निर्धूर चूल म्हणजे काय ?

इंधन जाळताना तयार होणारा धूर धूरनलिकेद्वारे बाहेर सोडणाऱ्या सुधारित चुलीला निर्धूर चूल म्हणतात. या चुलीमुळे स्वयंपाकाच्या जागेत धूर कमी राहतो.

आवश्यक साहित्य :

  • लोखंडी चूल
  • धूर नलिका/चिमणी
  • लोखंडी जाळी किंवा स्टँड
  • लाकूड किंवा इतर योग्य जैविक इंधन
  • भांडे

चुलीचे प्रमुख भाग :

  • लोखंडी बॉडी – चुलीची मुख्य संरचना.
  • इंधन ठेवण्याची जागा – लाकूड किंवा इतर इंधन ठेवण्यासाठी.
  • हवा प्रवेशमार्ग – ज्वलनासाठी आवश्यक हवा मिळण्यासाठी.
  • भांडे ठेवण्याची जागा – भांडे ठेवून स्वयंपाक करण्यासाठी.
  • धूरमार्ग – तयार झालेला धूर पुढे नेण्यासाठी.
  • चिमणी/धूरनलिका – धूर बाहेर सोडण्यासाठी.
  • राख काढण्याची जागा – जळल्यानंतरची राख काढण्यासाठी.

कार्यपद्धती :

  • चुलीच्या इंधन ठेवण्याच्या भागात लाकूड ठेवले जाते.
  • इंधन पेटवल्यानंतर ज्वलन सुरू होते.
  • ज्वलनासाठी आवश्यक हवा चुलीमध्ये प्रवेश करते.
  • तयार झालेली उष्णता भांड्याला मिळते.
  • ज्वलनातून तयार झालेला धूर चुलीतील धूरमार्गाने जातो.
  • धूर लोखंडी चिमणीद्वारे स्वयंपाकाच्या जागेच्या बाहेर सोडला जातो.
  • त्यामुळे स्वयंपाकाच्या जागेत धूर साचण्याचे प्रमाण कमी होते.

निर्धुर चुलीवर चहा बनवायला लाकूड जाळल्यावर त्यातील जळणारी कॅलरीज :

लाकूड = 3500Kcal = 1Kg

चहासाठी घेतलेले लाकूड = 250g

लाकूड = 250÷1000 = 0.25 × 3500

= 0.25 × 3500

= 875 Kcal

  • एका चहासाठी जळणारी कॅलरीज : 875 Kcal
  • चहासाठी लागणारा वेळ : 15 minutes