मायक्रोमीटर म्हणजे काय ?

  • मायक्रोमीटर (Micrometer) हे एक अचूक मापन करणारे उपकरण आहे. याच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल वायर, केबलचा व्यास, धातूच्या तारांची जाडी आणि लहान वस्तूंची जाडी अचूकपणे मोजता येते.
  • मायक्रोमीटरला Micrometer Screw Gauge असेही म्हणतात.

उपयोग (Uses) :

  • इलेक्ट्रिकल वायरचा व्यास मोजण्यासाठी.
  • कॉपर आणि अँल्युमिनियम वायरची जाडी मोजण्यासाठी.
  • केबलमधील धातूच्या कंडक्टरचा व्यास मोजण्यासाठी.
  • इलेक्ट्रिकल उपकरणांमधील लहान धातूचे भाग मोजण्यासाठी.
  • वायरच्या जाडीमध्ये अचूकता तपासण्यासाठी.

साहित्य :

  • मायक्रोमीटर
  • इलेक्ट्रिकल कॉपर वायर
  • कापड

प्रक्रिया (Process) :

  • मायक्रोमीटर स्वच्छ करून घ्यावा.
  • वायरचा इन्सुलेशन भाग काढून धातूचा कंडक्टर घ्यावा.
  • वायर Anvil आणि Spindle यांच्यामध्ये ठेवावी.
  • Ratchet फिरवून वायरला हलक्या दाबाने पकडावे.
  • Sleeve आणि Thimble वरील रीडिंग घ्यावी.
  • मिळालेली रीडिंग mm मध्ये लिहावी.

मायक्रोमीटरची Least Count :

मायक्रो मीटर वर 0–25 mm आणि 0.01 mm असे लिहिले आहे.

Range:

  • 0 ते 25 mmLeast Count
  • 0.01 mmLeast Count

म्हणजे उपकरणाने मोजता येणारे सर्वात लहान मापन.

निष्कर्ष :

  • मायक्रोमीटर हे इलेक्ट्रिकल क्षेत्रात वायर व कंडक्टरचा व्यास अचूकपणे मोजण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे मापन उपकरण आहे.