.

छत्री

प्रस्तावना :

. या प्रकल्पात आम्ही प्रकल्पात आम्ही . छत्री तयार करण्याबाबतचा उद्देश म्हणजे . पाहुण्यांसाठी बसायची आणि सावलीची सोय करणे . कॅमस मध्ये योग्य जागा पाहून छत्री बसवायची जागा ठरली .

या कामात आम्ही वेल्डिंग , कटिंग , पॉलिशिंग आणि पावडर कोटिंग या सारखी तांत्रिक कौशल्य शिकलो . छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला . भविष्याची ही छत्री पाहुण्यांसाठी विश्रामाची जागा म्हणून वापरली जाईल .

सर्वे:

आम्ही कॅम्पस मध्ये निरीक्षण केले आणि छत्री कुठे लावायची त्याची जागा नेमली. सॉलिड वर्क वर छत्रीचे डिझाईन तयार करणे. छत्रीसाठी योग्य सामान्य निवडणे.

उद्देश :

छत्री तयार करण्याचे कारण हे होते जे पाहुणे येथील त्यांच्यासाठी बसायची जागा व विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी शिकणे .

साहित्य :

25×25[] = 60′ ,40×40[] = 12′ , 100×100 [] = 13′

. 25×5 = 6′ , 40×5 = 5′ ,

. 6×6 = प्लेट (2) , फ्लॅन्स = 2. , रोल = 4

. 30/10 नट बोल्ट = 2kg. , वायसर = 500 g

. ब्रश =2. , रोलर पॉलिश पेपर = 2 , रेड ऑक्साईड = 1L

. पावडर कोटिंग =

ब्लॅक ऑइल पेंट = 1L , थिनर = 0.5L

. सि सिमेंट = 1 गोणी , क्रश = 70 घमेली , खडी = 15 घमेली

. कृती :

. सर्वात अगोदर आम्ही छत्री चे 3d डिझाईन बनवलेत्यासाठी आम्ही सॉलिड वर्क हे ॲप्लीकेशन युज केले . सॉलिड वर्क वर आम्ही छत्री असेंबल होते आहे का नाही हे आम्ही बघितलेत्यानंतरन आम्ही छत्री बनवायला सुरुवात केली . सर्वात अगोदर 25 x 25 [] चे 1800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली एका बाजुला नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतला कानापासून 880 mm या अंतरावर कॉलम ट्यूबच्या अलीकडे व पलीकडे अशा दोन बाजूस कान लावले. आंतर चुकू नये म्हणून जॉब तयार केला.असे आम्ही सात पार्ट तयार केले . त्यानंतर आम्ही 25 x 25 [] चे 800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली दोन्ही बाजूला ब नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतले . त्यानंतर आम्ही प्लाजमा कटर वर फ्लान्स तयार केला . व त्याला कान लावून घेतले.छत्रीचे सगळे पार्ट एकामेकाला नटबॉलच्या साह्याने जॉईन करून घेतले . त्यानंतरून छत्रीच्या सर्व पार्टला पावडर कोटिंग केली .100 x 100 [] चा 5000 mm तुकडा कापून घेतला. व त्याला काळा ऑइल पेंट लावला .ज्या ठिकाणी छत्री लावायची होती त्या ठिकाणे 3 फुट खोल खट्टा घेतला . त्या खड्ड्यात खांब उभा केला . त्या खंड्यात सिमेंटचे मिश्रण टाकून खांब फिट केला , व खांबाच्या शेजारील जमिनीला लागून कोबा केला. छत्री उघडण्यासाठी व बंद करण्यासाठीरोलरच्या सह्याने जॉब तयार केला , व त्याला पावडर कोटिंग करून घेतले. छत्रीचे सगळे पाठ एकामेकांना कनेक्ट करून छत्री उभा केले . ही छत्री तयार करताना आम्हाला 9275 एवढा खर्च आला .

कॉस्टिंग

क्र. मालाचे नावएकूण मालादरएकूण किंमत
11*1 ट्यूब60 F352100
240*5 पट्टी5 F30150
340*40 ट्यूब12 F45540
4100*100 ट्यूब13 F1501950
525*5 पटी6 F25150
64*4 प्लेट2150300
76*6 प्लेट2250500
830/10 नटबोल्ट2 Kg100200
9वाईअर500 G5050
10ब्रश250100
11फ्लॅन्स2150300
12रोलर250100
13गॉलीज पेपर51575
14रेडऑक्साईड1 L230230
15ऑइल पेंट ब्लॅक1 L300300
16सिमेंट1 गोणी350350
17ब्रश70 चमेली8480
18खडी15 चमेली9150
19रोल4100400
20थिनर0.5 L10050
21पावडर कोटिंग800
22मजुरी2318
Total11593

निरीक्षण :

छत्री तयार करताना छत्रीचे कार्य कसे चालते , व त्याची आतील रचना कशी असतेहे कळाले . छत्री सगळे पार्ट एकसारखे कड झाले पाहिजे , नाही तर छत्री नीट काम करणार नाही . छत्रीचे मटेरियल कसे असले पाहिजे . हेवी पाहिजे की लाईट मटेरियल पाहिजे . ज्या ठिकाणी छत्री लावणार आहे ती जागा छत्रीसाठी उपयुक्त आहे का नाही .

निष्कर्ष :

छत्री लावल्यापासून लोकांचे उन्हा व पावसापासूनसंरक्षण होते . आश्रमातील लोक एकत्रित जमा होतात येतात , गप्पा मारतात . छत्री लावल्यापासून छत्रीच्या बाजून स्वच्छता अपवाप होऊ लागली . छत्री लावल्यापासूनती मोकळी जागा वापरत आली .

भविष्यातील उपयोग :

या फोल्डेबल छत्री मुळेभविष्यात उन्हाचाव पावसाचा त्रास होणार नाही . लोकांना निवांत बसण्यासाठी एक जागा तयार झाली .

डोम रिनोवेशन

प्रस्तावना :

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.

सर्वे :

ड्रोममध्ये काय व कुसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून रावात जाऊन आपाले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.

उद्देश :

डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

साहित्य :

स्क्रॅपर

पुट्टी

ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]

डिस्टेंपर

सिमेंट कलर

काळा ऑइल पेंट

सिमेंट , कच

पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)

कृती :

सर्वात अगोदर डोमचा सर्वे केला . डोम मध्ये आपण रेनोवेशन कसे करू शकतो याची चर्चा केली त्यानंतर स्केचप वर थ्रीडी डिझाईन तयार केली .कामाला सुरुवात केली. सर्वात अगोदर डोमची स्वच्छता केली.स्क्रॅपच्या साह्याने जुना कलर काढला. व डोमच्या चिरा मध्ये पुट्टी भरली . डोमला आतून प्रायमर लावला व डोमच्यावरच्या साईडला सिमेंट( नारंगी ) कलर लावला .डोमच्या बाहेर बसण्यासाठी एक छोटीशी भिंत बांधली व त्याला प्लॅस्टर करून घेतले. त्याला पण सिमेंट ( नारंगी ) कलर लावला . डोमच्या आतील बाजूला लेमन येलो हा फ्रेश कलर लावला. डोमच्या आतील छत्रीसारखे स्ट्रक्चरला ब्लॅकऑईल पेंट लावला. तुमच्या आतील वाजून वारली चित्राद्वारे आश्रमातील विद्यार्थ्यांची दिनचर्या दाखवण्याचा प्रयत्न केला.डोमच्या शेजारील परिसरात ची साफसफाई केली. झाडाची कटिंग केले.

कॉस्टिंग

अ. क्र. मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.डिस्टेंपर10 L140 L1400
2.ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]10 L70 L700
3.पॉलिश पेपर10 L15150
4.रेडीमेड बाईंड1 L230230
5.ब्लॅक ऑईल पेंट1 L300300
6.सिमेंट कलर15 Kg30450
7.टर्पेंटाईन1 L120120
8.पुट्टी5 Kg50250
9.पीव्हीसी पाइप (हिरवा)22 F1363000
10.सिमेंट50 गोणी350350
11. कच70 चमेली8480
12.ब्रश830240
13.रोलर250100
14.सिमेंट कलर (विटकरी)3 Kg3090
15.रूळ15 चमेली9150
16.मजुरी  2000
   Total10010

निरीक्षण :

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे – हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

निष्कर्ष :

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.

आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

भविष्यातील उपयोग :

डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, गप्पा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजसाठी करता येईल.

टेनी हाऊस

प्रस्ता

आजच्या युगात जागेची कमतरता आणि वाढते घरांचे खर्च लक्षात घेता, Tiny House ही एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक संकल्पना आहे.
या प्रकल्पाचा उद्देश कमी जागेत, कमी खर्चात आणि टिकाऊ साहित्य वापरून एक आकर्षक, सुरक्षित आणि कार्यक्षम घर तयार करणे हा होता.
या प्रकल्पातून मी बांधकाम, रंगकाम, वायरिंग, आणि फिनिशिंग याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.

सर्वे :

  1. सुरुवातीला आम्ही टेनी हाऊसचे विविध थ्रीडी डिझाईन आणि मॉडेल्सचा अभ्यास केला.
  2. Tiny House संकल्पना जगभरात कशी वापरली जाते, कोणते साहित्य टिकाऊ आणि स्वस्त ठरते हे पाहिले.
  3. विविध बांधकाम पद्धती, फ्रेम प्रकार, छताची रचना आणि वायरिंगची सुरक्षित पद्धत यांचा अभ्यास केला.
  4. जागेचे मोजमाप घेऊन पाया, भिंती आणि छताच्या प्रमाणात योग्य आखणी तयार केली.

उद्देश :

  1. कमी खर्चात हलके वजनाचे एक आकर्षक असे टेनी हाऊस तयार करणे.
  2. लहान जागेत सर्व मूलभूत सुविधा असलेले घर बांधण्याचा अनुभव मिळवणे.
  3. बांधकाम, वायरींग, रंगकाम आणि फिनिशिंगची प्रत्यक्ष समज करून घेणे.
  4. व्यावहारिक ज्ञान वाढवून प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष कामकाज शिकणे.

साहित्य :

बांधकाम साहित्य (BUILDING MATERIALS)

फ्रेमिंग – रुंदी 10 फूट × लांबी 10 फूट × उंची 8 फूट — 8 नग

फ्रेम पिलर – 8 फूट, 4 नग

खिडक्या (Windows) – 4’ × 3’ — 2 नग

मुख्य दरवाजा (Front Door) – 3’ × 7’ — 2 नग

छप्पर (Roofing) – मेटल शीट 3’ × 10’ — 4 नग

इन्सुलेशन (Insulation) – रॅपिकॉन सिमेंट 50mm × 8’ शीट — 20 नग

स्क्रू (Screws with Star Drive Head) – 70mm स्क्रू 500 नग (1 बॉक्स)

सिमेंट शीट (Cement Sheet) – 18mm, 4 नग

पाइप (Pipes) – 1½ इंच, 4 नग

बाथरूम (BATHROOM)

बाथटब: Lyons 3’; × 6’

कमोड टॉयलेट

कमी पाण्याचा शॉवर हेड (Low-flow Shower Head)

भिंतीवर बसवलेला वॉश बेसिन (Wall Mounted Wash Basin)

प्लास्टिकचा पडदा (Plastic Curtain)

भिंतींसाठी करगेटेड मेटल शीट (Corrugated Metal Roofing/Sheets)

एलईडी लाईट्स

हॉलसाठी एलईडी लाईट्स – 2 नग

भिंतीचे पॅनेल (Wall Panels)

छत पॅनेल (Roof Panel)

प्लंबिंग (PLUMBING)

pvc 4” पाईप – 4 नग

pvc 3” पाईप – 1 नग

pvc 2” पाईप – 1 नग

UPVC ½” पाईप – 1 नग

UPVC टी – 4 नग

pvc 4-वे सेक्शन – 1 नग

4” एल – 1 नग

बाथरूम आउटलेट – 1 नग

कमोड इनलेट कॉक ½” – 2 नग

बाराल पाईप – 4 नग

शॉवर ¼” कॉक – 1 नग

भिंत फ्रेमिंग (WALL FRAMING)

फ्रेम आकार (Frame Size): उंची – 8 फूट

लांबी – 10 फूट

रुंदी – 10 फूट

( वायरिंग ) Wiring

एमसीबी ६३ए २ पोल १ नग.

एमसीबी १६ए १ पोल २ नग.

एमसीबी बॉक्स १ नग.

आउटडोअर लॅम्प १ नग.

इंडोअर लॅम्प ३ नग.

स्विच बोर्ड ४ नग.

२ मिमी वायर ६० फूट.

१.५ मिमी वायर ६० फूट.

कृती :

सर्वात आधी मी टेनी हाऊसचे थ्रीडी डिझाईन तयार केले.
यानंतर ज्या ठिकाणी घर बांधायचे होते त्या ठिकाणी आखणी करून घेतली आणि त्या आखणीप्रमाणे पाया बांधला.

त्यानंतर मी टेनी हाऊसची फ्रेम असेंबल करून पाहिली.
फ्रेम तयार झाल्यावर तिला रेड ऑक्साईड (प्रायमर) लावला आणि त्यावर पांढरा ऑइल पेंट लावला.
रंगकाम झाल्यानंतर फ्रेम नट-बोल्टच्या सहाय्याने फिट केली.

फ्रेमच्या आत चारही बाजूंना पीव्हीसी पाईप बसवले.
फ्रेमच्या खालच्या बाजूस स्क्वेअर ट्यूब लावल्या आणि त्यावर सिमेंट शीट बसवली.
भिंतींसाठी मी रॅपिकॉन सिमेंट शीट (50mm x 8) वापरल्या.
ज्या ठिकाणी खिडकी आणि दरवाजा ठेवायचा होता, त्या ठिकाणी शीट मापानुसार कट केल्या.

यानंतर मी 3’x4’ आकाराच्या दोन खिडक्या आणि 3’x7’ आकाराच्या दरवाजाची फ्रेम तयार करून बसवली.
छतासाठी 3’x10’ चे पत्रे बसवले आणि सेल्फ-स्क्रूच्या मदतीने फिट केले.

टेनी हाऊसमध्ये टॉयलेटसाठी स्क्वेअर बार वापरून फ्रेम तयार केली आणि त्यावर सिमेंट प्लाय बसवला.

वायरिंगसाठी मी भिंतींवर आखणी करून घेतली, त्यानुसार खाचा मारून पाईप बसवले आणि त्यावर सिमेंट लावले.
गॅप भरून पुट्टी लावली, लेव्हल काढली आणि भिंतींना व्हाईट कलर लावला.

दरवाजाला सनमायका लावून तो फिट केला.
संपूर्ण घराची वायरिंग केली आणि पॉईंट्स बसवले.

टॉयलेटमध्ये खाली मार्बल फिट करून त्यावर कमोड बसवले.
भिंतींना फरशी लावली आणि 3’x7’ चा स्लायडिंग दरवाजा बसवला.

टेनी हाऊसला सिलिंग शीट बसवताना लाईट पॉईंटच्या ठिकाणी बल्ब बसवले.
यानंतर पाईपलाईन केली, बाथरूममध्ये बेसिन बसवले आणि पाण्याचे कनेक्शन जोडले.

बाहेरच्या बाजूला छोटी भिंत बांधून त्यात मुरूम भरला आणि भिंतीला प्लास्टर केले.
टेनी हाऊसच्या बाहेरील भागातील गॅप सिमेंटने भरले आणि त्यावर कलर लावला.
शेवटी खाली फ्लोअरवर कार्पेट चिकटवले.

कॉस्टिंग

निरीक्षण :

  1. टेनी हाऊस बांधकाम करताना अचूक मोजमाप आणि आखणी महत्त्वाची असते.
  2. फ्रेम आणि भिंतींची जोडणी करताना मजबूत फिटिंगसाठी नट-बोल्ट योग्य रीतीने बसवावे लागतात.
  3. वायरिंग करताना आधी आखणी करून पाईप बसवणे सोयीचे ठरते.
  4. प्रायमर आणि पेंट यामुळे लोखंडी भाग गंजत नाहीत आणि घर टिकाऊ बनते.
  5. बाह्य रंग आणि सिमेंट फिनिशमुळे घराचे सौंदर्य वाढते आणि गॅप्स बंद होतात.

निष्कर्ष :

या प्रकल्पाद्वारे मी टेनी हाऊस कसे बांधायचे, त्यासाठी कोणती साधने आणि सामग्री लागते, तसेच रंगकाम, वायरिंग आणि फिनिशिंगची प्रक्रिया कशी करायची हे सर्व शिकलो.
हा अनुभव खूप उपयुक्त आणि शैक्षणिक होता

भविष्यातील उपयोय

  1. या प्रकल्पातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात लघुउद्योग, फॅब लॅब किंवा बांधकाम क्षेत्रात करता येईल.
  2. कमी जागेत स्वयंपूर्ण घराची कल्पना पुढे नेऊन प्रत्यक्ष वापरासाठी मॉडेल तयार करता येईल.
  3. ग्रामीण किंवा आपत्तीग्रस्त भागात अशा प्रकारची तात्पुरती पण टिकाऊ घरे तयार करता येतील.
  4. पर्यावरणपूरक आणि किफायतशीर घर बांधणीसाठी हा एक उपयुक्त अनुभव ठरू शकतो.

मी हे शिकलो :

डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.

अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.

प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.

छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.

ग्रील तयार करणे

प्रस्तावना :