वैयक्तिक स्वच्छता

माहिती

स्वतःच्या शरीराची, कपड्यांची व आजूबाजूच्या सवयींची स्वच्छता राखणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.

उद्दिष्टे

शरीर निरोगी व स्वच्छ ठेवणे
आजार व संसर्ग टाळणे
चांगल्या सवयी लावणे
आत्मविश्वास वाढवणे
समाजात स्वच्छतेचे महत्त्व समजावणे

निरीक्षण

हात नियमितपणे साबणाने धुतले जातात का?
जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुण्याची सवय आहे का?
दात दिवसातून दोन वेळा घासले जातात का?
नखे कापलेली व स्वच्छ आहेत का?
केस स्वच्छ व नीटनेटके आहेत का?
स्वच्छ कपडे परिधान केले जातात का?
रुमालाचा योग्य वापर केला जातो का?

पाव

प्रस्तावना

पाव हा गहू पिठापासून तयार होणारा एक हलका, मऊ आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. भारतातील शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातही पाव हा नाश्त्यामध्ये, अल्पोपहारात व विविध पदार्थांसोबत मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. पाव तयार करण्यासाठी प्रामुख्याने गव्हाचे पीठ, यीस्ट, पाणी, साखर, मीठ आणि थोडे तेल किंवा लोणी वापरले जाते.

उद्देश

  1. पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य समजून घेणे
    – गव्हाचे पीठ, यीस्ट, साखर, मीठ, पाणी आणि तेल/लोणी यांचा वापर कसा केला जातो हे जाणून घेणे.
  2. फर्मेंटेशन (आंबवणी) प्रक्रिया समजणे
    – यीस्ट कसे काम करते, पीठ कसे फुलते आणि पाव मऊ कसा बनतो याचा अभ्यास करणे.
  3. पाव बनवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शिकणे
    – मळणे, फुलवणे, मोल्डिंग, बेकिंग आणि थंड करणे याचे टप्पे समजून घेणे.
  4. पावाची गुणवत्ता तपासणे
    – पावाची रंग, आकार, मऊपणा, सुगंध आणि चव यांचे निरीक्षण करणे.
  5. स्वच्छता आणि सुरक्षितता पद्धतींचे पालन शिकणे
    – खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियम पाळण्याचे महत्त्व समजणे.
  6. पावाचे प्रकार ओळखणे
    – लादी पाव, ब्रेड, बन, बर्गर बन, पिझ्झा बेस इत्यादींचे फरक समजून घेणे.
  7. उद्योग व बाजारपेठेची माहिती मिळवणे
    – पाव उत्पादनातील व्यवसाय, मागणी, खर्च व नफा याबद्दल प्राथमिक माहिती मिळवणे.
  8. प्रकल्प रिपोर्ट तयार करण्याची कौशल्ये विकसित करणे
    – निरीक्षण, सर्वेक्षण, नोंद, विश्लेषण आणि निष्कर्ष यांचे कौशल्य वाढवणे.

सर्वे

लोक पाव किती प्रमाणात खातात हे जाणून घेणे

पावाचे प्रकार, वापर व आवड समजून घेणे

पावाची गुणवत्ता व उपलब्धता याबद्दल लोकांचे मत जाणून घेणे

पावाच्या आरोग्यविषयक जाणिवा तपासणे

सर्वेक्षणातून दिसून आलेले मुद्दे

  1. बहुतेक लोक पाव नाश्त्यात जास्त प्रमाणात खातात, विशेषतः चहा, भाजीपाव, आमलेट-पाव यासोबत.
  2. पावाचा वापर शहरांमध्ये जास्त प्रमाणात आढळला, तर ग्रामीण भागात थोडा कमी दिसून आला.
  3. लोकांना जाड आणि कठीण पावापेक्षा मऊ व ताजा पाव आवडतो.
  4. सर्वेक्षणात असे दिसले की लादी पाव आणि ब्रेड हे सर्वात जास्त वापरले जाणारे प्रकार आहेत.
  5. काही लोकांनी सांगितले की पाव लवकर खराब होतो, त्यामुळे ताजेपणाकडे विशेष लक्ष दिले जाते.
  6. बहुतेक लोकांनी असे सांगितले की पाव स्वस्त असल्यामुळे तो इतर नाश्त्याच्या पदार्थांपेक्षा सोपा पर्याय आहे.
  7. फॅस्टफूडच्या वाढत्या वापरामुळे पावाचे सेवनही वाढले आहे (बर्गर बन, पिझ्झा बेस, सँडविच इ.).
  8. लोकांचे मत असेही आढळले की घरच्या घरी पाव बनवण्यापेक्षा खरेदी करणे सोपे वाटते.
  9. काही लोकांना पावातील प्रेझरवेटिव्हबद्दल चिंता होती आणि त्यांना घरी बनवलेला पाव किंवा बेकरीचा ताजा पाव अधिक आवडतो.
  10. विद्यार्थ्यांमध्ये पावाबद्दल आरोग्यविषयक जागरूकता वाढताना दिसली, जसे की ब्राउन ब्रेड, मल्टिग्रेन ब्रेडची पसंती.

वापरलेले साहित्य

  1. इस्ट
  2. साखर
  3. मीठ
  4. पाणी
  5. तेल
  6. ब्रेड इमपुअर
  7. मैदा

कृती

एका बाऊलमध्ये कोमट पाणी, साखर आणि यीस्ट घाला.

5–10 मिनिटे ठेवा.

यीस्ट फेसाळू लागले की ते सक्रिय झाले असे समजावे.

पीठ मळणे

एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ आणि सक्रिय केलेले यीस्टचे पाणी घाला.

मऊसर पीठ मळा.

शेवटी थोडे तेल लावून पीठ 8–10 मिनिटे चांगले मळून घ्या.

पहिली फुलवण (First Proofing)

मळलेले पीठ एका भांड्यात ठेवा.

झाकण लावून किंवा कापड घालून 1 तास ऊबेत ठेवून द्या.

पीठ दुप्पट फुगलेले दिसेल.

पावाला आकार देणे

फुगलेले पीठ हलकेच दाबून गॅस काढा.

इच्छित आकाराचे पाव (लादी पाव/बन/ब्रेड) तयार करा.

बेकिंग ट्रेमध्ये ठेवून 15–20 मिनिटे पुन्हा फुलू द्या.

दुसरी फुलवण (Second Proofing)

ट्रेमधील पाव वर येऊन फुगतो.

वरून थोडे दूध किंवा लोणी लावले की पाव सोनेरी रंगाचा होतो.

बेकिंग (Baking)

ओव्हन 180°C पर्यंत गरम करा.

पाव 15–20 मिनिटे बेक करा.

वरचा रंग हलका सोनेरी झाल्यावर पाव तयार.

थंड करणे (Cooling)

बेक झालेला पाव बाहेर काढून रॅकवर थंड होण्यासाठी ठेवा.

पाव थंड झाल्यावर तो सर्व्ह करण्यास किंवा वापरण्यास तयार.

flowchart

साहित्य गोळा करणे
(मैदा + यीस्ट + साखर + मीठ + पाणी + तेल/बटर)


कोमट पाण्यात यीस्ट + साखर मिसळून एक्टिव्हेट करणे


मैद्यात मीठ घालून यीस्ट मिश्रण टाकणे


पाणी घालून मऊ पीठ मळणे


तेल लावून पीठ 1 तास फुलू देणे
(डबल साईज होईपर्यंत)


पिठाचे छोटे गोळे बनवणे


ट्रेमध्ये गोळे ठेवून 20–30 मिनिटे दुसरे फुलवणे


ओव्हन/कढईत पाव भाजणे
(सोनसळी रंग येईपर्यंत)

पाव थंड होऊ देणे


पाव तयार

त्यातून काय शिकलो

  1. फर्मेंटेशनची प्रक्रिया समजली – यीस्ट कसे काम करते, पीठ कसे फुलते व त्यातून पाव मऊ कसा बनतो हे शिकता आले.
  2. साहित्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे – पाव चांगला तयार होण्यासाठी मैदा, पाणी, यीस्ट, साखर व मीठ यांचे योग्य प्रमाण पाळणे आवश्यक असते हे कळले.
  3. स्वच्छता आणि स्वयंपाकातील शिस्त शिकली – पाव बनवताना हात स्वच्छ ठेवणे, भांडी नीट धुणे व स्वच्छ वातावरणात काम करणे किती महत्त्वाचे आहे हे जाणवले.
  4. धीर आणि वेळेचे नियोजन – पीठ फुलण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे धीराने व्यवस्थित टप्पे पाळणे आवश्यक आहे हे समजले.
  5. बेकिंगचे मूलभूत तत्त्व शिकले – ओव्हनचे तापमान, बेकिंग टाइम, ट्रेचे वापर इत्यादी गोष्टींचा योग्य उपयोग कसा करायचा हे कळले.
  6. कठीण प्रयत्नानंतर मिळणारे यश – नीट तयार झालेला मऊ पाव पाहून स्वतः बनवल्याचा आनंद मिळाला.
  7. सहकार्याची भावना वाढली – गट प्रकल्पात एकमेकांना मदत करून काम करणे, जबाबदाऱ्या वाटून घेणे याचे महत्त्व समजले.
  8. आरोग्याची जाणीव झाली – ताजे व घरगुती पदार्थ जास्त आरोग्यदायी असतात हे जाणवले.

निष्कर्ष

पाव प्रकल्पातून आम्हाला पाव बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेता आली. पीठ मळणे, फर्मेंटेशन, आकार देणे आणि बेकिंग या टप्प्यांमुळे पाव कसा तयार होतो हे प्रत्यक्ष अनुभवता आले. या प्रकल्पातून स्वच्छता, वेळेचे नियोजन, साहित्याचे प्रमाण आणि सहकार्याने काम करण्याचे महत्त्व कळले.

कॉस्टिंग

मटेरीअल वजनदर /Kgकिंमत
मैदा 5Kg 45225
साखर 100gm424.2
मीठ 80gm302.4
यीस्ट 110gm16017.6
ब्रेड इम्प्रुअर 10gm5005
तेल 50gm1507.5
ओव्हन चार्जेस unit 14/1u14
एकून 275.7
मजुरी
टोटल
एका पावाची किंमत
३५%
३७२.१९
२.८८पैसे

चहा

प्रस्तावना

भारतामध्ये चहा हा प्रत्येक घराचा अविभाज्य घटक आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही प्यायला तयार असणारा हा पेय अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण साधा, सुगंधी आणि चविष्ट चहा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत.

साहित्य ;

पाणी – 100ml

दूध – 3 लिटर

साखर – ५ चमचे (चवीनुसार)

चहा पत्ती – २ चमचा

आलं (किसलेले) – १० gm

वेलची – ४ ते ५ (ठेचून)

कृती

पाणी आणि चहा पत्ती ,अद्रक ,विलायची उकळून घेणे आणि दुध टाकून उकळून घ्यावे .त्यानंतर गाळून घ्यावे .

काळजी घेणे

चहा पत्ती जास्त घालू नये; चहा कडवट होऊ शकतो.

दूध आणि पाण्याचे प्रमाण चवीप्रमाणे ठेवा.

उकळताना भांडे लक्षात ठेवावे, अन्यथा चहा उतू जाऊ शकतो.

चहाचे प्रकार

आला–वेलची चहा

कडाक चहा

लिंबू चहा (दूधाशिवाय)

मसाला चहा

ग्रीन टी

निष्कर्ष

चहा हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. योग्य प्रमाणात साहित्य, मसाले आणि उकळी दिल्यास साध्या चहाचीही चव अप्रतिम होऊ शकते. हा प्रोजेक्ट चहा बनवण्याची साधी पण आवश्यक पद्धत स्पष्ट करतो.

कॉस्टिंग

मटेरिअलवजनदर 1kg / लिटरकिंमत
1 . दुध3.५ लिटर५० rs१७५ .००
2 . साखर३०० gm४२ rs१२ . ६०
3 . चहापावडर८० gm५७ rs४५ . ६०
४ . पाणी1.५ लिटर२० rs१ . ५०
५ . gasचार्गेस
१० gm
१६५० rs७ . ८१
६ . मजुरी८४ . ८१
७ . एकूण325.81 rs

मोरिंगा चिक्की ऑर्डर

प्रस्तावना

मोरिंगा हा इक असा औषधी गुणधर्म असलेला व पोषण मूल्यांनी भरलेला पदार्थ आहे . मोरिंगा मध्ये क्याल्शिम ,आयर्न ,प्रोटीन,वित्यानिम A ,C यांचे प्रमाण खूप जास्त आहे . त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात .

उद्देश

1 :पौष्टिक व आरोग्यदायी अल्पाहार उपलब्ध करणे .

2 :ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे .

3 :मुलांच्या पोषणात सुधारणा करणे .

साहित्य :

1 : 1500 किलो शेंगदाणे

2 : 1 किलो जवस

3 : 1 किलो तेल

4 : 100 ग्राम मोरिंगा पावडर

5 : 25 gm तूप

6 : 750 gm गूळ

आवश्यक साधने

कढई /पातेल

ग्यास शेगडी

चमचे ,कालथा

पोल पट ,रोलिंग पिन

चाकू व सुरी

वजनकाटा

हायजेनिक प्याकिंग

कृती

शेंगदाणे ,जवस,तील,भाजून घ्यावेत .

काढईत गुळ टाकून वितळून घ्यावे त्यानंतर तूप टाकून ते मिक्स करून घ्यावे .

पाक योग्य होईपर्यंत तो गरम करावा .

त्यात मोरीन्गाची पावडर आणि शेंगदाणे ,जवस ,तीळ ,मिक्स करावे .

थोडे तूप लावून मिश्रण पाटावर ओतून लाटण्याने पसरावे .

गरम असतानाच चौकोनी /गोल आकारात कापून घ्यावे .

थंड झाल्यावर हायजेनिक प्याकिंग मध्ये भरून विक्रीसाठी ठेवावे .

त्यातून काय शिकलो

मोरिंगाचे महत्व

मोरिंगा म्हणजे शेवगा हा पोषण मूल्यांनी समृद्ध असा वनस्पती आहे.त्याच्या शेंगा ,पाने ,फुले आणि बिया सर्वच उपयोगी आहेत .

पौष्टिक मूल्य

मोरिंगाच्यापानांमध्ये प्रथिने , लोह ,क्याल्शिम ANTIOXIDANTS मुबालक प्रमाणात असतात .

औषधी उपयोग

१ .. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते .

२ .. रोग्प्रतीकाराची शक्ती वाढते .

३ .. शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त .

पर्यावरण पूरकता

मोरिंगा झाड जलद वाढते आणि जमिनीची सुपीकता .

शिकलो ते

पोषक अन्न तयार करण्याचे कौशल्य

गटाने काम करण्याचे महत्व

स्तानिक शेती व झाडाचं उपयोग

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नव्या कल्पना

कॉस्टिंग

मटेरियलवजनदर /kgकिमत
शेंगदाणा200 gm130 rs26
तीळ120gm200rs24
जवस80gm120rs9.6
तूप40gm600rs12
गूळ400 gm4518
पॅकिंग चार्जेस2 box510
स्टीकर21.53
मिक्सर् चार्जेस1/2 unit10rs/ 1 unit5
मोरिंगा पावडर20 gm600rs12
gass चार्जेस120gm870rs/1 unit7.45
मजुरी = 35139.05
487.71
———-
187.71

निरीक्षण

मोरिंगा चिक्कीची चव गोडसर व थोडी वेगळी लागली .

चिक्की खुशखुशीत व पौष्टिक होती .

बनवण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे .

निष्कर्ष

या प्रकल्पातून आम्हाला कळले कि मोरिंगा (शेवगा) हे झाड केवळ भाजीपुर्तेच उपयुक्त नसून त्यातून तयार केलेली चिक्की सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असते . त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते व स्तानिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो .

टूटी फ्रुटी

प्रस्तावना

टूटी-फ्रूटी ही एक गोड, रंगीत आणि आकर्षक प्रक्रिया केलेली फळाची उत्पादने आहेत. प्रामुख्याने कच्च्या पपईपासून टूटी-फ्रूटी तयार केली जाते. केक, बिस्किटे, आइस्क्रीम व स्वीट्समध्ये टूटी-फ्रूटीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

उद्देश

कच्च्या पपईपासून टूटी-फ्रूटी तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे.

साहित्य

कच्ची पपई – 2 नग (एकूण वजन : 2793 ग्रॅम)

साखर व पाणी

अन्न रंग / फ्लेवर – 4 प्रकार

गॅस, भांडे, चाकू, चमचा

कृती

दोन कच्च्या पपई सोलून त्यांचे लहान तुकडे करून लो गॅसवर 3 ते 5 मिनिटे उकळले.

साखर व पाण्याचा एकतारी पाक तयार करून त्यात पपईचे तुकडे टाकले.

मिश्रण चार भागांत विभागून वेगवेगळे फ्लेवर घालून टूटी-फ्रूटी तयार केली.

निरीक्षण

उकळल्यानंतर पपईचे तुकडे मऊ झाले व पाकामुळे गोडवा आला.

फ्लेवरमुळे टूटी-फ्रूटी आकर्षक रंगाची व चवीची झाली.

निष्कर्ष / यातून काय शिकलो

कच्च्या पपईपासून टूटी-फ्रूटी तयार करता येते हे शिकलो.

योग्य उकळणे, पाक बनवणे व स्वच्छता अन्नप्रक्रियेत महत्त्वाची आहे हे समजले.

गुलाब जमून

प्रस्तावना

गुलाब जमून आणि रसगुल्ले हे गोड असतात .गुलाबजाम हा मावा किंवा खव्यापासून तयार करून तळला जातो आणि साखरेच्या पाकात भिजवला जातो. त्याचा मऊ, रसाळ आणि सुगंधी स्वाद सर्वांना आवडतो. दुसरीकडे

उद्देश

खाव्या पासून गुलाब जमून बनवण्याची प्रक्रिया समजून घेण्य करिता .

साहित्य

खवा

मैदा

बेकिंग सोडा

दूध

साखर

पाणी

कृती

  1. दुध पासून ख्गावा तयार कारून घेतला
  2. खव्याच वाजून करून त्यच्या निम्या वजन एवढ्या मैद्या मध्ये माळून घेतलं
  3. मळलेल्या पीटाचे गोळे करून घेतले
  4. गोळे तेलात टाळून घेतले
  5. गोळे साखरेच्या पाकात मुरण्या साठी ठेऊन दिले

निरीक्षण

पीट मळताना थोडा थोडा दुध टाकून मालयाच

गोळे करताना अलगद हाताने वळायचे

निष्कर्ष यातून काय शिकालो

खाव्या पासून गुलाब जमून कसे तयार करायचे ते शीकलो

योग्य परमान वासू वापरणे कमी जास्त झाल्यास पदार्थ खरब होतो

रस गुल्ले

प्रस्तावना

रसगुल्ला हा पदार्थ गोड आसतो दुध पासून तयार केला जातो रसगुल्ल्याचा मऊ, स्पंजी आणि रसाने भरलेला पोत हा त्याचा मुख्य वैशिष्ट्य आहे.

उद्देश

जर दुध खरब झालेलं असेल तर त्याचा उपयोग कसा करायचा

रसगुल्ले कशे बनवायचे त्याची प्रक्रिया कशी करायची हे शिकण्यासाठी

साहित्य

पूर्ण फॅट दूध

लिंबाचा रस किंवा व्हिनेगर –

साखर

पाणी

वेलची पूड

कृती

धुधात व्हिनेगर टाकून उकळून घेतलं

दुधातल फट आणि पाणी वेगळ करून घेतलं

फट मळून घेतलं

माळून झाल्यावर त्याचे गोळे केले

मग साखरेच्या पाकात मुरण्या साठी ठेऊन दिले

निरीक्षण

पीट मळताना थोडा थोडा दुध टाकून मालयाच

गोळे करताना अलगद हाताने वळायचे

निष्कर्ष यातून काय शिकालो

खाव्या पासून गुलाब जमून कसे तयार करायचे ते शीकलो

योग्य परमान वासू वापरणे कमी जास्त झाल्यास पदार्थ खरब होतो