शेळीपालन (Goat Farming):
1) शेळीपालनाचे महत्त्व : शेळीपालन हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेळीपासून दूध, मांस, शेण आणि कातडी मिळते. शेळ्यांची वाढ जलद होते व प्रजनन क्षमता चांगली असल्यामुळे उत्पन्न वाढते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत आहे.
2) शेळ्यांच्या जाती : –
- 1. उस्मानाबादी (Osmanabadi)उगम – धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर.उपयोग – दूध व मांस.वैशिष्ट्ये – काळा रंग, मजबूत शरीर, जुळी पिले देण्याची क्षमता.
- 2. संगमनेरी (Sangamneri)उगम – अहमदनगर, नाशिक.उपयोग – दूध व मांस.वैशिष्ट्ये – पांढरा किंवा तपकिरी रंग, मध्यम आकार.
- 3. जमुनापारी (Jamunapari)उगम – उत्तर प्रदेश.उपयोग – दूध व मांस.वैशिष्ट्ये – मोठे शरीर, लांब कान, चांगले दूध उत्पादन.
- 4. सिरोही (Sirohi)उगम – राजस्थान.उपयोग – मांस.वैशिष्ट्ये – वेगाने वाढणारी व मजबूत जात.
- 5. कोकण कन्यालउगम – कोकण विभाग.उपयोग – मांस.वैशिष्ट्ये – दमट हवामानात चांगली वाढ.
- 6. बोअर (Boer)उगम – दक्षिण आफ्रिका.उपयोग – मांस.वैशिष्ट्ये – जलद वजन वाढणारी जात.
3) शेळ्यांचा आहार : शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी संतुलित आहार आवश्यक असतो.हिरवा चारा – नेपियर, लुसर्न, मका.वाळलेला चारा – कडबा, गवत.संतुलित खाद्य – मका, सोयाबीन पेंड, गहू भरडा.खनिज मिश्रण व मीठ.स्वच्छ व भरपूर पिण्याचे पाणी.
4) शेळ्यांचे लसीकरणPPR –



- जानेवारी–फेब्रुवारी (वर्षातून १ वेळ) FMD
- एप्रिल (दर ६ महिन्यांनी)HS
- मे–जून (वर्षातून १ वेळ)ET
- जून–जुलै (वर्षातून १ वेळ)Goat Pox
- डिसेंबर–जानेवारी (वर्षातून १ वेळ) 5) शेळ्यांचे वजनजन्मावेळी – 2 ते 3 कि.ग्रॅ.3 महिन्यांनी – 10 ते 15 कि.ग्रॅ.6 महिन्यांनी – 18 ते 25 कि.ग्रॅ.9 महिन्यांनी – 25 ते 35 कि.ग्रॅ.12 महिन्यांनी – 35 ते 45 कि.ग्रॅ.प्रौढ शेळी – 40 ते 60 कि.ग्रॅ. (जातीनुसार बदलते)
आम्ही केलेले कामशेळीपालनाचे महत्त्व समजून घेतले.उस्मानाबादी, संगमनेरी, जमुनापारी, सिरोही, कोकण कन्याल व बोअर या जातींची माहिती घेतली.शेळ्यांचा संतुलित आहार व खाद्य व्यवस्थापन समजून घेतले.लसीकरणाचे वेळापत्रक व त्याचे महत्त्व शिकले.शेळ्यांचे वजन मोजण्याची पद्धत व वाढीची नोंद कशी ठेवावी हे पाहिले.शेळ्यांच्या स्वच्छता, आरोग्य व व्यवस्थापनाची माहिती घेतली