास्टिकचे आवरण असणे गरजेचे आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण आपले काम करायला जाऊ शकतो.

काम करत असताना आपले हात ओले नसेल पाहिजे. काम करताना hand gloves शिवाय तारांना हात लावू नये.

आता आपण एखाद्याला shock लागला तर काय करायचे हे पाहूयात.

सर्वात पहिल्यांदा त्या घरातील सर्व MCB हे बंद करायचे आणि जर तुम्हाला तेथील MCB कुठे आहे हे माहीत नसेल तर सुक्या लाकडाच्या किंवा सुक्या कापडाच्या मदतीने त्या व्यक्तीला बोर्डपसून बाजूला करायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला सुक्या कापडावर किंवा लाकडाच्या गोष्टी वर झोपवायचे आणि त्याला CPR द्यायचे. CPR दिल्यावर त्या व्यक्तीला पाणी न देता चहा किंवा कॉफी द्यावी. जर CPR देऊन पण व्यक्ती शुद्धीत नाही आला तर पटकन जवळील रुग्णालयाशी संपर्क साधावा.