1. परिचय व महत्त्व

हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय पाण्यातील पोषक द्रावणात वनस्पती वाढवण्याची पद्धत.कमी पाण्यात, कमी जागेत आणि वर्षभर शेती करता येते.उत्पादनाचा दर्जा व उत्पादनक्षमता वाढते.

2. प्रणालीचे प्रकारNFT

(Nutrient Film Technique): मुळांवर सतत पातळ पोषक द्रावणाचा प्रवाह असतो. पालेभाज्यांसाठी योग्य.DWC (Deep Water Culture): मुळे सतत पोषक द्रावणात बुडालेली असतात. ऑक्सिजनसाठी एअर पंप वापरतात.एरोपोनिक्स: मुळांवर पोषक द्रावणाची फवारणी केली जाते. पाण्याची बचत जास्त होते.

3. पोषण द्रावण

पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून पोषण द्रावण तयार करतात.pH साधारण 5.5–6.5 ठेवतात.

4. पिकांची निवड

लेट्यूस, पालक, मेथी, कोथिंबीर, तुळस, टोमॅटो, काकडी, मिरची, स्ट्रॉबेरी ही पिके योग्य आहेत.

5. सुविधा व उपकरणे

ग्रो ट्रे/पीव्हीसी पाइप, पाण्याची टाकी, पंप, एअर पंप, नेट पॉट, ग्रोइंग मीडिया (कोकोपीट, परलाइट, रॉकवूल), pH व EC मीटर.

6. रोग व कीड व्यवस्थाप

नस्वच्छता राखावी.पोषण द्रावण नियमित बदलावे.रोगट झाडे त्वरित काढून टाकावीत.जैविक कीड नियंत्रण वापरावे.

7. अर्थकारण व बाजारपेठ

सुरुवातीचा खर्च जास्त असतो.पाणी व खतांची बचत होते.उच्च दर्जाचा ताजा भाजीपाला बाजारात चांगल्या किमतीत विकला जातो.

DWC आणि NFT या दोन्ही पद्धती समजून घेतल्या.पोषक द्रव्यांचे (Nutrient Solution) मिश्रण तयार करण्याची माहिती घेतली.pH आणि EC तपासण्याची पद्धत शिकली.नेट पॉटमध्ये रोपे लावण्याचा सराव केला.पाण्याचा प्रवाह, पंप आणि संपूर्ण प्रणालीची कार्यपद्धती पाहिली.रोपांची वाढ व देखभाल कशी करावी याची माहिती घेतली.