एखादी धातू जर रंगवायचे असेल तर आपण पावडर कोटिंग च्या मशीनचा वापर करून ती वस्तू किंवा धातू रंगवू शकतो.
पावडर कोटिंग करत असताना आपल्याकडे सेफ्टी असणे व त्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
या मशीनद्वारे मेटलला रंग दिले जाते, पावडर कोटिंग कलर मध्ये जो रंग असतो तो पावडरच्या स्वरूपात असतो
मेटल वर चिटकवण्यासाठी एक ओवन आहे ज्याने ते मेटल ओवन मध्ये ठेवल्यास पावडर गरम होते व वितळून पावडर मेटल वर चिटकते.
साहित्य:-
थ्री इन वन ऍसिड , हॅन्ड ग्लोज, गॉगल, ज्या वस्तूला पावडर कोटिंग करायचे आहे ती वस्तू…
सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे पॉलिश करून घेणे.
पॉलिश केल्यानंतर 3 इन 1 ऍसिड ने त्याला असलेले गंज काढून घ्यावे.
त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन दहा-पंधरा मिनिट सुकायला तसेच ठेवावे.
नंतर आपल्याला जो कलर लागत असेल ते पावडर टाकून घ्यावे.
त्यानंतर जमिनीवर मोठे कार्पेट अंतरावे ज्याने खाली पडलेले कलर पावडर वाया जाणार नाही किंवा खराब होणार नाही.
नंतर कॉम्प्रेसर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.
त्यानंतर ओवन ठेवून त्याला सेट करावे व त्या धातूवरचा कलर हिट होऊन त्यावर चिटकला जातो.
आपण सेट केलेले टाईम आपोआप बंद होईल तसेच मशीन सुद्धा बंद होईल.