शेगदाना चिक्की
प्रस्तावना
शेंगदाणा चिक्की हे पौष्टिक, चविष्ट आणि ऊर्जा देणारे पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे. शेंगदाणे व गूळ यापासून तयार होणारी ही चिक्की हिवाळ्यात विशेष लोकप्रिय असते. कमी साहित्य, सोपी कृती आणि उत्तम पौष्टिकमूल्ये यामुळे शेंगदाणा चिक्की सर्व वयोगटांमध्ये आवडीने खाल्ली जाते.
उद्देश
शेंगदाणा चिक्की तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कमी खर्चात पौष्टिक, ऊर्जा-युक्त आणि चविष्ट खाद्यपदार्थ तयार करणे. विद्यार्थ्यांना स्वयंपाक कौशल्य, गूळाची पाककला आणि आरोग्यदायी स्नॅक्स बनवण्याचे ज्ञान मिळणे हा देखील यामागचा उद्देश आहे.
सर्वे
:
शेंगदाणा चिक्कीबाबत घेतलेल्या सर्वेत असे दिसून आले की बहुतेक लोकांना तिची चव, कुरकुरीतपणा आणि पौष्टिक मूल्ये आवडतात. ती स्वस्त, सहज उपलब्ध आणि ऊर्जा देणारी असल्यामुळे लोक ती आवडीने खरेदी व सेवन करतात.
सर्वेक्षणातून दिसून आलेले मुद्दे
- बहुतेकांना शेंगदाणा चिक्कीची चव व कुरकुरीतपणा आवडतो.
- ती पौष्टिक व ऊर्जा देणारी असल्याचा लोकांचा विश्वास आहे.
- कमी किंमत व सहज उपलब्धता हे तिचे मोठे आकर्षण आहे.
- गूळ वापरल्यामुळे ती आरोग्यदायी पर्याय मानली जाते.
- हिवाळ्यात तिची मागणी जास्त असते.
वापरलेले साहित्य
शेंगदाणा
गुळ
तूप
कृती
- शेंगदाणे भाजून त्यांच्या साली काढल्या.
- कढईत गूळ वितळवून त्याचा पाक तयार केला.
- त्या पाकात भाजलेले शेंगदाणे मिसळून नीट हलवले.
- मिश्रण ताटात ओतून पातळ पसरवले.
- थंड झाल्यावर तुकडे करून चिक्की तयार केली.
flowchart
साहित्य गोळा करणे
(शेंगदाणे, गूळ, तूप)
↓
शेंगदाणे भाजणे
थंड झाल्यावर शेंगदाण्यांची सालं काढणे
↓
गूळ कढईत वितळवणे
↓
गुळाचा पाक योग्य तासणे
(गोळा / दोन धागा तपासणे)
↓
भाजलेले शेंगदाणे पाकात घालून मिक्स करणे
↓
मिश्रण तुप लावलेल्या ताटात ओतणे
↓
लाटण्याने सपाट करणे
↓
हवे तसे तुकडे कापणे
↓
चिक्की थंड होऊ देणे
↓
शेंगदाणा चिक्की तयार
त्यातून काय शिकलो
- गूळाचा योग्य पाक कसा करावा हे शिकलो.
- स्वच्छता व मोजमापाचे महत्त्व समजले.
- कमी साहित्य वापरून चविष्ट पदार्थ तयार करता येतात हे कळले.
- टीमवर्क आणि वेळ व्यवस्थापनाचे कौशल्य वाढले.
- पारंपरिक खाद्यपदार्थांचे पौष्टिक मूल्य जाणून घेतले.
निष्कर्ष
शेंगदाणा चिक्की हा कमी खर्चात, सोप्या पद्धतीने तयार होणारा आणि पौष्टिक मूल्यांनी भरलेला पारंपरिक पदार्थ आहे. या प्रकल्पातून स्वयंपाक कौशल्य, वेळेचे नियोजन आणि आरोग्यदायी स्नॅक्सचे महत्त्व समजले. त्यामुळे शेंगदाणा चिक्की हा उपयुक्त आणि सर्वांना आवडणारा खाद्यपदार्थ ठरतो.