उत्पादनाचे नाव

इन्स्टंट गाजर हलवा प्रीमिक्स

उद्दिष्ट

कमी वेळात, चविष्ट व पौष्टिक गाजर हलवा तयार करण्यासाठी प्रीमिक्स तयार करणे.

आवश्यक साहित्य

  • गाजर – 10 कि.ग्रा.
  • दूध – 6 लिटर
  • तूप – 250 ग्रॅम
  • वेलची पावडर – 80 ग्रॅम
  • गॅस
  • ड्रायर
  • पॅकिंग बॅग
  • स्टिकर
  • कलर
  • बदाम
  • सीलिंग मशीन

कृती

  1. ताजी गाजरे स्वच्छ धुवून सोलून किसून घ्या.
  2. किसलेल्या गाजरात दूध घालून शिजवा.
  3. मिश्रण घट्ट झाल्यावर तूप घालून परता.
  4. वेलची पावडर व बदाम घालून चांगले मिसळा.
  5. मिश्रण ड्रायरमध्ये पूर्ण वाळवा.
  6. थंड झाल्यावर बारीक करून प्रीमिक्स तयार करा.
  7. ठराविक वजनाच्या पॅकमध्ये भरून सीलिंग करा.
  8. स्टिकर लावून तयार उत्पादन साठवा.

कॉस्टिंग

साहित्य किंमत (₹)
गाजर 500.00
दूध 324.00
तूप 212.50
वेलची 320.00
गॅस चार्ज 27.51
ड्रायर चार्ज 56.58
पॅकिंग बॅग 76.00
स्टिकर 28.00
कलर 3.00
बदाम 3.00
सीलिंग चार्ज 10.00
एकूण खर्च ₹1560.09

मजुरी (35%) = ₹546.03

एकूण उत्पादन खर्च = ₹2106.12

  • तयार पॅकेट = 18
  • प्रति पॅकेट उत्पादन खर्च = ₹117
  • एकूण विक्री = ₹2700
  • नफा = ₹594

तयार करण्याची पद्धत (ग्राहकांसाठी)

  1. एका पॅकेटमध्ये आवश्यक तेवढे दूध किंवा पाणी घाला.
  2. 5–7 मिनिटे सतत ढवळत शिजवा.
  3. आवश्यक असल्यास थोडे तूप घाला.
  4. गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करा.

फायदे

  • झटपट तयार होतो.
  • घरगुती चव व सुगंध.
  • पौष्टिक आणि स्वादिष्ट.
  • साठवण व वाहतूक सोपी.
  • वेळ व इंधनाची बचत.
  • व्यावसायिक उत्पादनासाठी उपयुक्त.

निष्कर्ष

इन्स्टंट गाजर हलवा प्रीमिक्स हा कमी वेळात स्वादिष्ट हलवा तयार करण्याचा उत्तम पर्याय आहे. योग्य पॅकिंग व साठवण केल्यास उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते आणि चांगला नफाही मिळू शकतो.

Photo