वायर म्हणजे काय ?

वायर म्हणजे विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा विद्युत वाहक होय.

वायर सामान्यतः तांबे किंवा ॲल्युमिनियमपासून बनवले जातात. वायरवर विद्युत धक्का टाळण्यासाठी इन्सुलेशन केलेले असते.

वायरचे प्रकार :

1. सिंगल कोअर वायर (Single Core Wire): यामध्ये एकच वाहक असतो. घरातील विद्युत वायरिंगमध्ये वापर केला जातो.

. 2मल्टी कोअर वायर (Multi Core Wire): यामध्ये दोन किंवा अधिक वाहक असतात. नियंत्रण परिपथ व विविध विद्युत जोडण्यांमध्ये वापरतात.

3. फ्लेक्सिबल वायर (Flexible Wire): अनेक बारीक तांब्याच्या तारा एकत्र करून बनवलेली असते. ही सहज वाकवता येते. उपकरणे व लवचिक जोडण्यांसाठी वापरतात.

4. पीव्हीसी वायर (PVC Wire): या वायरवर PVC प्लास्टिकचे इन्सुलेशन असते. घरगुती व औद्योगिक वायरिंगमध्ये वापरतात.

5. रबर वायर (Rubber Wire): रबरचे इन्सुलेशन असलेली वायर. लवचिकता आवश्यक असलेल्या काही विद्युत उपकरणांमध्ये वापरतात.

वायरचे फायदे

:विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी उपयोगी.विद्युत उपकरणांना वीज पुरवठा करता येतो.योग्य इन्सुलेशनमुळे विद्युत धक्क्याचा धोका कमी होतो.

विविध आकार व क्षमतेमध्ये उपलब्ध असतात.घरगुती, औद्योगिक व शेतीच्या विद्युत कामांमध्ये उपयोग होतो

.प्रक्रिया (Process) :

प्रथम आवश्यक साहित्य गोळा केले

.विविध प्रकारच्या वायरचे निरीक्षण केले

.वायरचे बाहेरील इन्सुलेशन व आतील वाहक पाहिला

.वायरचे प्रकार व त्यांचे उपयोग समजून घेतले

.योग्य वायरची निवड कशी करावी याची माहिती घेतली

.सर्व माहिती प्रात्यक्षिक वहीत लिहिली.