16.हायड्रोमार्कर आणि ए- फ्रेम

हायड्रोमार्कर आणि ए – फ्रेम वापरून जलस्तर मोजण्याची प्रक्रिया शिकणे जल व्यवस्थापन जागरूक करणे.

आवश्यक साहित्य:-

हायड्रोमार्कर (जलस्तर मोजण्यासाठी जमिनीचा उतार) ए – फ्रेम (उंची मोजण्यासाठी) मोजण्यासाठी मीटर टेप, नोटबुक आणि पेन रंगीत पाणी (टुप भरण्यासाठी)

1.पहिल्यांदा आम्ही ए फेम चा वापर करून एका लाईन मध्ये दहा पॉईंट मार्क केले ते थोडे करव आकाराचे होते. त्याच्यामुळे उतारा एक सरकार आहे हे बघितले.

2. हायड्रोमार्कर चे माप घेण्यासाठी पहिली टू लेवल भरली व त्याची समान पाणी स्थर बघितला. त्याच्यामध्ये काही बबल्स नाहीत असे बघून घेतले बबल्स राहिले तर आपल्याला चांगले मापन करता येत नाही.

3. हायड्रोमार्कर ची दोन्ही पट्ट्या एकदा ज आणून समान केल्या व नंतर त्याच्यातील एक टोक पुढे घेऊन एकसमान अंतर आहे का नाही ते बघितले

4. हायड्रोमार्कर चा वापर करून आपण चर चांगल्या प्रकारे खोदून शकतो त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची योग्य ती दिशा देऊ शकतो.

5. हायड्रोमीटरच वापर करून मोजले मोजमाप आपल्याला चांगल्या प्रकारचे पाण्याचे पुनर निर्विनीकरण करू शकतो याच्यामुळे खूप गावांना फायदा होतो पाण्याची पातळी पण वाढते विहिरीं पातळी वाढते तलावा त पाणी वाढते.

6. यामुळे आम्हाला समजले की उतार वरती जास्त पाणी वाया न जाता जमिनीचे मुरूम पाण्याची पातळी वाढवून उन्हाळ्यात आपल्याला अडचण होणार नाही

हायड्रोमार्कर आणि ए – फ्रेम वापरून करून जलस्तर प्रभावीपणे मोजता येतो यामुळे आम्हाला जल व्यवस्थापन याच महत्त्व माहित मिळाली

15.फॅन दुरुस्ती

खराब झालेल्या फॅन्सी कार्यप्रदर्शन पुनर स्थापित करणे आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि मेकॅनिकल संरचनांची समज वाढवणे

आवश्यक साहित्य:-

खराब फॅन, मल्टीमीटर, स्क्रू ड्रायव्हर , स्ट्रिपर , चष्मा , हात मोजे

1.पहिल्यांदा स्क्रू ड्रायव्हर वापरून त्यांची कव्हर काढले. व नंतर वायर जळाली नाही ना ती बघितली.

2. मल्टीमीटर चा वापर करून वोल्टेज आणि कनेक्शन तपासले वायरस मोटर आणि स्विच तपासला व कॅपॅसिटर पण चेक केला.

3. जर मोटर काम करत नसेल तर ते बदलले बेरिंग किंवा चक्रीय भाग बिघडला असल्यास ते बदलून घेतले . वायरचे कनेक्शन योग्य आहे का नाही ते बघितले

4. सर्व झाल्यानंतर सर्व घटक पुन्हा व्यवस्थित केले आणि कहर बसवले

5. बोर्ड मध्ये पिन टाकून चेक केले की फॅन चालू आहे का नाही .

6. रंजीत सरांचा फॅन बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते त्याची सर्विसिंग केली. नंतर कुलकर्णी सरांचा फॅन आला होता त्याचा कॅपॅसिटर घेणार होता त्याला चेंज केले. नंतर रंजीत सरांचा टेबल फॅन एसी मधला होता त्याचे अडप्टर बिघडले होते ते सुधारले.

7. आमच्या डोरेमॉन हॉस्टेलमधील सिलिंग फॅन हा बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते ते नीट चेक करून बसवले.

8. मॅडम बाथरूम मध्ये ऍडजस्ट फॅन बसवायचं होता तो बसून दिला. पॉली हाऊस मधील फॅन्सी वायरिंग जळाली होती ती दुरुस्त केली.

फॅन दुरुस्त केल्यानंतर तो पुन्हा कार्यरत झाला आहे या प्रॅक्टिकल मुळे आम्हाला त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन चे महत्ची माहिती मिळते

14.अर्थिंग

अर्थिंग बनवण्याचे विधी शिकणे व सुरक्षा वाढवणे

तांब्याची प्लेट(सुमारे 0.5×0.5मीटर)

तांब्याची तार(2 ते 3 मीटर)

इलेक्ट्रिकल ड्रिल ,कुदळ फावडा

पाण्याची बादली (अर्थिंग वरती पाणी ओतण्यासाठी)

वीज पुरवठा बंद करणे

कार्यक्षेत्र स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे

1. पहिल्यांदा अर्थिंग करण्यासाठी स्थळ निवडले. पॉलिहाऊसच्या मागे सौर पॅनल ची अर्थिंग चांगली झालेली नव्हती तिथे निवडले

2. अर्थिंग बसवण्यासाठी तांब्याची प्लेट (रॉड) बसवण्यासाठी खड्डा खोदला. तू खड्डा खोदलनंतर व्यवस्थित केला

3. तार जोडणे तांब्याच्या तारा प्लेटच्या एका कोपऱ्यातून मजबूतपणे जोडले व नंतर पॅनलच्या अर्थिंगला जोडले

4. खड्डा भरणे, खड्डा पहिल्यांदा मातीने भरला त्यामुळे अर्थिंग चांगली होते. प्लेटची ( रॉड )चि कनेक्टिव्हिटी चांगली राहते.

5. त्याच्या वरती अर्थिंग पावडर टाकली व वरून माती टाकली. आपण त्याच्या त वरती कॉलसा आणि मीठ पण टाकू शकतो मीठ हे उन्हाळ्यात आद्रता निर्माण करण्याचे काम करते व कोळसा हा पावसाळ्यात ओलावा कमी करण्याचे काम करतो.

6. आपण अर्थिंग केल्याने आपल्याला चांगले विद्युत प्रवाह मिळू शकतो. त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटरने चेकिंग केले तर अर्थिंग ही चांगली दाखवत होती यावरून आम्हाला असे लक्षात आले की अर्थिंग केल्यामुळे आपल्याला चांगलं फायदा होतो.

अर्थिंग प्रक्रिया सुरक्षित आणि प्रभावी रंगाने पूर्ण झाल्यानंतर विद्युत उपकरणांची संरक्षण आणि व्यक्तीची सुरक्षा वाढली आहे.

13.बॅटरीच्या पाण्याची घनत्व मोजणे

बॅटरीचे पाण्याची (इलेक्ट्रो लाईट ) सापेक्ष घनता मोजणे

घनतत्त्व मापि, डिस्टिल्ड वॉटर, मल्टीमीटर

1. पहिल्यांदा मल्टीमीटर मदतीने बीसी बॅटरीचे होल्टेज मोजले

2. सापेक्ष घनता तपासण्यासाठी बॅटरीचे सेलमध्ये गेस्ट मीटर सेमी नझल घातले बल्ब दाबला व हळूहळू सोडला

3. सेलमधून इलेक्ट्रोलाईट इतक्या प्रमाणात भराला की घनतत्व मापी वरती तरगु शकेल.

4. स्पिंगला उभ्या पकडून इतक्या प्रमाणात त्यामध्ये द्रव रूप पृष्ठभागावरील घनतमापक ट्यूब वर घातले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉनिक घनता वाचन होय.

5. चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक नेहमी सेलमध्ये परत ठेवला जिथून ती बाहेर काढले गेले होते.

1. बॅटरी चे वोल्टेज=7.54V

1)00.004)00.00
2)12.705)12.35
3)00.006)12.40

2. बॅटरी चे वोल्टेज =12.42V

1)12.504)12.30
2)12.805)12.80
3)12.606)12.70

बॅटरीची घनता मोजल्यावर त्याच्या कार्यक्षमतेची आणि ऊर्जेची क्षमता समजून घेता येते उच्च घनता बॅटरी सामान्य अधिक शतिशाली आणि कार्यक्षम असते ज्यामुळे ती विविध अनुप प्रयोगांसाठी अधिक उपयुक्त ठरते बॅटरीच्या घनतेवर आधारित भविष्यातील सुधारणा आणि नवकल्पनांसाठी मार्गदर्शन मिळू शकते

12.धुर विरहित चूल

 

धुरविरहित पारंपारिक चुलीची तुलना करणे

धुर विरहित चूल. अन्न शिजवण्यासाठी भांडी, लाकूड, स्टॉप वॉच, दूर विरहित चूल, राकेश स्टॉ

1. पहिल्यांदा आम्ही लाकडाचे वजन केले. ती मावशीला दिले 25 किलो लाकडं वजन केले होते.

2. 25 किलो लाकडावर दुपारचे जेवण सर्व आश्रम चे तयार होते. त्याच्यामध्ये भात भाजी एवढे होते.

3. आम्ही अर्धा किलो लहान काड्या गोळा करून त्यांचे वजन केले.

4. चहा बनवण्यासाठी किती लाकडे लागतील याचे कॅल्क्युलेशन अंदाजे केले. राकेश स्टो घेऊन त्याच्यामध्ये आग लावली.

5. एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये एक लिटर पाणी घेतले त्याच्यामध्ये चहा पत्ती साखर गवती चहा असे टाकले.

6. चहा बनवण्यासाठी आम्हाला पंधरा मिनिटे लागले. लाकडे मोजण्यापासून तर सर्व भांडे व्यवस्थित ठेवण्यापर्यंत असा आम्हाला अर्धा तास लागला.

7. आपल्या आश्रमामधील धूर विरहित चुलिची माहिती घेतली. त्यामध्ये मोठी चिमणी वापरली होती. फायबर विटांचा वापर केला आहे त्यामुळे उष्णता बाहेर फेकली जात नाही. असे बेकरीमध्ये पण वापरले जातात त्यामुळे पाव चांगले भाजले जातात.

8. धुर विरहित चूल वापरण्याचे भरपूर फायदे आहेत त्यामध्ये आपल्याला जास्त दूर लागत नाही पण लाकूड वापरणे हे आपल्याला सर्वात मागीचे घडते गॅस वापरला तर तो कमी खर्च लागतो लाकूड जास्त वापरले जाते आणि जेवण कमी होते पण आपल्याला असं वाटतं की गॅस महाग आहे. सगळ्यात कमी एलपीजी गॅस कमी होतो

चूलशिजलेल्या भाताची मात्राशिजवण्यासाठी लागलेला वेळवापरलेली लाकडे त्यांचे वजनशिजलेल्या भाताची गुणवत्ता
परंपरागत चूल500gm30 मिनिट500 gmचांगली
धुर विरहित चुल500gm15 मिनिट500gmचांगली

धूर विरहित चूल सुरक्षित कार्यक्षम आणि पर्यावरणात अनुकूलन ऊर्जा उत्पादनाची साधन आहे या प्रॅक्टिकलचे धूर विरहित चूल तयार करण्यासाठी प्रक्रिया आणि त्याचे फायदे स्पष्ट केले आहेत प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे एक प्रभावी उपाय आहे

11.बायोगॅस

बायोगॅस यंत्रणेचे वापरण्याची पद्धत जाणून घेणे.

ताजे शेन, पाणी, मीटर टेप, कॅल्क्युलेटर, नोटबुक पेन, इत्यादी

1. पहिल्यांदा आम्ही गोठ्यातून शेण आणले. ते योग्य प्रमाणात मिश्रण केले

2. हे मिश्रण मिक्सिंग टॅंक मध्ये टाकले

3. फिटिंग पाईपच्या माध्यमातून हे मिश्रण बायोगॅस प्लांटमध्ये घातले.

4. बायोगॅस तयार होण्यासाठी 15-20 दिवसांची प्रक्रिया आवश्यक असते.

5. तयार झालेल्या बायोगॅस कलेक्शन पाईप द्वारे गॅस वरती जेवण बनवले जाते किंवा आपण ते टॅंक मध्ये पण भरू शकतो

6. हा गॅस स्टोरेज टॅंक मध्ये गॅस वापराच्या उपकरणांमध्ये पुरवठा करून उपयोगात आणला जाऊ शकतो.

7. बायोगॅस मध्ये 60% मिथेन वायु असतो आणि 40% कार्बन-डाय-ऑक्साइड राहतो.

प्लांटमध्ये वापरलेल्या साहित्य आणि तयार होणारा वायू याची नोंद ठेवली. तयार होणारा वायू गॅस मीटरने किंवा व्यक्तीच्या साह्याने मोजू शकतो

बायोगॅस हा जैविक कचऱ्यापासून निर्माण होणारा स्वच्छ आणि पूनारनिर्विनिकरन इंधनाचा एक स्रोत आहे याच्या वापरामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते आणि जैविक कचऱ्याचा योग्य वापर होतो

10.विज बिल काढणे

विद्युत उपकरणे आवि इतर भारांद्वारे वीज वापराची गणना करणे

ऊर्जा मीटर, कॅल्क्युलेटर, वहीं, पेन्सिल, लाईट बील.

1.वाचन वीज मीटरचे वाचन :

प्रारंभिक बाचक काढा आणि नंतर एका निश्चित कालावधीत पुन्धा वाचन घेणे.

2. वापराची गणना :-

प्रारंभिक वाचन आणि अंतिम वाचन यांतील फरक काढा हा फरक तुमच्या वीज वापराचे एकक (kWh)दर्शवतो .

3. बिलाचे गणना:-

वीज बिलाचे गणना करण्यासाठी, वीज वापराचे एकक बीज दरासह गुणाकार करा.

4. अन्य शुल्कांची गणना:-

वीजू बिलांत इतर शुल्क (जसे की फिरकड चार्जेस, कैपेसिटी चार्जेस ) समाविष्ट आहेत का, ते तपासा आणि त्यांची गणना करा.

5. बिलाची तपासणी:-

गणना केलेले विल वीज कंपनीने दिलेल्या बिलासी तुलना करणे.

6. अधिक माहिती :-

बाबीयी माहितगावश्यक असल्यास वीज बिलावर योग्यतेच्या मिळवा.

7.एकक:-

वीज’ युनिट

MSEDCL= Maharashtra state Electricity ion Company

1000 वॅटचे कोणतेही एक उपकरण तास चालविल्यास 1 यूनिट वीज खर्च होते

1000W = 1kw

1000kW=IMW

* यूनिट = वॅट× नग x तास ÷1000

*मीटर्सचे प्रकार:-

1) सिंगल फेज मीटर.

2) थ्री फेज मीटर

*1HP = 746 Watt

अ.क्रउपकरणनगवॅटतास/दिवस
1बल्ब79 watt8 तास
2फॅन175 watt10 तास
3मिक्सर1500 watt2 min/0.33 तास
4मोबाईल चार्जर25 Watt3 तास
5साऊंड (होम थेटर)160 watt1 तास

1.बल्ब = (9×7×8)÷1000. =0.075 युनिट

2. फॅन = 75×1×10 = 0.075 युनिट

3. मिक्सर = 500×1×0.033÷1000. =0.0165 युनिट

4. मोबाईल चार्जर =5×2×3÷1000. =0.01 युनिट

5. साऊंड (होम थेटर) 60×1×1÷1000= 0.06 युनिट

. Total= 0.6655 युनिट/दिवस

लाईट बिलचा अभ्यास केल्याने विद्युत खपना बाबत आणि त्याच्या मूल्य निर्धारित प्रक्रिया बद्दल ज्ञान मिळते ज्यामुळे उपभोग त्यांचं खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो

9.रिवायडींग

1. मोटार रिवाइंडिंग प्रक्रिया समजून घेणे

मोटारच्या वायरिंगची पुनर्रचना करून तिचे कार्यक्षमतेचे गुणस्थापन करणे

2. कौशल्य विकास

मोटारची विच्छेद तपासणी रिवाइंडिंग आणि पुन्हा असेंबली करण्याचा अनुभव मिळवने

3. समस्या निराकरण

मोटर वायंडीमध्ये दोष ओळखणे आणि सुधारणे

इलेक्ट्रिकल मोटर, इन्सुलेशन सामग्री वाइंडिंग वायर वायनिंग मशीन किंवा जीग, मल्टीमीटर , इन्सुलेशन प्रतिकार प्रशिक्षण, हॅन्ड स्टूल, मायक्रोमीटर, स्क्रीमॅटिक डायग्राम, स्क्रू गेज

1.पहिल्यांदा गावामध्ये गेलो. तिथे मोटार रिवाइंडिंग दुकानांमध्ये गेलो. तिथे मल्टीमीटर घेऊन आम्ही मोटरची वायरिंग चेक केली. त्यामध्ये वायडिंग गेली आहे का नाही ते बघितले मोटर दोन पार्ट असतात त्यामध्ये फुटबॉल आणि एक मोटर असते ते वेगवेगळे केले तर त्यामध्ये फेज (लाल) च्या वायरीला कंटिन्यू येत नव्हती. त्यामुळे असं समजले की वायडिंग गेली आहे

2. मोटर चे वरचे स्क्रू खोलले ते खूप टाईट झाले होते म्हणून स्क्रू ड्रायव्हरने त्याच्यावरील गंज काढला. मोटर खोलली त्यामध्ये सहा वेढे होते. त्याच्यामध्ये 24 स्लॉट होते. स्टार्टिंग वायडिंग आणि रनिंग वायरग असे दोन प्रकार असतात. त्याच्यामधील स्टार्टिंग वाइंडिंग पूर्णपणे होती. तिला एका बाजूला कट करून प्लास घेऊन त्याच्याने खेचून काढली.

3.पहिल्यांदा एक दोन काढून घेतल्या नंतर प्लास ने वरती करून त्यांच्या टेक्निकने काढले आम्ही खूप ताकद लावत होतो त्यांनी सहजरीत्या काढले वाइंडिंग काढलेले प्रत्येक वेढ्याचे वेगवेगळे गुच्छ केले. ते मोजून पण घेतले पहिल्या वेड्या त 28 तार होत्यात दुसऱ्या वेड्यात 24 तास होत आणि तिसऱ्या वेळेत 12 तारखेला आणि चौथ्या वेळेत 6 तार होत्या. प्रत्येक वेळेचे वेगवेगळे वजन करून त्याची वहीत नोंद घेतली. नंतर सर्वांची बेरीज करून दीड किलो वायर निघाले जेवढी वायर निघाली तेवढीच डबल वाइंडिंग मध्ये टाकावी लागते नाहीतर शॉक सर्किट होऊ शकतो

.4. रिवायडींग साठी त्यांनी मशीनला तार लावून वायडिंग केली . वाइंडिंग झाल्यावर मोटर मध्ये पेपर टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये नीट वाइंडिंग बसवली व वरून बांबूच्या काड्या ऍक्युरेट कापून त्याच्यावर बसवल्या तीन वायर वरती काढल्या . वायडिंग वरती लीड ऍसिड ओतले त्यामुळे वाइंडिंग चांगली राहते. त्याच्यानंतर मोटर फिट करून चेक केली.

मोटार रिवाइंडिंग एक महत्त्वपूर्ण देखभाल कार्य आहे जे इलेक्ट्रिकल मोटरच्या आयुष्याचा विस्तार आणि कार्यक्षमता पुणे स्थापित करते योग्य पद्धतीने पालन करून योग्य साहित्य वापरून आणि सखोल तपासणी करून आपण याची खात्री करून शकतो ही रिवाइंडिंग केलेली मोटरची प्रभावी आणि विश्वसनीयपणे कार्य करते

8.बोर्ड भरणे

1.विद्युत सर्किटचे मूलभूत ज्ञान मिळवणे.

2.विद्युत घटकांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करणे.

3.सुरक्षितता नियमांचे पालन करणे.

विद्युत घटक: बॅटरी,बल्ब,स्विच,प्रतिरोधक (रेसिस्टर) ,कंडक्टर (तार)

साहित्य:PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड),बॅटरी ,कनेक्टर, स्क्रू, ड्रायव्हर, मल्टीमीटर

सुरक्षा साधने:इन्सुलेटेड हॅन्ड ग्लोज, सुरक्षात्मक चष्मे

1. पहिल्यांदा आम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड घेतला.

2. नंतर बोर्डच्या मापाचे सर्किट डायग्राम काढली.

3. त्याच्या मधील थ्री पिन सॉकेट बसवण्यासाठी कटरने त्याच्या मापाचे कट मारले.

4. थ्री पिन सॉकेट बसवले आणि नंतर स्विच बसवले.

5. दोन्ही सॉकेट ने स्क्रू ड्रायव्हरने चांगले टाईट केले.

6. पहिल्यांदा फेज वायरिंग केली व नंतर अर्थिंग ची केली. आणि नंतर न्यूट्रल ची वायरिंग केली.

7. वायरिंग झाल्यावर काही वायरिंग लूज आहेत का नाही ते बघितले व नंतर बोर्ड सरांना दाखवून फिट केला.

8. टेस्ट लॅम्प घेऊन बोर्ड चेक केले. त्यामध्ये न्यूट्रल फेज व अर्थिंग फेज असे पण चेक केले त्यामुळे आम्हाला कळले की अर्थिंग पण बरोबर असली तर लाईट चांगली चालते.

प्रयोगाद्वारे सर्किटच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि कोणते नाहीत याचे विश्लेषण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि सुधारणा आवश्यक आहेत का हे तपासणे.

7.इलेक्ट्रिकल ग्राफिक चिन्हे

1. इलेक्ट्रिकल /ग्राफिक चिन्हे जाणून घेणे.

2. वायरिंगच्या कामात वापर ल्या जाणाऱ्या चिन्हांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी

3.विविध आणि त्यांचे आउटलेट समजून घेणे

4.सॉकेट दिवे विद्युत उपकरणे घंटा पंखे इतक्या संबंधित जाणून घेण्यास सक्षम असतील

पहिल्यांदा वेगवेगळे चिन्हांचे सिम्बॉल काढून बघितले कशाला काय म्हणतात हे बघितले वही मध्ये वेगवेगळे सिम्बॉल काढले. च

सिम्बॉलमुळे आपल्याला कुठे काय वस्तू जोडायची आहे ते आपल्याला समजते.

चिन्ह:-

वायरिंग (इलेक्ट्रिकल वायरिंग) कामात वापरलेली चिन्ह

स्विच आणि स्विच आउटलेट

सिंगल पोल
दोन पोल
तीन पोल
सिंगल पोल पूल स्विच
बहुस्थिती स्वीच
द्विमागिय स्विच
मध्यवर्ती स्विच
लटकता व स्वीच
पुश बटन या बेल पुश

सॉकेट आउटलेट

सॉकेट आउटलेट 6A
सॉकेट आउट 16A
एकत्रित स्विच आणि सॉकेट आउटलेट 6A
एकत्रित स्विच आणि सॉकेट आउटलेट 16A
इंटरलॉकिंग स्विच आणि सॉकेट आउटलेट 6A
इंटरलॉकिंग आणि सर्किट आउटलेट 16A

दिवा

लॅम्प साठी लॅम्प किंवा आउटलेट
40 w तीन लॅमचा संघ
वॉल किंवा लाईट ब्रॅकेट माउंट
छतावर लटकलेला दिवा
बल्ब हेड रस्सी
पित्या घट्ट प्रकाश फिटिंग
बटन लॅम्प होल्डर (भिंतीवर टांगण्यासाठी)
फ्ल्ड लाईट
फ्लोरो सेट लॅम्प

विद्युत उपकरणे

सामान्य आवश्यक असल्यास निर्दिष्ट करण्यासाठी नाव वापरा
फिटर

घंटी, बजर आणि सायरन

घंटी
बजर
सायरन
हॉर्न या हुटर
संकेतक

पंखे

छतावरी पंखा
ब्रॅकेट पंखा
नीकास पंखा (Exhaust Fan)
पंखा रेग्युलेटर

ग्राऊंडींग

अर्थ पॉईंट
फ्युज

इलेक्ट्रिकल ग्राफिक चिन्हांचा उपयोग विविध इलेक्ट्रिकल योजनांमध्ये घटकांचे सुसंगत प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जातो यामुळे योजनांची स्पष्टता वाढते आणि कार्यक्षमता सुधारते या चिन्हांचा अभ्यास करून विद्युत प्रणालीचा समज वाढतो

6.कृत्रिम श्वसन

1. कृत्रिम शोषण शेफियर पद्धतीने शिकणे.

2. कृत्रिम श्वसन सिल्विस्टर पद्धतीने शिकणे

आवश्यक साहित्य:-

चटई,स्वयंसेवक

1.पहिल्यांदा व्यक्तीला लागलेल्या असलेल्या तिच्या पोटाच्या साह्याने झोपवणे नंतर हात डोक्या खाली ठेवावे व दुसरा हात समोर पसरवावा चेहरा एका बाजूने फिरवावा

2. जखम झालेल्या व्यक्तीच्या पाट जवळ बसावे आपला बोटाला असे पकडावे की त्याच्या कमरेच्या वरती दाब देता आला पाहिजे

3. हात सरळ ठेवून हळूहळू त्याच्या पाठीच्या वरती दाबून त्याचं नाव तोंड तुंन हवा येत नाही ते बघावे ते बघावे

4. त्यापूर्वी पीडित शरीराचे पूर्ण दाब हटवून त्याला पुन्हा श्वास घ्यायला दाब कमी करायचा

5. दोन सेकंदा नंतर परत कृती करावी आणि एका मिनिटात ही कृती 12 ते 13 वेळ अशी होती करावी

1.जखमी व्यक्तीला पाठीच्या साह्याने झोपवणें

त्याच्या खांद्या खाली उशी किंवा कांदा ठेवावा

3. जखमी व्यक्तीच्या डोक्या जवळ घटना वरती बसावे त्याच्या दोन्ही हाताला पकडावे खाली धरावे.

4. त्याच्या हाताला त्याच्या डोक्याला वरती घेऊन त्याची शेती स्थिती ना होता. दोन सेकंदा पूर्ती बनवून ठेवावि.

5. जखमी दोन्ही हातांना वर्ष च्या टोकावर ( ढोपर)पर घेऊन हातावर दाब द्यावा.

6.ही कृती तोपर्यंत करावी जोपर्यंत जखमी व्यक्ती श्वास घेत नाही.

1.शेफिअर पद्धतीने तात्काळ कृत्रिम श्वसन दिल्यास जीव वाचवता येतो.

2.सिल्विस्टर पद्धतीने हृदयाच्या अयशस्वीतेत आणि श्वास घेत नसलेल्या व्यक्तीला जीवनदान देण्यास मदत होते.

5.वर्षा मापन

वर्षा मापी ला बसविणे आणि वर्षा च्या मात्रा चे मापन

आवश्यक साहित्य

काच या प्लास्टिक किंवा वे आकार पात्र जो कमीत कमी 25 सेंटीमीटर उंच असेल

वॉटरप्रूफ मार्कर किंवा स्केल पट्टी

12 इंच (25mm) चे प्लास्टिक /स्टील रोल (गाळणी)

1.पहिल्यांदा एक रिकाम बॉटल घेतली तिला गोल कापले आणि तिचे अर्धा भाग उलट करून जोडला.

2. गाणी भांड्याच्या आणि निमुळती ठेवली त्याला 10mm स्केल लावली. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची स्केल मोजली. व नंतर आपल्या आश्रमातील वर्षामापन बघायला गेलो तिथे सरांनी कसे वर्षा मापन मोजायचे हे सांगितले.

3. वर्षावापन हे दोन प्रकारचे केले जाते. एक आपण तयार केलेले वर्षा मापन यंत्र आहे. आणि दुसरे सरकारी वर्षा मापन आहे. त्याला सेंसर बसवलेला आहे.

4. ड्राय आणि वेट असे दोन प्रकारचे मापन केले जाते. त्याचा दररोज रेकॉर्ड ठेवला जातो.

दिवसआजचे पाणी स्थर (mm)Humilitymlmmअवलोकन
सोमवार93%26ml2.3355.3
मंगळवार7.20m94%12ml1.06356.36
बुधवार7.40m92%12ml1.06357.42
गुरुवार7.05m90%
शुक्रवार7.40m
शनिवार
रविवार6.80m92%25ml2.21361.13


वर्षा चे मापन हि एक निश्चित वेळेत किती वर्षा झाली आहे . एक आठवड्यात मध्ये एकत्र पाणी विना वाफ न होता किती राहिले.
सामान्य वर्षा हि मिलीमीटर मध्ये मोजली जाते .

4.तारेचे मापन(सूक्ष्म मापी)

सूक्ष्ममापी (Micrometer) चा उपयोग करून तार (Wire) चा आकार मोजणे.

केबल, प्लास, सूक्ष्ममापी , नोटबुक, पेन,

1.केबल जिथं पर्यंत सोलायची आहे . तिला चिन्ह करणे.
2.संयोजन प्लास चा उपयोग करून केबल सोलावी.
3.अनावरीत केलेले विधुतरोधक टोक ला सरळ कराने शून्य त्रुटींचा अंतर करून बघावे. 4.स्पिंडल चा उपयोग करून सुक्ष्कपापी चा वापर करा.
5.धन व ऋण चिन्ह त्याच्या त्रुटी चे मूल्य रिकॉर्ड ल करा.
6.चालक च्या साफ सरळ टोका ला सूक्ष्ममापी से स्पिडलं ला बंद करा.
7.मानक तार गेज मध्ये चालक चा आकार प्राप्त होत नाही तो पार्ट रूपांतर तालिका संदर्भ घ्यावा.
8.अशा अनेक प्रकारे तारे चा मोजमाप करणे गरजे आहे.

वायर गेज मापक

मायक्रोमीटर

1.तारांचे मॅप करून त्याची स्तिथी आणि चमक याचा विश्लेषण केला जाऊ शकतो.
2.या प्रॅक्टिकल तारांचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या स्थानाची अचूकता मापन करणे शक्य होते.

3.विविध शेल च व बॅटरीचे होल्टेज मोजणे.

विविध प्रकार च्या बॅटरी चे मोजमाप करणे व त्याचे होल्टेज चे मापन करणे.

1.5 v, 12v, 5V, 9V, अशा वेगवेगळ्या बॅटरी, मल्टीमीटर,वही, पेन इत्यादी.

1. पहिल्यांदा वेगवेगळ्या गोळा केल्या .

2.1.5V ,12V,5V, अशा बॅटरी चे होलसेल मोजले.

2. एका बॅटरी आपल्या डाव्या हाताने धरावे.

3. बॅटरी सगळी कडून बघून घेणे त्यावर काय लिहिले आहे, विशिष्ट लिहून घेणे

4. बॅटरी वरती काही माहिती आहे ते बघणे.

कंपनीचे नावकंपनीचा पत्ता
धातू ची किंमतकिती जड आहे (मजबूत)
हायपर बॅटरीहोल्टेज
बॅटरीची तयार केली तारीखISI चिन्ह बघून घेणे

5. मल्टीमीटर घेऊन ते DC डीसी रेंजवर सेट केले. मल्टीमीटर च्या टर्मिनल चा उपयोग करून. ऋण टोक आणि धन टोक हे बॅटरीचे चिन्ह बघून लावले.

6. काही बॅटरी होल्टेज मोजले होते तर त्यांचे खालील प्रमाणे होल्टेज दाखवत होते.

बॅटरीचे वास्तविक वोल्टेजमोजलेले होल्टेज
1.5V1.5V
12V9.4V
5V3.13V
9V5.3V

प्रत्येक सेल आणि बॅटरीचे व्होल्टेज विविध असू शकते. उदाहरणार्थ, एक नवा AA अल्कलाइन सेल साधारणतः 1.5V वर असतो, तर एक 9V बॅटरी 9V वर असते.सेल्सच्या आणि बॅटरीच्या व्होल्टेजची स्थिती त्यांच्या चार्जच्या अवस्थेवर अवलंबून असते.हा प्रयोग विविध प्रकारच्या सेल्स आणि बॅटरींच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी मदत करतो.

2.केबल इन्सुलेशन काढणे

हाताने (manual Stripper)चा उपयोग करून केबल वरून इन्सुलेशन काढणे

केबल, संयोजन प्लास, चाकू छिलक , मार्कर (Auto Stripper)

1. केबल जिथे इन्सुलेशन काढायचे आहे तिथे मार्ग केले.

2. संयोजन प्लास उपयोग करून पर्यंत सोलावे

3. अनावरित झालेले विद्युत रोध (insulation)सरळ करावे.

4. जिथपर्यंत आवरण अनावरील असेल त्या ठिकाणी मार्क करावे.

5. हस्त शिलक दात त्या चिन्ह वर सेट करून घ्या. शिल्लक चा हँडल आणि विद्युत रोधक ला कापण्यासाठी त्याला फिरवा

6. तारे चे इन्सुलेशन काढण्यासाठी कौशल्य वाढवायचे असेल तर 10mm पासून वेगवेगळ्या तारांचे इन्सुलेशन काढणे सवय होऊन. सराव पण होईल.

7. लवचिक तारा असतील तर त्यासाठी विशेष आणि सावधानी का लक्ष ठेवावे. ताकी केबल ची एक पण तार कट होणार नाही.

केबल इन्सुलेशन काढणे एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी वायर्सच्या जोडणीसाठी आवश्यक असते. यासाठी विशेष साधनांचा वापर करून, योग्य पद्धतीने काम करणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे केलेले काम सुरक्षित आणि कार्यक्षम राहते.

1.विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाय समजून घेणे.

2.विद्युत सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांचे पालन करण्यास शिकणे

1. सुरक्षा उपकरणांचा वापर

2. योग्य उपकरणांची निवड

3. कोरडे वातावरण राखा

4. ओवरलोडिंग टाळा

5.प्रथमोपचार

1.विद्युत सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात

. 2. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी योग्य उपकरणे आणि कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे.

1.विद्युत सुरक्षा पाळणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे

2.योग्य सुरक्षा उपायांशिवाय विज विज काम करणे जीव घेणे असू शकते म्हणून नेहमी सावधगिरी बाळगा आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा