वायर म्हणजे काय ?
- वायर म्हणजे विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा विद्युत वाहक होय.
- वायर सामान्यतः तांबे किंवा ॲल्युमिनियमपासून बनवले जातात. वायरवर विद्युत धक्का टाळण्यासाठी इन्सुलेशन केलेले असते.
वायरचे प्रकार :
1. सिंगल कोअर वायर (Single Core Wire): यामध्ये एकच वाहक असतो. घरातील विद्युत वायरिंगमध्ये वापर केला जातो.
2. मल्टी कोअर वायर (Multi Core Wire): यामध्ये दोन किंवा अधिक वाहक असतात. नियंत्रण परिपथ व विविध विद्युत जोडण्यांमध्ये वापरतात.
3. फ्लेक्सिबल वायर (Flexible Wire): अनेक बारीक तांब्याच्या तारा एकत्र करून बनवलेली असते. ही सहज वाकवता येते. उपकरणे व लवचिक जोडण्यांसाठी वापरतात.
4. पीव्हीसी वायर (PVC Wire): या वायरवर PVC प्लास्टिकचे इन्सुलेशन असते. घरगुती व औद्योगिक वायरिंगमध्ये वापरतात.
5. रबर वायर (Rubber Wire): रबरचे इन्सुलेशन असलेली वायर. लवचिकता आवश्यक असलेल्या काही विद्युत उपकरणांमध्ये वापरतात.
वायरचे फायदे :
- विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी उपयोगी.विद्युत उपकरणांना वीज पुरवठा करता येतो.योग्य इन्सुलेशनमुळे विद्युत धक्क्याचा धोका कमी होतो.
- विविध आकार व क्षमतेमध्ये उपलब्ध असतात.घरगुती, औद्योगिक व शेतीच्या विद्युत कामांमध्ये उपयोग होतो.
प्रक्रिया (Process) :
- प्रथम आवश्यक साहित्य गोळा केले.
- विविध प्रकारच्या वायरचे निरीक्षण केले.
- वायरचे बाहेरील इन्सुलेशन व आतील वाहक पाहिला.
- वायरचे प्रकार व त्यांचे उपयोग समजून घेतले.
- योग्य वायरची निवड कशी करावी याची माहिती घेतली.
- सर्व माहिती प्रात्यक्षिक वहीत लिहिली.