इलेक्ट्रिक सेफ्टी बाबत माहिती
प्रस्तावना
आजच्या काळात वीज (Electricity) जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. घर, उद्योग, शाळा, मशीन, उपकरणे सर्वत्र वीज वापरली जाते. पण वीज चुकीच्या पद्धतीने वापरली तर अपघात, शॉक, आग, जखम किंवा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे विद्युत सुरक्षा (Electric Safety) पाळणे खूप आवश्यक आहे.
उद्देश
इलेक्ट्रिक सेफ्टीचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे
विद्युत अपघात टाळणे
मनुष्याचे प्राण वाचवणे
आग लागणे टाळणे
मशीन व उपकरणांचे संरक्षण करणे
सुरक्षित कामाची सवय लावणे
कृती
घरात इलेक्ट्रिक सेफ्टी
ओले हाताने स्विच किंवा प्लग वापरू नये
खराब वायर किंवा सैल प्लग वापरू नये
जास्त लोड (Overload) करू नये
MCB, ELCB वापरणे
अर्थिंग (Earthing) योग्य असणे
कामाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक सेफ्टी
इन्सुलेटेड टूल्स वापरणे
रबर हातमोजे व बूट वापरणे
लाईन बंद करून काम करणे
चेतावणी बोर्ड लावणे
प्रशिक्षित व्यक्तीनेच काम करणे आपत्कालीन उपाय
शॉक लागल्यास लगेच वीज बंद करणे
लाकडी काठी किंवा प्लास्टिक वस्तूने व्यक्तीला वेगळे करणे
डॉक्टरकडे नेणे
निरीक्षण
निरीक्षणात असे दिसून येते की
बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होतात
अर्थिंग नसल्यामुळे शॉक लागतो
खराब वायरमुळे आग लागते
नियम पाळल्यास अपघात कमी होतात
निष्कर्ष
इलेक्ट्रिक सेफ्टी ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य नियम पाळले तर विद्युत अपघात टाळता येतात. सुरक्षित पद्धतीने वीज वापरणे ही आपली जबाबदारी आहे
मोटार रीवाइंडिंग
१) प्रस्तावना
मोटार हे घरगुती व औद्योगिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे विद्युत यंत्र आहे.
मोटारमधील वायंडिंग (कॉइल) जळल्यास किंवा खराब झाल्यास नवीन मोटार घेण्याऐवजी ती रीवाइंडिंग करून पुन्हा वापरता येते.
विग्यान आश्रमातील इलेक्ट्रिक लॅबमध्ये आम्ही मोटार रीवाइंडिंगची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष शिकली व केली.
२) उद्देश
- मोटार रीवाइंडिंगची माहिती मिळवणे
- स्टेटरमधील कॉइल काढणे व नवीन कॉइल बसवणे
- वायरचा गेज, पाकार (टर्न) मोजणे
- कॉइल पेपर व राऊटर (इन्सुलेशन) वापर शिकणे
- मोटार पुन्हा कार्यक्षम करणे
३) कृती
- मोटार उघडून स्टेटर बाहेर काढला
- जुनी जळलेली वायंडिंग काढली
- जुन्या कॉइलचा पाकार (टर्न) मोजला
- वायरचा गेज/जाडी मोजून नोंद घेतली
- स्लॉटमध्ये कॉइल पेपर (इन्सुलेशन पेपर) बसवला
- नवीन वायरने ठराविक पाकार प्रमाणे कॉइल वळली
- कॉइल योग्य स्लॉटमध्ये बसवली
- स्टेटर कनेक्शन योग्य प्रकारे जोडले
- कनेक्शन वायर व्यवस्थित बांधून राऊटर व वार्निश लावला
- मोटार वाळवून पुन्हा असेंब्ली केली
४) निरीक्षण
- योग्य वायर गेज वापरल्यास मोटार गरम होत नाही
- पाकार अचूक ठेवल्यास मोटार सुरळीत चालते
- इन्सुलेशन योग्य असल्यास शॉर्ट सर्किट होत नाही
- कनेक्शन नीट केल्यास मोटारचा आवाज कमी येतो
५) निष्कर्ष
मोटार रीवाइंडिंगमुळे खराब मोटार कमी खर्चात पुन्हा वापरता येते. विग्यान आश्रमातील इलेक्ट्रिक लॅबमध्ये प्रत्यक्ष काम केल्यामुळे मोटारचे पाकार, वायर गेज, कॉइल पेपर व स्टेटर कनेक्शन यांची सखोल माहिती मिळाली. ही कौशल्ये रोजगारासाठी व दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
विज्ञान आश्रमात शिकलेले ज्ञान वापरून मी पाबळ गावामध्ये प्रत्यक्ष मोटार रीवाइंडिंग केले



