बीजप्रक्रिया (Seed Treatment)
व्याख्या: पेरणीपूर्वी बियाण्यांवर रोग, कीड व बुरशीपासून संरक्षण मिळावे, उगवण चांगली व्हावी आणि निरोगी रोपे तयार व्हावीत यासाठी जी प्रक्रिया केली जाते तिला बीजप्रक्रिया म्हणतात.
बीजप्रक्रियेची उद्दिष्टेबियाण्यांची उगवण वाढवणे.बियाण्यांवरील बुरशी व जिवाणू नष्ट करणे.रोग व किडींपासून संरक्षण करणे.रोपे निरोगी व जोमदार वाढवणे.उत्पादनात वाढ करणे.
बीजप्रक्रियेचे प्रकार :
१) रासायनिक बीजप्रक्रियाबुरशीनाशक किंवा कीटकनाशक औषधांचा वापर केला जातो.उदाहरण: M-45 (Mancozeb) 3 ग्रॅम + 10 लिटर पाणी.बियाणे 10 मिनिटे भिजवून सावलीत वाळवून पेरणी करावी.
२) जैविक बीजप्रक्रियाउपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.उदाहरण: Trichoderma 2–5 ग्रॅम प्रति 1 किलो बियाणे.यामुळे बुरशीजन्य रोग कमी होतात आणि मुळांची वाढ चांगली होते.
३) सेंद्रिय बीजप्रक्रियागोमूत्र, जीवामृत किंवा इतर सेंद्रिय द्रावणांचा वापर केला जातो.बियाणे द्रावणात भिजवून सावलीत वाळवून पेरणी करावी.बीजप्रक्रियेचे फायदेउगवण जलद व एकसारखी होते.रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
रोपे मजबूत व निरोगी आरोग्य.औषधांचा खर्च कमी होतो.पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता योग्य.लक्षात ठेवण्याच्या गोष्टी व निरोगी बियाणे वापरावे.औषधांचे योग्य प्रमाण पाळावे.प्रक्रिया केलेले बियाणे सावत वाढवावे.बीजप्रक्रियेनंतर तितक्या लवकर पेरणी.
काकडी लागवड :
शेताची योग्य मशागत केली. वाफे/बेड तयार केले.चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत दिले.
निवडक व निरोगी काकडीच्या बियांची पेरणी/लागवड केली.
योग्य अंतर ठेवून लागवड केली.लागवडीनंतर त्वरित पाणी दिले.वेळोवेळी तणनियंत्रण व खुरपणी केली.
आवश्यकतेनुसार खत व पाणी व्यवस्थापन केले.रोग व किडींचे निरीक्षण करून नियंत्रण केले.
चांगल्या वाढीनंतर दर्जेदार काकडीचे उत्पादन मिळाले.


