सुरक्षिततेचे नियम – ऊर्जा पर्यावरण

  1. दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे आणि फ्यूज काढलेला आहे की नाही याची खात्री करावी, आणि “काम चालू आहे” असा फलक फ्यूजजवळ लावावा.
  2. ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये विजेची कामे करताना रबरी हातमोजे आणि रबरी चप्पल किंवा रबरी बूट वापरावे.
  3. ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये उपकरणांना आणि विजेच्या बोर्डला व्यवस्थित अर्थिंग केलेली आहे की नाही याची खात्री करावी.
  4. जर इलेक्ट्रिकल विभागामध्ये शॉर्ट-सर्किटमुळे आग लागली तर पाण्याचा वापर करू नये. मातीचा आणि रेतीचा वापर करावा.
  5. फ्यूजमध्ये फ्यूज वायरचाच वापर करावा.
  6. टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करावा, त्याचा वापर स्क्रू-ड्रायव्हर म्हणून करू नये.
  7. विजेची कामे करताना व्यवस्थित विद्युत रोधक आवरण असलेली उपकरणे वापरावी.
  8. विजेचा धक्का लागत असलेल्या माणसाला स्पर्श करू नये. त्या व्यक्तीला विजेपासून बाजूला करण्यासाठी लाकडी काठी किंवा विद्युत रोधक वस्तूचा वापर करावा.
  9. कामाची जागा वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ करावी.
  10. योग्य तो अग्निशामक संच विभागामध्ये उपलब्ध असावा, त्याचा वापरण्याचा दिनांक तपासून घ्यावा.
  11. जखम झाल्यानंतर प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा, प्राथमिक उपचार पेटी गृह-आरोग्य विभागात उपलब्ध आहे.