प्रॅक्टिकल चे नाव : – 1) शेंगदाणा चिक्की तयार करणे .

  1. उद्देश :- चिक्की बनवायला शिकणे .


साहित्य : -३५०gm शेंगदाणे,३५०gm गूळ,२५gm तूप .


उपकरण : -गॅस ,मिक्सर ,प्लेट ,कढई ,चिक्की कट्टर ,इत्यादी .


प्रक्रिया : – शेंगदाण्याचे वजन करून घेतले . शेंगदाणे साफ करून ते कढई मध्ये भाजून घेतले . शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक केले. जेवढे शेंगदाण्याचे वजन तेवढेच गुळ वजन करून कढई मध्ये टाकून गुळाचे पाक केले . पाक तयार होई पर्यंत चिक्की च्यां ट्रे तेल किंवा तूप लावून घेतले . चिक्कीचा पाक हा गोळी बंद तयार करून घेतला . नंतर शेंगदाणे त्या पाकमध्ये टाकले त्याला पाकमध्ये मिक्स केले . तयार मिश्रण तेल लावलेल्या ट्रे मध्ये टाकून लाटून घेतले व नंतर कटर ने कट केले . तयार चिक्की पूर्ण पने थंड झाल्यावर पॅकिंग केले.

निरीक्षण : – पाक व्यवस्थित तयार करायला हवा . साखरेचा पाक लवकर तयार होतो , गुळाच्या पाक तयार करायला वेळ लावतो .

प्रॅक्टिकलचे नाव:- 2)नानकटाई

ऊद्देश: नानकटाई बनवणे.

साहित्य: मैदा ,डालडा ,पिठी साखर,फ्लेवर/कलर.

साधने: कढई, उलथान, प्लेट, गैस.

कृत्ती: १) कढईत डालडा वितळुन घ्यावा एका प्लेटा मध्ये पिठी साखर

चाळुन घेणे.

२) त्या नंतर गरम झलेल्या डालड्यात पिढी साखर टाकणे.

व्यवस्थित एकञ करून घ्यावे.

३) त्या मध्ये मैदा टाकुन एकञ करुन घ्यावे मिक्स केलेले घट्ट होण्याआधी त्याला हवा तसा आकार द्यावा .

४) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई ठेवावे त्या आधी ट्रेला तेल लावुन घेणे.

मग Oven मध्ये ठेवावे.

3) प्राक्टिकलचे नाव :- कॅ्ंडी

उद्देश : कॅ्ंडी बनवायला शिकणे

साहीत्य : पपई, पातेले, गैस ,फ्लेवर ,ई.

कृती : पपईला स्वछ धुवून घेण. पपईची साल काढणे ,त्या पपईला छोटे – छोटे तुकडे करणे ,त्या तुकड्यांना उकळत्या पाण्यात ५ मिनिट टाकावे. मग त्यातुन पाणी गाळुन ,तुकडे सुके झाल्यावर वेगवेगळ्या भांड्यात ठेवुन दिले. जेवढे त्या तुकड्यांचे वजन असेल तेवढे किलो साखर घ्यावी व त्याच्या लेवला पाणी टाका व गैसवर गरम करून पाक उकळल्यावर त्या तुकडे टाकावे .मग ते छोट्या- छोट्या पातेल्यात काढुन त्यात कलर फ्लेवर व टाकुन मिक्स करुन त्याला एक राञ फ्रीज मध्ये ढेवले ,सकाळी फँन खाली सुकवले.