F
शेंगदाणा चिक्की
१) प्रस्तावना : शेंगदाणा चिक्की हा एक गोड आणि कुरकुरीत खाद्यपदार्थ आहे. तो सर्वांना आवडतो.
२) उद्देश : चविष्ट आणि पौष्टिक शेंगदाणा चिक्की तयार करणे हा या कृतीचा उद्देश आहे.
३) साहित्य : शेंगदाणे, गूळ आणि थोडे तूप.
४) कृती : प्रथम शेंगदाणे भाजून त्यांची साल काढावी. नंतर कढईत गूळ गरम करून त्याचा पाक तयार करावा. त्यात शेंगदाणे घालून चांगले मिसळावे. हे मिश्रण तुपाने लावलेल्या ताटात पसरवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावेत.
५) निष्कर्ष : शेंगदाणा चिक्की हा गोड, कुरकुरीत आणि पौष्टिक पदार्थ आहे. तो खायला खूप चविष्ट लागतो.