विद्युत प्रणाली वापरताना सुरक्षितता पाळणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य सुरक्षितता नियम पाळल्यास अपघात, आग आणि विजेचा धक्का टाळता येतो. सौर विद्युत सुरक्षिततेचे नियमसौर पॅनेल, इन्व्हर्टर व सर्व धातूचे भाग योग्य अर्थिंग केलेले असावेत. दर्जेदार आणि इन्सुलेटेड तारा वापराव्यात. ओले हात किंवा पाण्याजवळ विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.सौर प्रणालीची नियमित तपासणी व देखभाल करावी. तारा व जोडणी सैल राहू देऊ नयेत, कारण त्यामुळे आग लागू शकते. देखभाल करताना मुख्य स्विच बंद करावा.पॅनेल स्वच्छ करताना सुरक्षित शिडी व सुरक्षा साधने वापरावीत. वीज कडाडत असताना सौर प्रणालीवर काम करू नये.सर्ज प्रोटेक्शन व योग्य फ्यूज वापरावेत. कोणताही बिघाड झाल्यास प्रशिक्षित तंत्रज्ञाची मदत घ्यावी. विद्युत सुरक्षितता म्हणजे सौर ऊर्जा प्रणाली वापरताना अपघात, आग व विजेचा धक्का टाळण्यासाठी घेतलेली काळजी आणि पाळलेले नियम होय.
