माहिती ;
पार्लर म्हणजे काय?
पार्लर म्हणजे महिलांसाठी सौंदर्यसंबंधी सेवा देणारे केंद्र. येथे फेस, केस, नेल्स, मेकअप, स्किन-केअर आणि ग्रूमिंग यांसारख्या सेवा दिल्या जातात.
पार्लरचे प्रमुख उद्दिष्ट
- ग्राहकांचे सौंदर्य वाढवणे
- स्वच्छ, सुरक्षित आणि तज्ञ सेवा देणे
- ग्राहकांना आरामदायी व आत्मविश्वास देणारा अनुभव देणे
पार्लरमध्ये दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवा
- हेअर केअर
- हेअर कट
- हेअर वॉश
- ब्लो ड्राय
- हेअर कलर
- हेअर स्पा
- स्ट्रेटनिंग / स्मूथनिंग
- स्किन केअर
- फेस क्लीन-अप
- फेशियल
- ब्लीच
- टॅन रिमूव्हल
- मेकअप
- पार्टी मेकअप
- ब्राइडल मेकअप
- साधा / डे मेकअप
- हात-पाय सेवा
- मॅनिक्युअर
- पेडिक्युअर
- नेल आर्ट
- ग्रूमिंग
- आयब्रो सेट
- वॅक्सिंग
- डी-टॅन
साहित्य
- गोल्ड ,डायमंड , चोकलेट, वाइन , इत्यादी फेशियल चे प्रॉडक्ट्स आहेत .
- खुर्च्या, काचेचे टेबल, वॉश बेसिन
- ड्रायर, स्ट्रेटनर, कात्री, कंगवे
- फेशियल किट, स्किन-केअर प्रॉडक्ट्स
फेस क्लिन-अपच्या स्टेप्स
1) क्लेन्सिंग (Cleansing)
- चेहऱ्यावरील धूळ, तेल, मेकअप काढण्यासाठी क्लेंझर लावून हलक्या हाताने मसाज करतात.
- नंतर कॉटन/वाइपने पुसून टाकतात.
2) स्क्रबिंग (Scrubbing)
- स्क्रब लावून ३–५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करतात.
- चेहऱ्यावरील मृत त्वचा (dead skin) व ब्लॅकहेड्स कमी होतात.
- नंतर पाण्याने किंवा वाइपने साफ करतात.
3) स्टीमिंग (Steaming)
- ५–८ मिनिटे स्टीम देतात.
- पोर्स (छिद्रे) उघडतात, ज्यामुळे ब्लॅकहेड/व्हाइटहेड काढणे सोपे होते.
4) ब्लॅकहेड/व्हाइटहेड रिमूव्हल (Extraction)
- नोज एरिया आणि चिन एरिया वरून ब्लॅकहेड व व्हाइटहेड काढतात.
- हे करताना हलका प्रेशर वापरतात.
5) मसाज (Massage)
- मसाज क्रीम लावून चेहऱ्यावर १०–१५ मिनिटे मसाज करतात.
- यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते, त्वचा ताजीतवानी दिसते.
6) फेस पॅक / मास्क (Face Pack/Mask)
- त्वचेच्या प्रकारानुसार (dry/oily/normal) फेस पॅक लावतात.
- १०–१५ मिनिटे सुकू देतात.
- नंतर कोमट पाण्याने सहज धुवून टाकतात.
7) टोनिंग (Toning)
- त्वचेचे पोर्स टाईट करण्यासाठी टोनर लावतात.

पार्लरच्या संबंधित माहिती घेण्यासाठी शिक्रापूरला दिलेली भेट ;
