गोठा बांधतानागाईंचा गोठा बांधताना उंचावरची, कोरडी आणि सपाट जागा निवडावी.गोठ्यामध्ये जनावरांच्या ओळींच्या रचनेनुसार प्रामुख्याने शेपटीकडे शेपटी पद्धत
(Tail to Tail) आणि तोंडाकडे तोंड पद्धत (Face to Face) या दोन पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. तसेच आधुनिक दुग्धव्यवसायात मुक्तसंचार गोठा (Loose Housing System) ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते.गोठा बांधण्याच्या विविध पद्धती1. शेपटीकडे शेपटी पद्धत (Tail to Tail System)या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते.या रचनेमुळे दूध काढणाऱ्या व्यक्तीवर देखरेख करणे सोपे जाते.मलमूत्र साफ करणे सुलभ होते.जनावरांना संसर्गजन्य रोगांचा धोका कमी असतो.
2. तोंडाकडे तोंड पद्धत (Face to Face System)या पद्धतीमध्ये जनावरांचे तोंड समोरासमोर असते.गोठ्याच्या दोन्ही बाजूंना मोकळी जागा राहिल्याने जनावरांना भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळते.जनावरांना चारा टाकणे अतिशय सोपे जाते.
3. मुक्तसंचार गोठा पद्धत (Loose Housing System)या आधुनिक पद्धतीत गाईंना बांधून न ठेवता एका मोठ्या, सुरक्षित कंपाऊंडमध्ये मोकळे सोडले जाते.एका जनावरासाठी सुमारे २०० चौरस फूट मोकळी जागा लागते.गव्हाण व पाण्याच्या हौदाची सोय एका बाजूला असते.यामुळे गाई तणावमुक्त राहतात, त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि दुग्ध उत्पादन वाढण्यास मदत होते.
३. महाराष्ट्रातील स्थानिक देशी जाती (Local Breeds of Maharashtra)या जाती प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी, ओढकामासाठी आणि घरगुती वापरासाठी पाळल्या जातात.
• खिलार (Khillar)वैशिष्ट्ये:पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही जात प्रसिद्ध आहे.हे गोवंश अत्यंत चपळ आणि कडक शिंगांचे असतात.हिचे दूध कमी असते.शेतीच्या कामासाठी आणि बैलगाडी शर्यतीसाठी खिलार बैलांना मोठी मागणी असते.
• डांगी (Dangi)वैशिष्ट्ये:कोकण आणि अतिपावसाच्या डोंगराळ भागात (उदा. नाशिक, अहमदनगरचा पश्चिमेकडील भाग) ही जात आढळते.हिची त्वचा तेलकट असल्याने पावसाच्या पाण्याने हिला इजा होत नाही.
• देवणी व लाल कंधारी (Deoni & Lal Kandhari)वैशिष्ट्ये:मराठवाडा (लातूर, नांदेड, परभणी) भागात आढळणाऱ्या या दुहेरी हेतूच्या (दूध आणि काम) जाती आहेत.


