CCTV

1) CCTV म्हणजे काय?


ELECTRIC

CCTV

1) CCTV म्हणजे काय?

CCTV म्हणजे Closed Circuit Television. याचा उपयोग एखाद्या ठिकाणी सतत लक्ष ठेवण्यासाठी होतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी, शेत किंवा सार्वजनिक ठिकाणी CCTV मुळे सुरक्षा वाढते.

CCTV म्हणजे Closed Circuit Television. याचा उपयोग एखाद्या ठिकाणी सतत लक्ष ठेवण्यासाठी होतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी, शेत किंवा सार्वजनिक ठिकाणी CCTV मुळे सुरक्षा वाढते.

2) विज्ञान आश्रमामध्ये CCTV इंस्टॉलेशन

मी विज्ञान आश्रमामध्ये अनेक CCTV कॅमेरे बसवले आहेत. यातून मला कॅमेरा कसा बसवायचा, कनेक्शन कसे करायचे आणि DVR (Digital Video Recorder) शी कसे जोडायचे हे शिकायला मिळाले.

3) CCTV इंस्टॉलेशनसाठी लागणारे साहित्य

CCTV बसवण्यासाठी काही साहित्य आवश्यक असते :

  • Dome Camera – घरात किंवा ऑफिसमध्ये वापरला जातो.
  • Bullet Camera – बाहेरच्या जागेसाठी (Outdoor) वापरला जातो.
  • Wire / Cable (Coaxial Cable किंवा Cat6 LAN Cable) – कॅमेऱ्याला DVR शी जोडण्यासाठी.
  • DVR (Digital Video Recorder) – सर्व कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग आणि कंट्रोल करण्यासाठी.
  • Adaptor / Power Supply – कॅमेऱ्याला वीज पुरवण्यासाठी.
  • Hard Disk – रेकॉर्डिंग साठवण्यासाठी.

4) Dome व Bullet कॅमेऱ्यात फरक

  • Dome Camera – गोलाकार, लहान, आकर्षक, इनडोअर वापरासाठी.
  • Bullet Camera – लांबट आकाराचा, जास्त अंतरापर्यंत दृश्य कॅप्चर करतो, आऊटडोअर वापरासाठी.

5) शिकलेले कौशल्य

CCTV इंस्टॉलेशन करताना मला वायर कनेक्शन करणे, कॅमेऱ्याचे अँगल सेट करणे, DVR ला नेटवर्कशी जोडणे आणि लाईव्ह व्हिडिओ मोबाईलवर पाहणे हे सगळे शिकायला मिळाले. हे कौशल्य भविष्यात सुरक्षा सिस्टीमच्या कामासाठी उपयोगी आहे.