HOME APPLIENCE PROJECT

       या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सजावट तसेच शैक्षणिक वापरासाठी एक आकर्षक व उपयुक्त असा फ्लावर पॅनेल तयार करणे हा आहे. पॅनेलवर घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध इलेक्ट्रिकल उपकरणांचे डेमो मॉडेल दाखवणे, त्यांची नावे दर्शवणे आणि संपूर्ण प्लेटला आकर्षक रंगसंगती देणे हे या कामाचे प्रमुख लक्ष्य होते
  1. सरांनी आम्हाला पुण्यातील एक इलेक्ट्रिक लॅब दाखवली.
  2. त्या लॅबमध्ये होम अप्लायन्सेसचे डेमो ठेवले होते.
  3. ही आयडिया आम्हाला खूप आवडली.
  4. सरांनी सांगितले की आपल्याइलेक्ट्रिकल लॅबमध्येही असे डेमो असावेत.
  5. यामुळे विद्यार्थ्यांना खालील फायदे मिळतील :

मशीन समजून घेण्यास मदत होईल.

त्यामधील पार्ट्स ओळखता येतील.

प्रत्येक पार्टचे कार्य समजेल.

मशीन खराब झाल्यास कोणता पार्ट खराब आहे हे तपासता येईल.

आपल प्रोजेक्ट करण्यामागचा उद्देश असा आहे की फॅन, टेबल फॅन, मिक्सर, इलेक्ट्रिकल शेगडी, गिझर अशा वस्तू आतून समजून घेण्यासाठी आणि त्यांची अधिक माहिती करून घेण्यासाठी आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे. तर ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंची आतून माहिती घेण्यासाठी हाच आमचा मुख्य उद्देश आहे.

प्लाय

हाफ राऊंड पट्टी

फेविकॉल

वायर

स्क्रू

चुके

क्लिप

टाय

होम अप्लायन्सचे डेमो

ऑइल पेंट

ब्रश

मास्किंग टेप

रोलर

स्टिकर्स.

सर्वात प्रथम ४*८ फूट मापाच्या दोन प्लाय निवडण्यात आले.प्लायच्या चारही बाजूंना डी-मोल्डिंग पट्ट्या बसवण्यात आल्या आणि मधोमध पट्ट्यांच्या सहाय्याने प्लाय चार भागांत विभागला.दोन्ही प्लायला सॅंडपेपरने नीट घासून गुळगुळीत फिनिशिंग देण्यात आले संपूर्ण पॅनेलवर व्हाईट बेस कलर लावण्यात आला.पॅनेलवर निळा ऑइल पेंट वापरून आकर्षक रंगसंगती दिली.डी-मोल्डिंग पट्ट्यांना पिवळा ऑइल पेंट लावून फ्रेम तयार केली.

खालील उपकरणांचे डेमो मॉडेल पॅनेलवर बसवले:

वॉटर हीटर

सोलर जोडणी

मिक्सर

मोटार

इस्त्री

वॉटर फिल्टर

फॅन

प्रत्येक उपकरणाच्या खाली त्यांच्या नावे स्टिकरच्या साह्याने चिटकवली.

आलेल्या अडचणी :

विभागणी करताना माप अचूक बसवण्यासाठी वेळ लागला.

ऑइल पेंट सुकण्यासाठी जास्त वेळ घेतल्यामुळे कामाला विलंब झाला.

काही डेमो मॉडेलचे साईज प्लायमध्ये अचूक बसवण्यासाठी कटिंग व समायोजन करावे लागले.

स्टिकर्स सरळ लावण्यासाठी काळजी घ्यावी लागली.

अ . क्रमालाचे नावएकूण माल दर एकूण किमत
प्लावूड8*4=260f3840
हाप राउंड पट्टी175f101750
चुका 500g25125
फेविकॉल250gm120120
ब्लू ओईल paint1 liter474474
ब. आर .वाईट primer1 liter508508
मास्कीन tap4 tap25100
trugrip UR TRA800g255220
पिवळा ओईल paint500 mi. liter270135
१०मजुरी 1818
११एकूण9090

पॅनेलची मजबुती व फिनिशिंग उत्तम आली.

डेमो मॉडेल्स स्पष्टपणे दिसतात व अभ्यासासाठी उपयुक्त आहेत.

निळा व पिवळा रंग मिळून एक आकर्षक देखावा निर्माण झाला.

स्टिकर्समुळे ओळख करणे सोपे झाले.

या प्रकल्पामुळे आम्हाला विविध इलेक्ट्रिकल उपकरणांची आंतरिक रचना, कार्यपद्धती आणि जोडणी याबद्दल सखोल ज्ञान मिळाले.
डेमो पॅनेल तयार करताना कटिंग, पेंटिंग, डिझाईन आणि मॉडेल बसवण्याचे कौशल्य विकसित झाले.
शैक्षणिक उपयोगासाठी हे पॅनेल अत्यंत उपयुक्त ठरते.

भविष्यातील उपयोग :

इलेक्ट्रिकल ट्रेनिंगसाठी डेमो बोर्ड म्हणून

शाळा, आयटीआय, पॉलिटेक्निक प्रदर्शनात

विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल शिक्षणासाठी

उपकरणांच्या आतील रचना समजून घेण्यासाठी