हायड्रोपोनिक्स (Hydroponics) :
हायड्रोपोनिक्स म्हणजे माती शिवाय पाण्यातील पोषक द्रावणाच्या (Nutrient Solution) साहाय्याने पिके वाढवण्याची आधुनिक शेती पद्धत. या पद्धतीत झाडांना आवश्यक सर्व अन्नद्रव्ये पाण्यात विरघळवून दिली जातात. त्यामुळे झाडांची वाढ जलद होते आणि उत्पादन चांगले मिळते.
• महत्व
मातीची गरज नसते.
80–90% पाण्याची बचत होते.
कमी जागेत जास्त उत्पादन मिळते.
वर्षभर शेती करता येते.
तणांची समस्या कमी असते.
रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते.
शहरी भागात, टेरेस किंवा ग्रीनहाऊसमध्येही शेती करता येते.
• हायड्रोपोनिक्सच्या पद्धती
1. NFT (Nutrient Film Technique)
पातळ पोषक द्रावणाचा सतत प्रवाह मुळांवर सोडला जातो.
लेट्यूस, पालक, कोथिंबीर यांसाठी योग्य.
2.DWC (Deep Water Culture)
झाडांची मुळे पोषक द्रावणात बुडालेली असतात.
एअर पंपाद्वारे ऑक्सिजन पुरवला जातो.
पालक, लेट्यूस यासाठी उपयुक्त.
• पोषण द्रावण (Nutrient Solution)
झाडांना आवश्यक अन्नद्रव्ये:
नायट्रोजन (N)
फॉस्फरस (P)
पोटॅशियम (K)
कॅल्शियम (Ca)
मॅग्नेशियम (Mg)
सल्फर (S)
लोह (Fe), झिंक (Zn), मँगनीज (Mn), बोरॉन (B), कॉपर (Cu), मॉलिब्डेनम (Mo)
pH : 5.5 ते 6.5
EC : 1.2 ते 2.5 mS/cm (पिकानुसार बदलतो.)
• पिकांची निवड
लेट्यूस
पालक
मेथी
कोथिंबीर
तुळस
टोमॅटो
काकडी
मिरची
स्ट्रॉबेरी
पुदिना
• सुविधा व उपकरणे
पाण्याची टाकी (Reservoir)
PVC पाइप किंवा ग्रो ट्रे
सबमर्सिबल वॉटर पंप
एअर पंप व एअर स्टोन
नेट पॉट
ग्रो मीडिया (कोकोपीट, LECA, रॉकवूल)
pH मीटर
EC मीटर
टाइमर
ग्रीनहाऊस/शेडनेट (आवश्यकतेनुसार)
• रोग व कीड व्यवस्थापन
स्वच्छता राखावी.
पोषण द्रावण नियमित बदलावे.
pH व EC तपासावे.
रोगग्रस्त झाडे लगेच काढावीत.
जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
पाण्याची टाकी व पाइप स्वच्छ ठेवावेत.
• अर्थकारण व बाजारपेठ
सुरुवातीला गुंतवणूक जास्त असते.
उत्पादनाचा दर्जा चांगला असल्यामुळे चांगला भाव मिळतो.
हॉटेल, सुपरमार्केट, मॉल, रेस्टॉरंट आणि ऑनलाइन बाजारात चांगली मागणी असते.
योग्य व्यवस्थापन केल्यास कमी खर्चात जास्त नफा मिळू शकतो.


