सामाजिक बांधीलकी जपणारा उद्योजक

नाव :- मधुकर चिंतू माळकरी . मु संगमनगर ( माळकरी पाडा ), पो.ता. विक्रमगड, जि पालघर . मो. ९८९०७३३०९२

 

महाराष्ट्रातील पालघर हा तसा सर्वात तरुण जिल्हा. पालघर जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आणि अधिवासी पाड्यांचा. येथील आदिवासी संस्कृतीतील वार्ली चित्रकला, पारंपारिक गाणी-नृत्य तसेच खाद्य पदार्थ म्हणजे संपूर्ण देशाची शान!

अश्या ह्या जिल्ह्यातील माळकरी-पाडा  ह्या छोट्याश्या पाड्यातील मधुरकर , त्याच्या बहुविविध कौशल्य आणि सामाजिक भान राखणाऱ्या व्यवसायाने ग्रामीण तरुणांना आदर्शवत ठरले असे काम करत आहे. मधुकर चिंतू माळकरी (मु संगमनगर माळकरी पाडा, पो.ता. विक्रमगड) लहानपासुनच नावाप्रमाणे गोड बोलणारा आणि धडपड्या ! मधुकरने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर कौशल्य शिक्षणाचा वेगळा रस्ता धरला तो त्याचे शिक्षक श्री गजानन टिळक ह्याच्या मार्गदर्शनामुळे.

विज्ञानं आश्रमातील ‘हाताने काम करत शिकण्याची’ पद्धत मधुकरला खुपच भावली. येथील बहुविविध कौशल्या शिक्षणामुळे मधुकरला त्याच्या आवडीबरोबरच ‘कसे आणि काय शिकायचे’ हे कळायाला लागले. विज्ञानं आश्रमातील १ वर्षाचा DBRT पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनुभवासाठी मधुकर पुण्यातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् , चिंचवड या  शाळेत कौशल्या शिक्षण निदेशकचे कम केले. ह्या कामातून त्याला व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकीचे धड़े मिळाले. हेच काम स्वतःच्या गावत आपल्या लोकांसाठी करण्यचा निश्चय करून मधुकरने २०१४ साली गाव गाठले.

पालघर सारख्या दुर्गम आणि मागास भागात कोणत्याही एकाच व्यवसायावर अवलंबून न-राहता मिळेल त्या संधीचे सोने करावे लागेल हे आत्ता पर्यंतच्या अनुभवावरून समजले होते. सन २०१५ मध्ये  उसाच्या  रसवंतीगृहने सुरवात केली ……त्यानंतर १ वर्षात मित्राच्या मदतीने स्वतःचे वेल्डिंग वर्कशॉप सुरु केले. ह्यातून शेतीच्या अवजार बनवण्याचे काम चालू झाले. त्याच्या भागात शेतीसाठी सिंचनाची सोय असावी महणून काम चालू केले. डोंगर उताराची जमीन आणि शेतीच्या सिंचनासाठी विजेची कमतरता ह्यावर उपाय म्हणून ‘पेडल पंपाचा’ मार्ग सापडला. स्वतःच्या शेतावर वापरून पाहिल्यावर त्याची विक्री आणि शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षणही चालू केले. शेतकऱ्यांची कामे करताना ओघाने शेतीच्या इतर समस्यांवरही काम विचार सुरु होता. त्यातूनच नैसर्गिक शेतीचे प्रयोगाचा भाग म्हणून देशी गाईंचे संगोपन चालू गेले. टांगी जातीच्या ७ गाई घेऊन जीवामृत, गोमुत्र, धूपकांडी, गांडूळ खत निर्मिती सुरु केली. बोलका स्वभाव आणि सामाजिक बांधीलकीतून मिळवलेला जनसंपर्कामुळे, ह्यामुळे परिसरातील इतर १५ शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांच्या मदतीतून डांगी गाई घेऊन दिल्या. हे व्यवसाय सुरु असतानाच घरातील मंडळीना मदतीले घेऊन ‘वरर्ली चित्रकलेतून’ तयार केलेल्या शोभेच्या वस्तूंची विक्री मधुकर करतो आणि विक्रमगड हायस्कूल, विक्रमगड येथील शाळेवर आठवड्यातील २ दिवस पूर्व-व्यावसायिक शिक्षणाचा निदेशक म्हणूनही काम करतो.

कामाचा आवाका वाढत असून, सामाजिक कामाचे समाधान मोठे असल्याने, ‘धरतरी ग्रामद्योग संकुल’ ह्या नावाने एक सामाजिक संस्थेचा पाया हि मधुकरने नुकताच रचला आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शाळांमध्ये संस्कार शिबिरे, कार्याकेद्रित शिक्षण आणि समज प्रबोधनाचे काम मधुरकर करत आहे.

“जो मनुष्य एकच कम करतो तो आयुष्यभर एकाच कामाने समाधानी राहतो पण जो मनुष्य चार वेगवेगळी कम करतो तो पाचवे कम शिकून ते सहज अत्मसात करू शकतो’ असे मधुकर ठामपणे सांगतो. पालघर सारख्या मागास भागात हि संधींची काहीच कमतरता नसून ह्या भागातील तरुणांना काही मदत करता आली तर आनंदाने करण्याची मधुकरची तयारी आहे.