माती नमुना गोळा करणे शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 15–20 सेमी खोलीपर्यंत माती घ्यावी. सर्व नमुने एकत्र करून मिश्र नमुना तयार करावा. स्वच्छ पिशवीत भरून लेबल लावून प्रयोगशाळेत पाठवावा.
माती परीक्षण (pH, NPK) pH: माती आम्लीय, क्षारीय किंवा तटस्थ आहे का ते समजते. N (नायट्रोजन): पानांची वाढ. P (फॉस्फरस): मुळांची वाढ व फुलधारणा. K (पोटॅशियम): रोगप्रतिकारक शक्ती व उत्पादन वाढ.
पाणी परीक्षण (pH, EC, H₂S) pH: पाण्याचा आम्ल-क्षार स्तर तपासतात. EC (Electrical Conductivity): पाण्यातील क्षारांचे प्रमाण मोजतात. H₂S (Hydrogen Sulfide): पाण्यात जिवाणूंचे दूषितीकरण आहे का ते तपासण्यासाठी चाचणी.
टिश्यू कल्चर (Tissue Culture) निर्जंतुक (Sterile) वातावरणात वनस्पतीच्या छोट्या भागापासून नवीन रोपे तयार करण्याची पद्धत. मीडिया तयार करणे: आवश्यक पोषकद्रव्ये, साखर, अगर इत्यादी मिसळून माध्यम तयार करतात. उपकरणे: लॅमिनार एअर फ्लो, ऑटोक्लेव्ह, pH मीटर, कल्चर बॉटल, फोर्सेप्स इत्यादी वापरतात.